17 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 July 2019 Current Affairs In Marathi

17 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 जुलै 2019)

घरगुती वीज वापरासाठी लवकरच प्रिपेड सुविधा :

 • घरात पंखे, दिवे, एसी आणि इतर वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे.
 • अर्थात केंद्र सरकार आता घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत असून वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर
  बसवण्यात येणार आहेत.
 • केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या योजनेबाबत सांगितले की, भारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहे, यामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता
  येणार आहे.
 • तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्र, यासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील.
 • तर प्रिपेड मीटरमुळे ग्राहकांना घरपोच बील पाठवण्याची कटकट संपेल. वीज कंपन्यांवर थकीत वीजबीलांचा भार राहणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे वीज कंपन्यांची स्थिती सुधारेल. त्यामुळे ही सेवा अधिकाधिक सक्षम होण्यास मदत होईल. यामुळे खऱ्या अर्थाने वीज क्षेत्रात क्रांती येईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 जुलै 2019)

रावसाहेब दानवेंचा भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा :

 • भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर दानवेंनी दिल्लीत याबाबत घोषणा केली आहे.
 • त्यामुळे आता राज्यातील आगामी विधानसभा निडवणुकांमध्ये भाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.
 • भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
 • विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने नवा प्रदेशाध्यक्ष नेमून त्याच्याकडे पक्षाच्या संघटनेची जबाबदारी सोपविली जाईल.
 • केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान :

 • भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते स्मृती आणि रोहन यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • तसेच गेल्या वर्षभरात स्मृती आणि रोहन यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या संघटनांनी त्यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि या
  दोघांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिनविशेष :

 • 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन म्हणून पाळला जातो.
 • सन 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
 • दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म सन 1930 मध्ये 17 जुलै रोजी झाला.
 • वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे 17 जुलै 1955 रोजी डिस्नेलँड सुरू केले.
 • कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म 17 जुलै 1923 रोजी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जुलै 2019)

You might also like
1 Comment
 1. Shital says

  Very nice i like it

Leave A Reply

Your email address will not be published.