3 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 October 2018 Current Affairs In Marathi

3 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2018)

‘रुपी बँके’च्या विलीनीकरणाचा ‘टीजेएसबी’चा प्रस्ताव:

  • सुमारे 55 हजार सभासद आणि सात लाख ठेवीदारांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पुण्यातील रूपी बँकेच्या विलीनीकरणासाठी ‘ठाणे जनता सहकारी बँक’ (टीजेएसबी) पुढे आली असून तिने तसा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेला दिला आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेकडे रूपीच्या ठेवीदारांच्या नजरा लागल्या आहेत. TJSB Bank
  • आर्थिक अनियमिततेमुळे गेल्या पाच वर्षांपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधात अडकलेल्या आणि अवसायनाच्या मार्गावर असलेल्या रुपी बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना यामुळे यश येण्याची चिन्हे आहेत. आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेवर रुपीचे भवितव्य अवलंबून असल्याची माहिती सहकार विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
  • सारस्वत, पंजाब नॅशनल या बँकांनीही रुपीच्या विलीनीकरणात स्वारस्य दाखविले होते. मात्र 1100 कर्मचारी आणि 550 कोटींचा तोटा, हे ओझे घेण्यास कोणतीच बँक तयार नव्हती. आता या बँकेत केवळ 350 अधिकारी-कर्मचारी उरले असून गेल्या वर्षभरात 17 कोटींची वसुली झाली आहे.
  • तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या ठेव विमा आणि पत हमी महामंडळाच्या (डीआयसीजीसी) योजनेनुसार टीजेएसबीने हा विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2018)

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर:

  • जगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागली असून डोना स्ट्रीक्लंड असे त्यांचे नाव आहे. हा पुरस्कार भौतिकशास्त्रासाठी दिला असून 3 जणांना तो देण्यात येणार आहे. physics nobel prize
  • आर्थर आश्कीन यांना तसेच गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड यांना विभागून देण्यात आला आहे. डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
  • 14 ऑक्टोबर रोजी औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर आता भौतिकशास्त्रासाठीचे नाव जाहीर करण्यात आले. आठवडाभर विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे.
  • यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या 70 वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.

विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तनिशाची दुसर्‍यांदा निवड:

  • सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली गोव्याची अव्वल मानांकित तनिशा क्रास्तो हिची कॅनडा येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
  • सलग तीन अखिल भारतीय मानांकन स्पर्धा जिंकल्यानंतर चंदिगड आणि पंचकुला या स्पर्धेतही तिने छाप सोडली आहे. त्यामुळे तनिशाने निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले. तनिशाने हे सत्र पूर्णपणे गाजवले. आता ती दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
  • नागपूर येथे ऐतिहासिक अशी दोन सुवर्णपदके पटकाविल्यानंतर गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्तो हिने आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली.
  • हैदराबाद येथील अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतही तिने दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले होते. 15 वर्षीय तनिशाने आपली उत्तराखंडची जोडीदार आदिती भट्ट हिच्यासोबत खेळताना 17 वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले होते.

100 रुपये गुंतवून सुरू करा पोस्टाची ‘NSC’ योजना:

  • छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असते. या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर जास्त व्याजदराबरोबरच टॅक्समध्ये सूट मिळते. NSC
  • 1 ऑक्टोबरपासून 5 वर्षं एनएससीवर मिळणारे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून वाढून 8 टक्के करण्यात आला आहे. खरे तर एवधे जास्त व्याजदर देशातली कोणतीही बँक देत नाही. त्यामुळे तुम्ही एनएससीमध्ये पैसे गुंतवणे जास्त फायदेशीर ठरू शकते.
  • पोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेतील गुंतवणूक 5 वर्षांसाठी करता येते. भारतीय पोस्ट ऑफिसनुसार, या योजनेंतर्गत कमीत कमी 100 रुपयांमध्ये खाते उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच कालमर्यादा तुम्हाला वाढवताही येऊ शकते.
  • तसेच एनएससीअंतर्गत देशभरातील पोस्ट ऑफिसच्या ब्रँचमध्ये खाते उघडलं जाऊ शकते.

इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष बरहम सालेह:

  • इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत. 2 ऑक्टोबर रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
  • पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला.
  • 58 वर्षीय बरहम सालेह यांना 219 तर फुआद यांना 22 मते मिळाली. बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.
    दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच होती. परंतु, निकाल एकतर्फी लागला. तसेच निकाल लागण्यासही उशीर झाला.
  • 2003 नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत. पंतप्रधान शिया मुसलमान आणि संसदेचे सभापती सुन्नी समाजाचे आहेत.
  • इराकची अखंडता आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालेह यांनी शपथग्रहणावेळी म्हटले. सरकार स्थापन करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांकडे 15 दिवसांची कालावधी असेल.

दिनविशेष:

  • हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
  • इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
  • सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2018)

You might also like
1 Comment
  1. Manoj says

    Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.