15 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

एन चंद्रशेखरन
एन चंद्रशेखरन

15 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 मार्च 2022)

एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :

  • टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवार यासाठी मंजुरी देण्यात आली.
  • टाटा सन्सने नुकतेच एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते, त्यानंतर यासाठी अध्यक्षाचा शोध सुरू होता.
  • मात्र, आता या सर्वोच्च पदावरील नियुक्तीला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
  • चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत, जी 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांची होल्डिंग कंपनी आणि प्रवर्तक आहे.

12-14 वयोगटाचे लसीकरण उद्यापासून :

  • देशातील 12 ते 14 वयोगटातील मुलांचे करोना लसीकरण बुधवार, 16 मार्चपासून सुरू करण्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केली.
  • हैदराबाद येथील बायॉलॉजिकल इ. लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या कोर्बेव्हॅक्स या करोना लशीद्वारे 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
  • त्याचबरोबर 60 वर्षांवरील नागरिकही आता वर्धक मात्रा घेऊ शकतील, असेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मार्च 2022)

महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’लागू होण्याचा मार्ग मोकळा :

  • महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा महाराष्ट्रात लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
  • कारण, राष्ट्रपती रामनाथकोविद यांनी या बहुप्रतीक्षित शक्ती विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही माहिती दिली.
  • महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवले होते.
  • ‘शक्ती’ कायदा डिसेंबंर विधानसभेत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केला होता.
  • तर आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्यावरून हा कायदा करण्यात आला आहे.
  • त्यानुसार शक्ति फौजदारी कायदा( महाराष्ट्र सुधारणा) विधेयक गेल्या वर्षी अर्थसंल्पीय अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात आले होते.
  • तसेच या कायद्यात समाजमाध्यमांवर महिलांची बदनामी, अ‍ॅसीड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत.

भारताचा श्रीलंकेवर 238 धावांनी दणदणीत विजय :

  • भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी दणदणीत पराभव केला आहे.
  • याचबरोबर दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे.
  • भारताने T20 नंतर कसोटी मालिकेतही क्लीन स्वीप दिला आहे.
  • श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
  • तर पहिल्या डावात 109 धावांवर बाद झालेल्या श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात केवळ 208 धावाच करू शकला.

दिनविशेष:

  • 15 मार्च : जागतिक ग्राहक हक्क दिन
  • 15 मार्च 1493 मध्ये भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
  • मुघल सम्राट अकबर याने 15 मार्च 1564 मध्ये हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
  • 15 मार्च 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
  • मेन हे अमेरिकेचे 15 मार्च 1820 मध्ये 23वे राज्य बनले.
  • 15 मार्च 1827 मध्ये टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.