16 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

16 October 2018 Current Affairs In Marathi

16 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2018)

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन :

 • जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे.
 • जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे.
 • तसेच अॅलन यांनी आपले बालपणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.
 • तर क्रीडा प्रकारात अधिक रस असलेले अॅलन हे पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि सिएटल सिहॉक्सचे प्रमुख होते.
 • अॅलन आणि बिल गेट्स यांनी 1975 मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.

देशात ‘आयआयटी-मुंबई’ अव्वल :

 • शिक्षण क्षेत्रातील क्यूएस (क्वाकक्वारेली सायमंड्स) या ब्रिटिश कंपनीने केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात आयआयटी-मुंबईला सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे. तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूला दुसरे आणि आयआयटी-मद्रासला तिसरे स्थान मिळाले आहे.
 • जागतिक पातळीवर शिक्षणसंस्थांना मानांकन देताना संस्थेच्या शैक्षणिक नावलौकिक किंवा प्रतिष्ठेसाठी 40 टक्के गुण होते. तर भारतीय पातळीवर याच बाबीसाठी 30 टक्के गुण होते. केली होती.
 • तसेच क्वाक्वारेली सायमंड्स(क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसेच विविध खंडांतील विद्यपीठांचे मूल्यांकन जाहीर करते. जगभरातील विद्यपीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता अशा अनेक बाबी तपासून त्यानंतर हे मूल्यांकन जाहीर करण्यात येते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2018)

प्राथमिक शिक्षकही आता उपशिक्षणाधिकारी पदासाठी पात्र :

 • उपशिक्षणाधिकारी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची अडवणूक करणार्‍या तत्कालीन शिक्षण आयुक्तांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद अर्थात ‘मॅट’ने दणका दिला. उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांसाठी (एमपीएससीद्वारे) जिल्हा परिषद सेवेतील पदवीधर प्राथमिक शिक्षकही पात्र आहेत, असा निर्णय मॅटने दिला आहे.
 • जिल्हा परिषद अधिनियम 1967 अन्वये विस्तार अधिकारी, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक हे जिल्हा तांत्रिक सेवा गट ‘क’मध्ये मोडतात. तर पदवीधर शिक्षक जिल्हा सेवेत मोडतात. या सर्व पदांची पात्र अर्हता प्रशिक्षित पदवीधर अशी आहे.
 • परंतु जिल्हा परिषद सेवेतील पदवीधर प्राथमिक शिक्षक हा जिल्हा तांत्रिक सेवा गट ‘क’मध्ये समाविष्ट नसल्याने विभागीय परीक्षा देण्यास पात्र नाही, असे पत्र शिक्षण आयुक्तांनी 19 मे 2017 रोजी काढले होते.

डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ :

 • वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधत डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाड्यांमध्ये मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 • राज्य मराठी विकास संस्था आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या गाड्यांमधील मासिक पासधारकांना पुस्तकांची ही आगळीवेगळी सेवा वर्षभर नि:शुल्कपणे उपलब्ध होणार आहे.
 • तर माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त सोमवारी प्रथम मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेस आणि नंतर मुंबई-नाशिक मार्गावरील पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली आहे.
 • मराठी भाषा विभागाचे वाचनदूत या दोन गाड्यांमध्ये खास पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॉलीमधून प्रवाशांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देतील.

दिनविशेष

 • 16 ऑक्टोबर 1868 मध्ये डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.
 • भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश 16 ऑक्टोबर 1905 मध्ये दिला.
 • 16 ऑक्टोबर 1978 मध्ये माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
 • 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2018)

You might also like
1 Comment
 1. Harendra chaware says

  Very nice guide

Leave A Reply

Your email address will not be published.