14 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

14 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 फेब्रुवारी 2023)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात मोठ्या ‘एअर शो’चं उद्घाटन:

  • एअरो इंडिया 2023 या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोला सुरूवात झाली आहे.
  • हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूच्या येलाहंका येथे होणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एअर शोचं उद्घाटन पार पडलं.
  • दरम्यान, यामध्ये भारतीय हवाई दलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहेत.
  • हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनवर पार पडेल.
  • तसेच हवाई दलात नव्याने सहभागी झालेलेल्य ‘तेजस’ हे लढाऊ विमान या एअर शोचे मुख्य आकर्षण असणार आहे.

विराट पाठोपाठ आता स्मृतीही करणार आरसीबीचे प्रतिनिधित्व:

  • भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाला महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वाधिक बोली लागली आहे.
  • स्मृती मंधानाला आरसीबी संघाने 3.40 कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.
  • विशेष म्हणजे विराट कोहलीही आरसीबीकडून खेळतो.
  • विराट कोहली पाठोपाठ आता स्मृती मंधाना आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहेत.
  • महिला आयपीएलसाठी पहिली बोली स्मृती मंधानाला लागली. जी आजपर्यंतची सर्वात मोठी बोली देखील ठरली.

इऑन मॉर्गनने सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती:

  • इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • इंग्लंडने 2019 साली विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
  • या स्पर्धेत मॉर्गनने इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते.
  • इऑन मॉर्गनचे क्रिकेटमधील करिअर एकूण 16 वर्षे राहिले.
  • मॉर्गनच्या नेतृत्वातच इंग्लंडलने 2019 साली पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • मॉर्गनने 126 एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या टीमचे नेतृत्व केले.

दिनविशेष:

  • 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे‘ म्हणून साजरा केला जातो.
  • पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1483 मध्ये झाला.
  • सन 1881 मध्ये भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना झाली.
  • सन 1924 मध्ये संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना झाली.
  • सन 1946 यावर्षी बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.