2 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 October 2018 Current Affairs In Marathi

2 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2018)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी गीता गोपीनाथ:

  • रघुराम राजन यांच्यानंतर आणखी एका भारतीय व्यक्तीची वर्णी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लागली आहे.
  • भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी करण्यात आली आहे. Geeta Gopinath
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डी यांनी गीता यांची निवड केली आहे.
  • सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची धुरा सांभाळत आहेत. मोरी डिसेंबरमध्ये निवृत्त होतील झाल्यानंतर गीता गोपीनाथ कार्यभार सांभाळणार आहेत.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
  • तसेच याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती. राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2018)

राज्य बेरोजगारांना देणार दर महिना एक हजार रुपये भत्ता:

  • आंध्र प्रदेश सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना चंद्राबाबू नायडू सरकार बेरोजगार भत्ता देणार आहे. 2 ऑक्टोबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे.
  • तसेच या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना दर महिना 1000 रुपये बेरोजगारी भत्ता मिळेल. ‘मुख्यमंत्री युवा नेस्तम’ नावाच्या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू करतील.
  • एका वेबपोर्टलच्या माध्यमातून या योजनेसाठी नोंदणी सुरु आहे. या पोर्टलवर आंध्र प्रदेशच्या 2 लाखांहून अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. या अंतर्गत बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करण्याचा उद्धेश आहे.
  • चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगू देशमने 2014 मध्ये निवडणुकीच्या जाहीरनाम्यात याची घोषणा केली होती. आता विधानसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असताना नायडू यांनी आपल्या आश्वासनाची पुर्तता करत आहे.

आता UPSC चा अर्ज मागे घेता येणार:

  • केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. UPSC
  • एकदा या परीक्षेसाठी केलेला अर्ज हे विद्यार्थी आता मागे घेऊ शकणार आहेत. परीक्षा जवळ आली असून आपला अभ्यास झाला नाही असे एखाद्या विद्यार्थ्याला वाटले तर तो भरलेला परीक्षेचा अर्ज मागे घेऊ शकतो.
  • केंद्रिय लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना ही सुविधा लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
  • 2019 पासून हा निर्णय लागू होणार असून इंजिनिअरींग सेवा परीक्षेपासून याची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • विद्यार्थ्यांना आपण केलेला अर्ज मागे घेता येणार असला तरीही त्यासाठी भरलेली फी मात्र परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

‘एसबीआय’कडून एटीएमसंबंधीत मर्यादेत बदल:

  • दररोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये एटीएमचा लोकांना मोठा दिलासा आहे. एटीएममुळे बँकेच्या भल्यामोठ्या रांगेत उभे राहणे टाळता येते.
  • पण एसबीआयने आपल्या खातेदारांना मोठा झटका दिला आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कपात करत दिवसाला 20 हजार केली आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून एसबीआय ग्राहकांना एटीएममधून दिवसाला फक्त 20 हजार रूपये काढता येणार आहेत.

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहक मनू भाकर:

  • ब्यूनस आयर्स (अर्जेंटिना) येथे 6 ते 18 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या तिसर्‍या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय दलाची ध्वजवाहक म्हणून युवा नेमबाज मनू भाकर ही असणार आहे. Manu Bhakar
  • भारतीय संघाला निरोप देण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमात भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी 16 वर्षीय भाकर हिच्या नावाची घोषणा केली. तिच्या नेतृत्वाखाली हा संघ रवाना होईल.
  • हा सन्मान मिळल्यानंतर मनू म्हणाली की, मी भारतीय दलाची ध्वजवाहक होईल, असा मी कधी विचारही केला नाही. हा माझा सन्मान आहे. खूप अभिमान वाटतो. या स्पर्धेसाठी भारताचा 68 सदस्यीय दल अर्जेंटिना येथे रवाना होणार आहे. ज्यात 46 खेळाडूंचा समावेश आहे.
  • भारत 13 खेळांमध्ये आपले आव्हान सिद्ध करणार आहे. गोवा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता हे ‘चेफ द मिशन’ आहेत. या कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड आणि आयओएचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते.

बीसीसीआय आता माहिती अधिकारांतर्गत काम करणार:

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता यापुढे माहितीच्या अधिकार अंतर्गत (आरटीआय) काम करेल. त्याचप्रमाणे, माहितीच्या अधिकाराच्या नियमांनुसार बीसीसीआय देशातील जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बाधिल असेल, असा ऐतिहासिक आदेश केंद्रीय सूचना आयोगाने (सीआयसी) दिला.
  • आरटीआय प्रकरणातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘सीआयसी’ने हा आदेश देण्यासाठी कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, भारतीय विधी आयोगाचा अहवाल तसेच युवा आणि क्रीडा विषयी मंत्रालयाच्या केंद्रीय लोक सूचना अधिकारीचे प्रस्ताव अशा गोष्टींचा अभ्यास केला. यानुसार बीसीसीआयची स्थिती, प्रकृती आणि काम करण्याची पद्धत आरटीआय प्रावधानचे कलम दोन (एच) आवश्यक नियम पूर्ण करतात, असे निदर्शनास आले आणि सीआयसीने हा आदेश दिला.
  • सूचना आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी 37 पानांच्या आदेशामध्ये म्हटले की, ‘सर्वोच्च न्यायालयानेही पुन्हा एकदा स्पष्ट केले की, बीसीसीआय देशामध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी ‘स्वयंघोषित’ राष्ट्रीय संस्था असून त्यांच्याकडे जवळपास एकाधिकार आहेत.’ त्याचवेळी आचार्युलू यांनी कायद्यानुसार आवश्यक केंद्रीय लोक सूचना अधिकारी, केंद्रीय सहायक सार्वजनिक सूचना अधिकारी आणि प्रथम अपीली अधिकारी म्हणून योग्य अधिकारी नियुक्त करण्यासाठी अध्यक्ष, सचिव आणि प्रशासक समितीला आदेशही दिले आहेत. त्याचप्रमाणे, आरटीआय प्रावधान अंतर्गत अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांत ओनलाइन आणि ऑफलाइन यंत्रणा तयार करण्याबाबतचे निर्देशही आचार्युल यांनी बीसीसीआयला दिले आहेत.

कर्करोगावरील उपचारपद्धतीला नोबेल जाहीर:

  • कर्करोगावरील उपचारासाठी नवी क्रांतिकारी उपचारपद्धती विकसित करणारे अमेरिकेचे जेम्स ऍलिसन आणि जपानचे तासुकू होंजो यांना या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. Jems and Tasuku
  • रुग्णाची प्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत होते. प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात आणि रुग्ण मृत्यूच्या दाढेत जातो.
  • कर्करोगाशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती रोग्याला मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करण्यात येत होते.
  • ऍलिसन आणि होंजो यांनी नवी उपचार पद्धती शोधून काढली. या नव्या पद्धतीमुळे रोग्याची कर्करोगाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढेल आणि शरीरातील पेशी या कर्करोगापासून सुरक्षित राहू शकतील. या नव्या पद्धतीमुळे रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतील. या कामगिरीबद्दल ऍलिसन आणि होंजो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिनविशेष:

  • 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, स्वच्छता दिन तसेच बालसुरक्षा दिन आहे.
  • 2 ऑक्टोबर 1869 रोजी मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म झाला.
  • भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म झाला.
  • रमाबाई रानडे यांनी सन 1909 मध्ये पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
  • सन 1969 मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या 2, 5, 10 व 100 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.