18 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
18 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2022)
भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती :
- भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- विद्यमान सरन्यायाधीश यू यू लळित यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून न्यायमूर्ती चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या.चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे.
- तत्पूर्वी भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यूयू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची शिफारस केली होती.
- न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.
- हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या 39 व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
एमबीबीएस अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेतून :
- हिंदी भाषेमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले.
- अन्य आठ भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावर काम सुरू असल्याचेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेश सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला असून स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. - मेडिकल बायोकेमिस्ट्री, अॅनाटॉमी आणि मेडिकल फिजिऑलॉजी या तीन विषयांच्या हिंदीतील पुस्तकांचे शाह यांनी प्रकाशन केले.
- पाठय़पुस्तकांची भाषा हिंदी असली, तरी त्यातील वैद्यकीय संकल्पना इंग्रजीच ठेवण्यात आल्या आहेत.
टी20 विश्वचषकासाठी समालोचन पॅनेल जाहीर :
- आयसीसीने टी20 विश्वचषकात सहभागी समालोचकांची यादी जाहीर केली आहे.
- समालोचकांची या यादीमध्ये भारताच्या हर्षा भोगले, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे.
- याशिवाय नुकतेच निवृत्त झालेले इयॉन मॉर्गन, प्रेस्टन मॉमसेन, डेल स्टेन आणि नियाल ओब्रायन यांसारखे माजी क्रिकेटपटूही सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसतील.
- टी20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत.
- या स्पर्धेसाठी नामांकित 29 समालोचकांच्या गटात मेल जोन्स, इसा गुहा आणि नताली जर्मनोस महिला समालोचक म्हणून उपस्थित आहेत.
दिनविशेष :
- 18 ऑक्टोबर – जागतिक रजोनिवृत्ती दिन
- 18 ऑक्टोबर 1867 मध्ये सोविएत रशियाला 72 लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.
- थिऑसॉफिकल सोसायटीची 18 ऑक्टोबर 1879 मध्ये स्थापना झाली.
- महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.
- 18 ऑक्टोबर 1922 मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.
- टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची 18 ऑक्टोबर 1954 मध्ये घोषणा केली.
- 18 ऑक्टोबर 1967 मध्ये सोविएत रशियाचे व्हेनेरा-4 हे अंतराळयान शुक्रावर उतरले.