20 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

भारतीय अक्षय ऊर्जा दिन
भारतीय अक्षय ऊर्जा दिन

20 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2021)

गुजरातच्या धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदींना स्थगिती :

  • गुजरात उच्च न्यायालयाने राज्याच्या नव्या धर्मांतरविरोधी कायद्यातील आंतरधर्मीय विवाहाशी संबंधित काही कलमांच्या अंमलबजावणीला गुरुवारी स्थगिती दिली.
  • गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
  • तर अनाठायी छळापासून लोकांच्या संरक्षणासाठी हा हंगामी आदेश देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • तसेच सुनावणी प्रलंबित असताना, कलम 3,4, 4 ए ते 4 सी, 5, 6 आणि 6 ए मधील तरतुदी लागू करता येणार नाहीत.
  • कारण कोणतीही बळजबरी, आमिष आणि फसवणुकीविना एका धर्माची व्यक्ती दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी विवाह करते तेव्हा अशा विवाहांना बेकायदा धर्मांतराच्या हेतूने केलेला विवाह म्हटले जाऊ शकत नाही.
  • भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपाठोपाठ गुजरात सरकारने विवाहाद्वारे होणाऱ्या बळजबरीच्या धर्मांतराबद्दल शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला होता.
  • गुजरात सरकारच्या या कायद्याची अंमलबजावणी 15 जूनपासून सुरू झाली होती. परंतु त्यातील काही कलमांना न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2021)

रणजी क्रिकेट स्पर्धा 5 जानेवारीपासून :

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2021-22चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम गुरुवारी निश्चित केला.
  • सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धा 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा 5 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.
  • करोना साथीमुळे गतवर्षी रणजी करंडक स्पर्धा होऊ शकली नाही.
  • जैव-सुरक्षित वातावरणात 38 संघांसह स्पर्धा आयोजित करणे कठीण असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
  • महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक :

  • माजी कर्णधार राहुल द्रविड लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
  • नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची नेमणूक होणार असल्याचं बोललं जात आहे.
  • मात्र राहुल द्रविडने नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या प्रमुखपदासाठी अर्ज दिला असल्याचं समोर आलं आहे. यामुळे चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
  • राहुल द्रविडचा दोन वर्षांचा करार संपल्यानंतर बीसीसीआयने अर्ज मागवले होते. नव्या नियमामध्ये कार्यकाळ वाढवण्याची तरतूद नसून नव्याने भरती प्रक्रिया सुरु करावी लागते.

दिनविशेष:

  • 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिन तसेच भारतीय अक्षय ऊर्जा दिन आहे.
  • राजाराममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी 20 ऑगस्ट सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
  • सर रोनाल्ड रॉस यांनी सन 1897 मध्ये भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
  • भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट 1944 मध्ये मुंबई येथे जन्म झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.