20 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मतदार ओळखपत्रास आधार कार्डशी जोडणी
मतदार ओळखपत्रास आधार कार्डशी जोडणी

20 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 फेब्रुवरी 2020)

आता मतदार कार्डलाही जोडणार ‘आधार’ :

  • मतदार ओळखपत्रास आधार कार्डशी जोडणी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास कायदा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.
  • तसेच यासाठी आता सरकारकडून निवडणूक आयोगास कायदेशीर अधिकार मिळणार आहेत. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डशी जोडणी केल्यानंतर बोगस मतदारांना रोखता येणार आहे. याचबरोबर प्रवाशी मतदारांना रिमोट वोटिंगचा अधिकार देणेही सोपे होणार आहे.
  • तर बोगस मतदानाला आळा घालून ‘एक व्यक्ती एक मत’ योग्यरित्या राबवायचे असेल तर मतदार कार्ड आधारला जोडणे आवश्यक असल्याची मागणी आयोगाकडून अनेक वर्षांपासून केली जात होती.
  • पेड न्यूज व चुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासह निवडणूक सुधारणा या सारख्या मुद्यांवरही आयोगाची कायदा मंत्रालयाबरोबर बैठक झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्रालयाचे सचिव जी नारायण राजू यांच्या ही बैठक पार पडली.

राम मंदिर उभारणीची जबाबदारी मोदींच्या माजी प्रधान सचिवांकडे :

  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)च्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपाल दास यांची तर, विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
  • स्वामी गोविंददेव गिरी खजीनदार असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा हे मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष असतील.
  • तसेच ज्येष्ठ वकील के. पराशरन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी न्यासाची पहिली बैठक झाली.
  • 2 एप्रिल रोजी राम नवमीला राम मंदिराची पायाभरणी करण्याबाबतही विचार करण्यात आला. मात्र, त्यादिवशी अयोध्येत दरवर्षी रामभक्तांची प्रचंड गर्दी होत असते. त्यासाठी अयोध्या प्रशासनाची कितपत तयारी आहे याचा आढावा घेतल्याशिवाय तारीख निश्चित करता येत नसल्याने बुधवारी झालेल्या बैठकीत राम मंदिराच्या उभारणीच्या शुभारंभावर अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.
  • तर मंदिर बांधकाम समितीच्या 15 दिवसांनी होणाऱ्या बैठकीत तारीख निश्चित केली जाऊ शकते. शिलान्यासाचा मुहूर्त, राम मंदिर निर्माणाचा निश्चित कालावधी, निधी गोळा करणे आदी मुद्दय़ांवरही चर्चा झाली.
  • रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास तसेच, चंपत राय यांचा न्यासाचे 9 व 10 वे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. तसेच, विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

पीक विमा करायचा की नाही आता शेतकरी ठरवणार :

  • केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
  • तर याचबरोबर पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना या बद्दल माहिती दिली.
  • तसेच मंत्रिमंडळाने 22 व्या कायदा आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. ज्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली. हा आयोग सरकारला कायदेशीर प्रश्नांबाबत सल्ला देण्याचे काम करणार आहे.
  • कायदा आयोगाचा कार्यकाळ यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कायदा मंत्रालय आता नवीन आयोगासाठी अधिसूचना जारी करणार आहे. नव्या आयोगाचा कार्यकाळा तीन वर्षांचा असणार आहे.

महिला आशियाई चषकाचे संयोजनपद भारताकडे :

  • भारताला 2022 मधील ‘एएफसी’ महिला आशियाई फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.
  • भारतात महिलांमध्ये फुटबॉल खेळाचा अधिकाधिक विस्तार व्हावा म्हणून हे यजमानपद देशाला ‘आशियाई फुटबॉल संघटने’कडून बहाल करण्यात आले आहे. भारतात या वर्षांअखेरीस 17 वर्षांखालील कुमारी विश्वचषक स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
  • आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतासह चायनीज तैपेई आणि उझबेकिस्तान हे देश उत्सुक होते. मात्र त्यात भारताने बाजी मारली.
  • सामन्यांसाठी डी. वाय. पाटील स्टेडियम, ट्रान्स स्टेडिया एरिना आणि फर्तोडा स्टेडियम ही तीन ठिकाणे भारताकडून मंजूर करण्यात आली आहेत.
  • भारताने याआधी 2016मध्ये एएफसी 16 वर्षांखालील स्पर्धा आणि 2017मध्ये 17 वर्षांखालील कुमार विश्वचषकाचे यजमानपद यशस्वीरीत्या भूषवले आहे.

हिलरॉड चषक बुद्धिबळ स्पर्धात गुकेशला विजेतेपद :

  • ग्रॅँडमास्टर डी. गुकेश याने डेन्मार्क येथील 110व्या हिलरॉड चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • तर या स्पर्धेत 9 पैकी 8 गुण मिळवत गुकेशने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यात सात विजयांचा समावेश आहे. गुकेशने दोन लढती बरोबरीत सोडवल्या.
  • 13 वर्षीय गुकेश गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला होता.

आशियाई कुस्ती स्पर्धात आशू, आदित्य, हरदीपला कांस्यपदक :

  • आशू, आदित्य कुंडू आणि हरदीप या भारताच्या कुस्तीपटूंनी आपापल्या गटात विजय मिळवत आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली.
  • भारताने ग्रीको-रोमन प्रकारात एकूण पाच पदके मिळवली. आशूने 67 किलो वजनी गटात तर आदित्य आणि हरदीपने अनुक्रमे 72 आणि 97 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.
  • आशूने सिरियाच्या अब्दुलकरीम मोहम्मद अल-हसन याच्यावर 8-1 अशी सहज मात केली. आदित्यने अवघ्या दीड मिनिटे रंगलेल्या एकतर्फी लढतीत जपानच्या नाओ कुसाका याचा 8-0 असा धुव्वा उडवला.
  • तसेच त्यानंतर हरदीपने किर्गिजिस्तानच्या बेकसुलतान मखामादझानोव्हिच मखमुदोव्ह याला 3-1 असे हरवले.

दिनविशेष:

  • 20 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक सामाजिक न्याय दिन‘ आहे.
  • शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना सन 1978 या वर्षी देण्यात आला.
  • सन 1987 यावर्षी मिझोराम भारताचे 23 वे राज्य बनले.
  • सन 2014 मध्ये तेलंगण हे भारताचे 29 वे राज्य बनले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Rohini says

    Very important news are so thanks

Leave A Reply

Your email address will not be published.