16 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

स्कॉट हॉल
स्कॉट हॉल

16 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 मार्च 2022)

BCCI ने आयपीएल 2022 साठी बदलले ‘हे’ महत्त्वाचे नियम :

  • आयपीएल 2022 मध्ये अनेक नवीन नियम पाहायला मिळतील.
  • आयपीएलच्या 15व्या हंगामापूर्वी बीसीसीआयने आयपीएलच्या खेळात काही मोठे बदल केले आहेत.
  • जर संघ प्लेइंग इलेव्हन तयार करू शकला नाही तर तो सामना नंतर पुन्हा शेड्यूल केला जाईल. त्यानंतरही सामना झाला नाही, तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल.
  • आयपीएल 2022 मधील दुसरा सर्वात महत्वाचा बदल DRS बाबत आहे.
  • तर नवीन नियमानुसार, बीसीसीआयनुसार, प्रत्येक डावातील डीआरएसची संख्या एक वरून दोन करण्यात आली आहे.
  • बीसीसीआयने हा निर्णय मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) नुकत्याच दिलेल्या सूचनेच्या समर्थनार्थ घेतला आहे की, फलंदाज झेल घेत असताना क्रिझच्या मध्यभागी असला तरीही नवीन फलंदाजाने स्ट्राइकवर यावे.
  • आयपीएल 2022 मध्ये आणखी एक नियम खूप खास असणार आहे. या वेळी बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की प्लेऑफ किंवा अंतिम सामन्यात टाय झाल्यानंतर, सुपर ओव्हर किंवा त्यानंतर सुपर ओव्हरने कोणताही निर्णय न झाल्यास लीग टप्प्यातील खेळ पाहिला जाईल.
  • तसेच जो संघ लीग टप्प्यात अव्वल असेल तो विजेता मानला जाईल. याचाच अर्थ आता सर्व संघांसमोर हे आव्हान असेल की प्लेऑफमध्ये पात्र ठरण्याबरोबरच या संघाला गट टप्प्यातही अव्वल स्थान मिळवावे लागेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मार्च 2022)

आरबीआयने आठ को-ऑपरेटिव्ह बँकांना ठोठावला 12 लाखांचा दंड :

  • नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने देशातील विविध राज्यांमध्ये असलेल्या सहकारी बँकांना 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  • तर या सहकारी बँकांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील बँकांचा समावेश आहे.
  • तसेच या सहकारी बँकांवर विविध प्रकारच्या आर्थिक अनियमितता दिसल्याने आरबीआयने ताशेरे ओढले आहेत.
  • डिपॉझिटर एज्युकेशन अ‍ॅण्ड अवेअरनेस फंडमध्ये दावा न केलेल्या ठेवी जमा न करणे, बँक घोटाळ्यांचा उशिरा अहवाल देणे आणि असुरक्षित कर्जे वितरित करणे या कारणांमुळे काही बँकांना दंड ठोठावण्यात आला.

WWE सुपरस्टार स्कॉट हॉलचे निधन :

  • प्रतिस्पर्ध्याला गुंतवून टाकणारे डावपेच आणि आपल्या पिळदार देहयष्टीने समोरच्याला घाम फोडणारा दिग्गज कुस्तीपटू स्कॉट हॉलचे वयाच्या 63 व्या वर्षी दुखद निधन झाले.
  • स्कॉटने 1990 मध्ये WWE मध्ये पदार्पण केले होते.
  • मात्र त्याआधी स्कॉटने NWA, AWA, WCW कुस्ती स्पर्धेत भाग घेतलेला होता.
  • तसेच स्कॉटने सुरुवातीला डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये फक्त एका वर्षासाठी कुस्ती खेळली होती.
  • त्यानंतर तो जपान प्रो रेस्टलिंग आणि कॅच रेस्टलिंग असोशिएशनमध्ये कुस्ती खेळण्यासाठी गेला. हा काळ त्याने चांगलाच गाजवला.
  • त्यानंतर 1992 मध्ये तो पुन्हा एखदा WWE मध्ये कुस्ती खेळण्यासाठी परतला.
  • तर आपल्या दुसऱ्या पदार्पणात त्याने चांगलीच कामगिरी करुन तब्बल चार वेळा इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियन होण्याची किमया करुन दाखवली.

दिनविशेष:

  • 16 मार्च 1521 मध्ये फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
  • फत्तेपूर सिक्री येथे 16 मार्च 1528 मध्ये राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
  • 16 मार्च 1649 मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
  • भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी 16 मार्च 1911 मध्ये मांडला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.