16 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

16 July 2019 Current Affairs In Marathi

16 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 जुलै 2019)

नौदलाला लवकरच मिळणार 100 टॉरपॅडो मिसाईल :

  • येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या
    स्कॉर्पिअन क्षेणीच्या सहा पाणबुड्यांमध्ये हे टॉरपॅडो मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत.
  • 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी 10 दिवसांपूर्वीच एक टेंडर जारी करण्यात आले आहे. स्कॉर्पिअन क्षेणीच्या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकमध्ये सुरू असून त्यांना कलवरी क्लास हे नाव देण्यात आले आहे.
  • तसेच या क्षेणीमधील पहिली पाणबुडी यापूर्वीच नौदलात दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या ती पाणबुडी ऑपरेशनल मोडमध्ये आहे. सध्या परदेशी विक्रेत्यांकडून नौदलाची मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी त्यानंतरची मागणी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.
  • तर डीआरडीओ पाणबुड्यांसाठी तसेच लढाऊ युद्धनौकांसाठी हेवीवेट टॉरपॅडो मिसाईलचा वापर करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्स, स्वीडन, रशिया आणि जर्मनीच्या जागतिक उत्पादकांना हेवीवॅट टॉरपॅडोसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे.
  • यापूर्वी इटालियन फर्म ‘ब्लॅक शार्क टॉरपॅडो’ या कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर घोटाळ्यातील नमेक्केनिका समुहाच्या गुंतवणुकीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जुलै 2019)

इंजिनमधल्या गळतीमुळे रद्द झालं चांद्रयान 2 चं उड्डाण :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान 2 या महत्त्वाकांक्षी अवकाशयानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा तांत्रिक बिघाड नेमका काय होता ते आता समोर आले आहे.
  • चांद्रयान 2 च्या इंजिनमधील गळतीमुळे हे उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आता समोर आली आहे.
  • GSLV MK 3 च्या क्रायोजेनिक इंजिनातील हेलियमच्या गळतीमुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली.
  • तर इंजिनात लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरल्यानंतर हेलियम भरण्याचे काम सुरु होते.

अंधांना चलनी नोटा ओळखता येण्यासाठी नवे अ‍ॅप :

  • अंधांना चलनी नोटा सहज ओळखता याव्यात, यासाठी एक अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) रिझर्व बँक ऑफ इंडियाने विकसित करण्याचे ठरवले असून सध्यातरी रोखीच्या व्यवहारांना महत्त्व असल्याने त्याचा वापर करता येणार आहे.
  • सध्या 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 या नोटा चलनात असून एक रुपयाची नोट केंद्राने जारी केली आहे.
  • तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे, की नोटा ओळखणे अंधांना सोपे नसते. त्यामुळे या नोटांमधील खुणांच्या माध्यमातून त्या ओळखणे आवश्यक असते त्यासाठी 100 व त्यावरील चलनाच्या नोटात अंधांसाठी खास ओळख
    पटवणाऱ्या सुविधा आहेत पण त्या त्यांना माहिती नाहीत.
  • अंधांना या नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व बँक प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी मालिका व महात्मा गांधी नवी मालिका यातील नोटांच्या प्रतिमा घेऊन प्रस्तावित मोबाइल अनुप्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

दिनविशेष :

  • सन 622 मध्ये प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
  • अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी 16 जुलै 1945 मध्ये केली.
  • सन 1965 मध्ये ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.
  • गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय 16 जुलै 1998 रोजी घेण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जुलै 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.