15 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 October 2018 Current Affairs In Marathi

15 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2018)

हर्षदा निठवेचा दुहेरी सुवर्णवेध:

  • वरळी येथील महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवर सुरू असलेल्या 35व्या राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात औरंगाबादच्या हर्षदा निठवेने महिलांच्या सीनियर आणि ज्युनियर अशा दोन्ही गटात सुवर्णपदक पटकाविले. या दोन्ही गटात कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझपदक जिंकले. Harshada
  • 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात युवा गटात पुण्याच्या श्रेया बदाडेने 565 गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. 50 मीटर फ्री पिस्तुल प्रकारात मुंबई उपनगरच्या अनिकेत खिडसे व ज्युनियर गटात पुण्याच्या कुणाल ससेने सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • अलीकडेच झालेल्या पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये मुंबई उपनगरच्या रोनक पंडितने सुवर्ण जिंकले होते तर ज्युनियर आणि युवा गटात कोल्हापूरच्या तेजस ढेरेने दुहेरी चमक दाखविली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2018)

रेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार:

  • रेल्वेत बसलेले प्रवासी लवकरच गुन्ह्य़ासंदर्भात झीरो एफआयआर दाखल करू शकतीलत्याची चौकशी रेल्वे पोलिस दलाचे सदस्य तातडीने सुरू करतील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
  • महिलांची छळवणूक, चोरी, दरोडे यांबाबतच्या तक्रारी मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून घेण्यास मध्य प्रदेशातील पथदर्शक प्रकल्पात सुरुवात करण्यात आली असून त्याची पुनरावृत्ती सगळ्या देशात केली जाणार आहे.
  • आता प्रवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी पुढचे स्थानक येण्याची वाट पाहावी लागणार नाही. ते मोबाइल उपयोजनाच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतील, त्यानंतर लगेच रेल्वे पोलिस त्याची चौकशी सुरू करतील. अशी माहिती रेल्वे पोलिस दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली. या तक्रारीला झीरो एफआयआर म्हटले जाते. त्यात लगेच चौकशी सुरू केली जाईल.

युवा ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सिमरनला रौप्यपदक:

  • भारताची कुस्तीपटू सिमरनने युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली. महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील 43 किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे पदक पटकावले आहे.
  • तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरनने अमेरिकेच्या इमिली शिल्सनला चांगली लढत दिली. पण अंतिम फेरीत सिमरनला विजय मिळवता आला नाही. इमिलीने सिमरनवर अंतिम फेरीत 11-6 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदक पटकावले.

‘अलाहाबाद’ शहर आता ‘प्रयागराज’ नावाने ओळखले जाणार:

  • उत्तर प्रदेशात आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. याची जोरदार तयारी सुरु असून या कुंभमेळ्यापूर्वीच अलाहाबाद शहराचे नामकरण प्रयागराज करण्यासाठी सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 14 ऑक्टोबर रोजी कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली, यावेळी त्यांनी अलाहाबादच्या नामकरणाची घोषणा केली. Prayagraj Station
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत अलाहाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्यपाल राम नाईक यांनी देखील यापूर्वीच सहमती दर्शवली होती. त्यानंतर कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, योगींच्या घोषणेनंतर अलाहाबादचे नाव बदलण्यावरुन त्यांना विरोधही हाऊ लागला आहे.

टेनिसपटू लिएण्डर पेसला चालू वर्षात दुसर्‍यांदा विजेतेपद:

  • अनुभवाच्या बळावर आपण आजही अनेक स्पर्धामध्ये युवकांना हेवा वाटेल, अशी कामगिरी करू शकतो, हे भारतीय टेनिसपटू लिएण्डर पेसने पुन्हा सिद्ध केले.
  • मेक्सिकन सहकारी मिगुएल अँजेल रेईस व्हॅरेलासह पेसने सँटो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. पेसचे हे वर्षांतील दुसरे विजेतेपद ठरले.
  • एक तास व 26 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात व्दितीय मानांकित मिगुएल-पेस जोडीने एरियल बेहार व रॉबटरे क्विरोझ यांच्यावर 4-6, 6-3, 10-5 असा विजय मिळवला.
  • जागतिक क्रमवारीत 69व्या स्थानावर असणाऱ्या पेस आणि मिगुएलच्या जोडीला गेल्या आठवडय़ात माँटेरे चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. न्यूपोर्ट खुल्या टेनिस स्पर्धेत मिळवलेले विजेतेपद पेसचे वर्षांतील पहिले विजेतेपद होते.

नव्या वाहनपरवान्यातही येणार ‘QR Code’:

  • सध्या दिला जाणाऱ्या वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांमध्ये (आरसी) मोठे बदल केले जाणार आहेत. या नव्या बदलानुसार वाहनपरवाना आणि आरसी एका विशिष्ट रुपात मिळणार आहे. यामध्ये रंग, डिझाईन आणि सुरक्षेच्या मानकामध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे. पुढील वर्षी जुलै महिन्यात दिले जाणाऱ्या वाहनपरवान्यात हे बदल केले जाणार आहेत.
  • सध्या वाहनपरवाना आणि वाहनाचे कागदपत्रे (आरसी) स्मार्टकार्ड स्वरूपात दिले जात आहेत. मात्र, नव्याने देण्यात येणाऱ्या वाहनपरवाना आणि आरसीमध्ये मायक्रोचिपसह क्यूआर कोड असणार आहे.
  • तसेच या नव्या वाहनपरवान्यात एटीएम आणि मेट्रोसारखे निअर-फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) फिचर असेल. या नव्या फिचरमुळे वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना संबंधित वाहन आणि वाहनचालकाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
  • वाहनचालकाने वाहनपरवाना काढताना अवयवदानाबाबत जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीही यामधून समजणार आहे. याशिवाय अपंगत्व असलेल्या व्यक्तीबाबतची माहित मिळणार आहे.

भारताकडून वेस्ट इंडीजला ‘व्हाईटवॉश’:

  • जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत वेस्ट इंडीजला सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला. दुसऱ्या कसोटीत भारताने विंडीजचा दहा गडी राखून पराभव केला.
  • हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 367 धावा करत विंडीजविरुद्ध 56 धावांची आघाडी घेतली. या आघाडीनंतर बॅकफूटवर गेलेल्या विंडीजच्या संघाला दुसऱ्या डावात अवघ्या 127 धावांत भारतीय गोलंदाजांनी गुंडाळले. पहिल्या डावातील भारताचा यशस्वी गोलंदाज उमेश यादवने दुसऱ्या डावातही कमाल केली. उमेशने 4 बळी मिळविले. तर, रवींद्र जडेजाने तीन, अश्विनने दोन आणि कुलदीपने एक बळी मिळविला. विंडीजचा पहिल्या डावातील शतकरीवर चेस दुसऱ्या डावात अवघ्या सहा धावा करू शकला. विंडीजकडून अॅम्ब्रेसने सर्वाधिक 38 धावा केला.
  • वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने दुसऱ्या दिवशीच पकड घट्ट बसवण्यास सुरवात केली होती. विंडीजचे 72 धावांचे आव्हान भारतीय सलामीवीरांनी सहजरित्या पार करत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या कसोटीत डावाने विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला विंडीजने दुसऱ्या कसोटीत थोडाफार प्रतिकार केला. विंडीजचा नवखा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. आता एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.

दिनविशेष:

  • 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ आहे.
  • सन 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
  • 15 ऑगस्ट 1918 हा दिवस भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचा स्मृतीदिन आहे.
  • वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला.
  • हरगोविंद खुराणा यांना सन 1968 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.