15 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

15 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 फेब्रुवारी 2023)

भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा:

 • शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.
 • काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.
 • काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे.
 • छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे आणि आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.

निकी हॅले अध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या शर्यतीत:

 • रिपब्लिकन पक्षाच्या निकी हॅले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये उतरण्याचे जाहीर केले आहे.
 • उमेदवारीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या रिपब्लिकन नेत्या ठरल्या आहेत.
 • अमेरिकेत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
 • त्यापूर्वी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जानेवारी 2024 मध्ये निवडणूक होईल.
 • हॅले या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या दोन वेळा गव्हर्नर होत्या तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

शुबमन गिल ठरला ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’:

 • भारताचा नवा स्टार फलंदाज शुबमन गिल याने जानेवारी महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ जिंकला आहे.
 • त्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे यांना मागे टाकत हे विजेतेपद पटकावले आहे.
 • जानेवारी महिन्यात गिलने चमकदार कामगिरी केली.
 • त्याने ODI मध्ये द्विशतक तसेच T20I मध्ये शतक झळकावले आणि आता तो महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू बनला आहे.
 • एकदिवसीय क्रिकेटमधील आणखी एका चांगल्या कामगिरीनंतर गिलने ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • गिलने जानेवारीत 567 धावा केल्या, ज्यात तीन शतकांपेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
 • शुबमन गिल व्यतिरिक्त, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक डेव्हॉन कॉनवे हे प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराचे दावेदार होते.

दिनविशेष :

 • 15 फेब्रुवरी 399 मध्ये सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 • कॅनडाने नवीन ध्वज 15 फेब्रुवरी 1965 मध्ये अंगिकारला.
 • 15 फेब्रुवरी 1710 मध्ये फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म झाला.
 • कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे 15 फेब्रुवरी 1960 मध्ये निधन झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.