16 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

16 January 2020 Current Affairs In Marathi
16 January 2020 Current Affairs In Marathi

16 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 जानेवारी 2020)

शिवसेनाप्रमुखांच्या नावे कृषी स्मार्ट योजना :

  • शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजना 2100 कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात येणार आहे.
  • कृषी व कृषीपूरक व्यवसायांच्या विकासासाठी ही योजना असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत सदर योजनेला मान्यता देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.
  • तसेच या योजनेसाठी जागतिक बँक 1470 कोटी रुपयांचे कर्ज देईल. राज्य शासनाचा हिस्सा 560 कोटी रुपये असेल तर सीएसआर फंडातून 70 कोटी रुपये देण्यात येतील. स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणन विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
  • तर यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, अस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समित्यांना ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे जोडण्याची सुविधा यांचा समावेश आहे.
  • प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या, साधारण स्वारस्य गट, शेतकरी स्वारस्य गट यांची स्थापना करण्यासह त्यांचे बळकटीकरण आणि कौशल्य विकास करण्यात येणार आहे.धान्य व फळे-भाज्या बाजार समुहाची स्थापना केली जाणार आहे.

रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण :

  • प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकींचे उच्च प्रतीची व्यावसायिक मूल्ये जपून वार्ताकन करणाऱ्या मुद्रण, प्रक्षेपण आणि डिजिटल क्षेत्रातील पत्रकारांना पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत 20 जानेवारी रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
  • रामनाथ गोएंका स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे.
  • तर या पुरस्कारांचे हे 14 वे वर्ष आहे. यंदा 25 लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून मुद्रण, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील 16 वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
  • तसेच व्यापारी, आर्थिक, क्रीडा, राजकीय वार्ताकन, चित्रपट आणि दूरदर्शन पत्रकारिता, नागरी पत्रकारिता, पर्यावरणविषयक वार्ताकन, युद्धभूमीवरील पत्रकारिता आणि प्रादेशिक भाषेतील वार्ताकन आदी वर्गवारींचा त्यात समावेश आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात पदकांची आघाडी :

  • खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची पदकांची आघाडी नेहमीप्रमाणे कायम राहिली आहे.
  • महाराष्ट्राची आता 28 सुवर्ण, 32 रौप्य आणि 50 कांस्यपदकांसह एकूण 110 पदके झाली आहेत.
  • महाराष्ट्राच्या खालोखाल हरयाणाचा 23 सुवर्णासह (73 पदके) दुसरा क्रमांक कायम आहे.
  • तर या स्पर्धेत सायकलिंग आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक पदके मिळत आहेत. सहाव्या दिवशीही ही सोनेरी कामगिरी कायम राहिली.

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धात कार्लसनचा विश्वविक्रम :

  • विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला.
  • तर त्याने सर्वाधिक 111 सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कार्लसनने त्याच्या नावे केला आहे.
  • तसेच याआधी हा विश्वविक्रम हॉलंडचे सर्जी टिव्हियाकोव यांच्या नावावर होता. जो 15 वर्षांपासून अबाधित होता.
  • कार्लसन सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सलग चौथ्या फेरीत कार्लसनने बरोबरी पत्करली. चौथ्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन  फॉरेस्टविरुद्धचा डाव कार्लसनने बरोबरीत सोडवला.

मुंबईचा ‘हिटमॅन’ ठरला जगात भारी :

  • टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला ICC कडून सर्वोकृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूच्या (ODI Cricketer of the Year) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • 2019 या वर्षात दमदार खेळी करत रोहितने सर्वाधिक एकदिवसीय धावा ठोकल्या.
  • तसेच एका वर्षात त्याने एकूण सात शतके लगावली. त्यापैकी पाच शतके त्याने World Cup 2019 मध्ये झळकावली होती.
  • तर रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधील वर्षभराच्या कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय कर्णधार विराट कोहली याला त्याने केलेल्या एका स्तुत्य कामगिरीसाठी ICC चा खिलाडूवृत्तीचा सन्मान करणारा पुरस्कार (ICC spirit of cricket) देण्यात आला आहे.
  • तसेच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबूशेन याला वर्षातील उदयोन्मुख क्रिकेटपटूचा (Men’s emerging cricketer of the year) पुरस्कार मिळाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने तुफानी कामगिरी केली. लाबूशेनने 11 सामन्यात 1 हजार 104 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मार्नस लाबूशेनला केवळ 11 कसोटी सामने खेळल्यानंतर ICC च्या कसोटी फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
  • World Cup 2019 च्या अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला ICC चा विश्वातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोकृष्ट क्रिकेटपटू (Sir Garfield Sobers Trophy for the world player of the year) म्हणून गौरविण्यात आले.
  • तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला ICC चा सर्वोकृष्ट कसोटीपटू (Test Cricketer of the Year) निवडण्यात आले. पॅट कमिन्सने 2019 च्या कसोटी क्रिकेटमध्ये 59 बळी टिपले.
  • भारताच्या दीपक चहरला टी 20 क्रिकेटमधील वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरीचा (T20I Performance of the Year) पुरस्कार मिळाला. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत त्याने 7 धावांत 6 बळी टिपले. त्या कामगिरीसाठी दीपक चहरला पुरस्कार मिळाला.
  • तर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड इलिंगवर्थ यांना ICC चे 2019 मधील सर्वोत्तम पंच म्हणून गौरविण्यात आले. तर स्कॉटलंडच्या कायल कोएत्झर याला ICC च्या संलग्न संघांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार करण्यात आला. त्याने 48.88 च्या सरासरीने धावा केल्यामुळे त्याला पुरस्कार मिळाला.

राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व :

  • भारताची आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे 25 जानेवारीपासून ऑकलंड येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
  • हॉकी इंडियाने गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. या दौऱ्यातील भारताचा पहिला सामना न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्ध 25 जानेवारी रोजी तर न्यूझीलंडच्या महिला संघाविरुद्ध 27 आणि 29 जानेवारी रोजी उर्वरित दोन सामने होतील.
  • तसेच त्यानंतर भारतीय संघ 4 फेब्रुवारी रोजी ग्रेट ब्रिटनशी दोन हात करेल आणि 5 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडच्या महिला संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याने या दौऱ्याची सांगता होईल.

दिनविशेष:

  • सन 1681 मध्ये छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला होता.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सन 1941 मध्ये देशाबाहेर प्रयाण.
  • पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते सन 1955 मध्ये उद्घाटन झाले होते.
  • सन 2008 मध्ये टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.