17 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 May 2019 Current Affairs In Marathi

17 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 मे 2019)

आखाती देशांसाठीचे ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ भारतात :

 • आखाती देशांमध्ये भारतीय चालकांना असलेली मागणी लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिराती आणि भारत संयुक्तपणे भारतात ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करणार आहेत.
 • तसेच या प्रशिक्षण केंद्रामुळे आखाती देशात गेल्यावर चालकाला डाव्या बाजूने वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा वेळ वाचणार आहे.
 • भारतात गाडय़ांचे स्टीअिरग उजव्या बाजूला असते, तर आखाती देशांतील गाडय़ांचे स्टिअिरग डाव्या बाजूला. त्यामुळे भारतातून आखाती देशांमध्ये चालक म्हणून जाणाऱ्यांना तेथे गेल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागते. यात त्यांना
  नोकरीवर घेणाऱ्या कंपनीचा आणि चालक म्हणून गेलेल्यांचा वेळ आणि तिथे नव्याने चालक परवाना काढण्याचा पैसाही वाया जातो. तसे होऊ नये म्हणून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.
 • भारतात ही चालक प्रशिक्षण केंद्रे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत इमिरेट्स ड्रायव्हिंग इन्स्टिटय़ूट (ईडीआय) आणि युथ चेंबर ऑफ कॉमर्स, युएई (वायसीसी) हे संयुक्तपणे राबवणार आहेत.
 • तर सुरुवातीला ही केंद्रे उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्र प्रदेश येथे उघडण्यात येतील.
 • या केंद्रांद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून ते आखाती देशांत गेल्यावर कोणतीही चाचणी न घेता तेथील अधिक दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. तसेच त्यांचा वेळ आणि पैसा अधिक खर्च न होता त्यांना परवाना मिळेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मे 2019)

चीनचे चँग-फोर मोहिमेचे यश :

 • चीनच्या चँग-फोर मोहिमेने चंद्राचे आच्छादन रसायन आणि खनिजापासून कसे बनले आहे, यावर प्रकाश टाकला असल्यामुळे पृथ्वी आणि त्याचा नैसर्गिक उपग्रह चंद्र यांची उत्क्रांती/विकास कसा झाला, याचे गूढ उकलण्यात
  मदत होईल.
 • चंद्राची जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही किंबहुना तिच्यावर प्रकाश खूप कमी असतो (डार्क साईड म्हणूनही ती ओळखली जाते), अशा भागावर प्रथमच अगदी सहजपणे यावर्षी जानेवारी महिन्यात उतरण्याचा मान चँग-फोर यानाने मिळवला
  आहे.
 • रोव्हर युटू-2 ने सभोवताल शोधण्यासाठी लँडरला मोकळे सोडले. युटू-2 मध्ये बसविलेल्या दृश्य आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरने मिळवलेल्या माहितीचा वापर करून ली चुन्लाई यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झरर्व्हेटोरीज ऑफ चायनाच्या संशोधक तुकडीला जेथे चँग-फोर यान उतरले त्या भागातील चंद्राची जमीन आॅलिवाईनआणि पायरोक्सिन असलेली आढळली. तर हे घटक चंद्राच्या खूप खोलवरील आच्छादनातून आलेले होते.

दिलीप माजगावकर यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर :

 • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना तर वाडमयीन चळवळीसाठीच्या योगदानाबद्दल डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता
  पुरस्कार, नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे.
 • तसेच प्रथमच भारताबाहेरील व्यक्तीस हा कार्यकर्ता पुरस्कार दिला जात आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 113 वा वर्धापनदिन दि. 27 मे रोजी साजरा होत आहे. या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान
  करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कायार्तून वाढविणा-या व्यक्तीस ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाते.
 • तर यंदा लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिलीप माजगावकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
 • याशिवाय गेली चाळीस वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत नोहा मस्सील यांची डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दिनविशेष :

 • 17 मे : जागतिक उच्च रक्तदाब दिन
 • 17 मे : जागतिक माहिती संस्था दिन
 • न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 17 मे 1792 मध्ये झाली.
 • 17 मे 1872 मध्ये इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
 • 17 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
 • 17 मे 1949 मध्ये भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.