21 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

21 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 फेब्रुवरी 2020)

भारतीय वंशाचे श्रीनिवासन बनले अमेरिकेत मुख्य न्यायाधीश :

  • भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन यांनी इतिहास रचला आहे. अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
  • तसेच चंदीगड या ठिकाणी जन्मलेले श्रीनिवासन आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल महत्त्व असलेल्या फेडरल सर्किट न्यायालयाचे प्रमुखपद सांभाळणार आहेत.
  • श्रीनिवासन हे भारतीय-अमेरिकन आहेत. या पदावर कार्यरत असणारे 52 वर्षीय श्रीनिवासन दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. अमेरिकेतील द्वितीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून श्रीनिवासन यांनी काम पाहिले आहे.
  • तर श्रीनिवासन उच्च श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण असून, स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून उच्च श्रेणीत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. न्यायाधीश जे. हारवी विल्कीन्सन यांचे सहायक म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरूवात करणारे श्रीनिवासन आता अमेरिकेत मुख्य न्यायाधीश बनले आहेत.

Meena’ मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा:

  • अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा, गुगल असिस्टेंट आणि अ‍ॅपल सीरीसारखे व्हॉईस असिस्टेंट खूप लोकप्रिय आहेत. बातम्या देणं, हवामानाची माहिती सांगणं, गाणी ऐकवणं यासह अनेक गोष्टींसाठी अशा डिव्हाईसचा वापर हा केला जातो.
  • मात्र आता गुगलने एक भन्नाट डिव्हाईस आणलं आहे. गुगलने नवीन चॅटबोट (बोलणारा असिस्टंट) आणली असून Meena असं तिचं नाव आहे.
  • तसेच मीनासोबत म्हणजेच या चॅटबोटसोबत युजर्सना हवा तेवढा वेळ मनसोक्त गप्पा मारता येणार आहे. तसेच ही चॅटबोट देखील एखाद्या माणसासारखं त्याला उत्तर देईल असं गुगलने म्हटलं आहे.
  • गुगलने दिलेल्या माहितीनुसार, अनेक सोशल मीडिया चॅटच्या आधारावर मीना ही चॅटबोट तयार करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून कोणत्याही विषयावर संवाद म्हणजेच गप्पा मारता येणार आहे. तसेच गप्पांसोबतच मीना जोक देखील सांगणार आहे. मात्र युजर्ससाठी ही नवी चॅटबोट कधी येणार आहे
  • तर याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मीनाला 40 अब्ज शब्द शिकवण्यात आले आहेत. इतर चॅटबोटपेक्षा मीना ही नवी चॅटबोट अधिक चांगली असल्याचा दावा गुगलने केला आहे.
  • मीनामध्ये सिंगल इवॉल्वड ट्रान्सफॉर्मर इनकोडर आणि 13 इवॉल्वड ट्रान्सफॉर्मर डीकोडर बॉक्स देण्यात आले आहेत. म्हणजेच सिंगल इनकोडर मीना एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मदत करणार आहे तर 13 डीकोडर त्याचं उत्तर तयार करण्यासाठी मदत करणार आहेत.
  • गुगलने मीनाची चाचणी करण्यासाठी एक मापदंड तयार केला असून सेन्सबलनेस अँड स्पेसिफ़िसिटी ऐवरेज (SSA) असं नाव दिलं आहे. या मापदंडातून एखाद्याला प्रतिक्रिया देण्यासाठी संभाषण करणाऱ्या एजंटची काय क्षमता आहे ते तपासलं जातं. SSA टेस्टमध्ये सामान्य माणसांना 86 टक्क्यापर्यंत रँकिंग मिळतं तर मीनाला यामध्ये 79% गुण मिळालेत. पण ही गुगलची स्वत:ची प्रणाली आहे.

30 वर्षांनी मयांकने केली कोणालाही न जमलेली कामगिरी :

  • वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय फलंदाजांना चांगलच जेरीस आणलं.
  • नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा केन विल्यमसनचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
  • तर सलामीवीर पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र भारताचा दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.
  • भारताचे 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर मयांक आणि अजिंक्य रहाणे जोडीने नेटाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला. दोन्ही खेळाडूंनी पहिलं सत्र खेळून काढत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली.
  • यादरम्यान 1990 नंतर मयांक अग्रवाल न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात पहिलं सत्र खेळून काढणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी 1990 साली नेपियर कसोटीत मनोज प्रभाकर यांनी पहिलं सत्र खेळून काढलं होतं.

आशियाई कुस्ती स्पर्धात भारताच्या महिलांची सोनेरी कामगिरी :

  • आशियाई कुस्ती स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारताच्या महिला कुस्तीपटूंनी तीन सुवर्णपदके जिंकून गाजवला.
  • तर तीन सुवर्णासह एक रौप्य अशी एकूण चार पदके मिळवत भारताच्या महिलांनी घरच्या मैदानावर यशस्वी कामगिरी केली.
  • दिव्या काक्रन (68 किलो), पिंकी (55 किलो), सरिता मोर (59 किलो) यांनी सुवर्णपदके पटकावली.
  • भारताच्या निर्मला देवीला मात्र 50 किलो गटात अंतिम फेरीत पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताच्या दिव्या काकराचा ‘सुवर्ण’ विजय :

  • आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दिव्या काकरा हिने सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • तसेच या स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी दिव्याने सुवर्ण पदक मिळवून भारताला चांगली सुरुवात करून दिली.
  • भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरा हिने गुरुवारी 68 किलो वजनी गटात हा विजय संपादन केला. दिव्याने जपानचा कुस्तीपटू नरुहा मत्सुयुकी हिचा पराभव केला आणि सुवर्ण कमाई केली.
  • तसेच 68 किलो वजनी गटात हा सामना गॉल रॉबिन स्वरूपात खेळला गेला. या सामन्यात दिव्याने कझाकस्तान, मंगोलिया, उझबेकिस्तान आणि जपानच्या खेळाडूंना पराभूत केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
  • नवी दिल्लीतील केडी जाधव स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिव्याने दमदार कामगिरी केली. भारतासाठी हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. दोन सुवर्णपदकांसह आता भारताने एकूण सहा पदके जिंकली आहेत.

‘तान्हाजी’ने जागतिक स्तरावर नोंदवला नवा विक्रम :

  • अजय देवगणचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सहाव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर तळ ठोकून आहे. काही राज्यांत टॅक्स फ्री असल्याने ‘तान्हाजी’ची कमाई सुरु आहे.
  • भारतीय सिनेप्रेमींना ‘तान्हाजी’ने वेड लावलेच. पण आता तर जागतिक स्तरावरही ‘तान्हाजी’ने नवा विक्रम केला आहे.
  • तसेच या सिनेमाने 41 दिवसांत जगभरात तब्बल 347 कोटींचा बिझनेस केला आहे. या कमाईसोबत ‘तान्हाजी’ जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 16 वा सिनेमा ठरला.

दिनविशेष:

  • 21 फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.
  • अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1911 रोजी झाला होता.
  • अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1942 मध्ये झाला.
  • सन 1975 मध्ये जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.