16 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

रुद्राक्ष पाटील
रुद्राक्ष पाटील

16 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2022)

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण :

  • जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स) भारताची 107व्या स्थानी घसरण झाली आहे.
  • 29.1 गुण असलेल्या भारताला ‘गंभीर’ श्रेणीमध्ये टाकण्यात आले आहे.
  • भारताचे शेजारी पाकिस्तान (99), बांगलादेश (84), नेपाळ (81) आणि आर्थिक अडचणीत असलेला श्रीलंका (64) या सर्वाची स्थिती अधिक चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • या निर्देशांकात 2021 साली भारताचे  116देशांमध्ये 101वे स्थान होते.
  • यंदा 121 देशांमध्ये भारत 107व्या स्थानापर्यंत खाली घसरला आहे.
  • आशियातील केवळ अफगाणिस्तान (109) हा देशच भारताच्या मागे आहे.
  • या यादीत चीन, कुवेत या आशियातील देशांसह 17 देश सर्वोच्च स्थानी आहेत. तर येमेन 121 स्थानी आहे.

महाराष्ट्राच्या सुपुत्राने सुवर्ण पदकासह मिळवला ऑलिम्पिक कोटा :

  • भारताचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने शुक्रवारी ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला.
  • जागतिक चॅम्पियनशिपच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत महान अभिनव बिंद्रानंतर ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय नेमबाज ठरला आहे.
  • 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवणारा तो दुसरा भारतीय नेमबाज आहे.
  • अठरा वर्षीय रुद्राक्षने सुवर्णपदकाचा सामना गमावल्यानंतर पुनरागमन करत इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा 17-13 असा पराभव केला.
  • यंदाच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिकसाठी चार कोटा जागा उपलब्ध आहेत.
  • भारताने नुकताच क्रोएशियातील शॉटगन जागतिक नेमबाजी स्पर्धेमधील पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत भावनीश मेंदिरट्टाच्या माध्यमातून पहिला कोटा मिळवला.

आशिया चषक विजेते ठरलेल्या भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव :

  • बांगलादेशातील सिल्हेट येथे संपन्न झालेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखत दारूण पराभव केला.
  • कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022चा आशिया जिंकत सातव्यांदा नाव कोरले.
  • स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला.
  • अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दिनविशेष :

  • 16 ऑक्टोबर 1868 मध्ये डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.
  • भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश 16 ऑक्टोबर 1905 मध्ये दिला.
  • 16 ऑक्टोबर 1978 मध्ये माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
  • 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.