17 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 January 2020 Current Affairs In Marathi
17 January 2020 Current Affairs In Marathi

17 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 जानेवारी 2020)

ISRO ची आणखी एक यशस्वी कामगिरी :

  • इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे.
  • जीसॅट-30 (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून 35 मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. तर GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.
  • तसेच GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे 3,100 किलो आहे. लाँचिंगपासून 15 वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.
  • या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.
  • तर यापूर्वी 2015 मध्ये इनसॅट-4ए हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-30 हा उपग्रह इनसॅट-4एच्या जागी काम करेल.
  • GSAT-30 हा दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे वकील :

  • आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.
  • ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे.
  • हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहतील. 16 मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल.
  • तसेच कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती शाही घराण्याच्या सूत्रांनी दिली.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम :

  • महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गुरुवारीही घवघवीत यश संपादन केल्यामुळे पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले आहे.
  • महाराष्ट्राच्या खात्यात आतापर्यंत 34 सुवर्ण, 37 रौप्य आणि 57 कांस्यपदकांसह एकूण 128 पदके जमा आहेत.
  • तर वेटलिफ्टिंगमध्ये सौम्या दळवी, हर्षदा गरुड यांनी विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच
  • सायलकिंगमध्ये महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले. खो-खो खेळामध्ये महाराष्ट्राने गुरुवारी चारही गटांमध्ये विजय नोंदवले.

दिनविशेष:

  • सन 1773 मध्ये ‘कॅप्टन जेम्स कुक’ यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
  • रॉबर्ट फाल्कन स्कॉट हे सन 1912 मध्ये दक्षिण ध्रुवावर पोहचले होते.
  • भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म 17 जानेवारी 1906 मध्ये झाला होता.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक सन 1946 मध्ये झाली.
  • सन 1956 मध्ये बेळगाव-कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.