19 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए)

19 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2021)

मुलींना ‘एनडीए’चे द्वार खुले :

  • सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) द्वार मुलींसाठी खुले केले.
  • तर या संधीपासून मुलींना वंचित ठेवणाऱ्या मानसिकतेवर कठोर ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांना ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी दिली.
  • याबाबतची अधिसूचना प्रसृत करण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) दिले.
  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षेस पात्र मुलींना बसण्याची परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या कुश कालरा यांच्या याचिकेवर न्या. संजय किशन कौल आणि ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने बुधवारी सुनावणी घेतली.
  • न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘एनडीए’ची 5 सप्टेंबरची परीक्षा देण्याचा महिला उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2021)

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-7 देशांची बैठक :

  • जी 7 देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.
  • अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी 7 देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ठरवले आहे.
  • तर बायडेन व जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली.

अलीगढचे नाव ‘हरीगढ’करण्याची मागणी :

  • योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलं. आणखी काही शहरांची नावंही त्यांनी बदलली.
  • आता पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये एका शहराचं नाव बदलण्याची मागणी होत आहे. हे शहर आहे अलीगढ.
  • तर अलीगढचं नाव बदलून हरीगढ करण्यात यावं, अशी मागणी तिथले रहिवासी करत आहेत. यासाठी अलीगढ जिल्हा पंचायतीने उत्तर प्रदेश सरकारला प्रस्ताव देखील पाठवला आहे.
  • तसेच याशिवाय फिरोजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून चंद्र नगर करण्याचा आणखी एक प्रस्तावही चर्चेत आहे.
  • अलीगढ जिल्हा पंचायतीने उत्तर प्रदेश सरकारला प्रस्ताव पाठवला असून, अलीगढमधील मिनी एअरपोर्टचे नाव कल्याण सिंह यांच्या नावावर ठेवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

लेवांडोवस्कीमुळे बायर्न म्युनिकचे नवव्यांदा जर्मन चषकावर वर्चस्व :

  • तारांकित आक्रमक रॉबर्ट लेवांडोवस्कीने साकारलेल्या दोन गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने जर्मन सुपर चषक फुटबॉलच्या अंतिम सामन्यात बोरुशिआ डॉर्टमंडला 3-1 अशी धूळ चारली.
  • तर बायर्नने सर्वाधिक नवव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावताना जर्मन फुटबॉलमधील आपली सत्ता कायम राखली.
  • दरवर्षी बुंडेसलिगा आणि डीएफबी पोकल या जर्मनीमधील दोन फुटबॉल लीगच्या विजेत्यांमध्ये या चषकासाठी चढाओढ रंगते.
  • जुलिआन नागल्समन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बायर्नसाठी लेवांडोवस्कीने अनुक्रमे 41 आणि 74व्या मिनिटाला दोन गोल केले.

दिनविशेष :

  • 19 ऑगस्ट 1856 मध्ये गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
  • अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून 16 ऑगस्ट 1999 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • 19 ऑगस्ट 1945 मध्ये होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
  • स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म 19 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.