10 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
10 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 डिसेंबर 2019)
भारती एअरटेल परदेशी कंपनी बनण्याच्या मार्गावर:
- देशातील मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आता परदेशी कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे.
- भारती एअरटेलची प्रमोटर भारती टेलिकॉमनं 4 हजार 900 कोटी रूपयांच्या परदेशी गुंतवणुकीसाठी दूरसंचार विभागाची परवानगी मागितली आहे. दूरसंचार विभागाकडून कंपनीला परवानगी मिळाल्यास भारती एअरटेल ही परदेशी दूरसंचार कंपनी बनणार आहे.
- तर असं झाल्यास भारती टेलिकॉममध्ये परदेशी शेअरहोल्डिंग 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार आहे.
- अहवालानुसार, भारती टेलिकॉमने सिंगापूरच्या सिंगटेल आणि इतर काही परदेशी कंपन्यांकडून गुंतवणूक वाढवण्यासाठी मंजुरीसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार विभागाकडून याच महिन्यात भारती एअरटेलला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी दूरसंचार विभागानं भारती एअरटेलचा अर्ज नामंजुर केला आहे.
Must Read (नक्की वाचा):
दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी मिस युनिव्हर्स :
- जगभरातील 90 देशांच्या प्रतिनिधींमधून मिस युनिव्हर्स म्हणून दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी हिची निवड करण्यात आली आहे.
- अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व स्टिव्ह हार्वे यांनी टायलर पेर्री स्टुडिओ येथे झालेल्या स्पर्धेत 26 वर्षीय टुंझी ही मिस युनिव्हर्स झाल्याचे जाहीर केले.
- तर 2018 ची मिस युनिव्हर्स फिलिपाइन्सची कॅट्रिओना ग्रे हिने टुंझीला मुकुट परिधान केला.
- भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘मिस इंडिया’ वर्तिका सिंग हिने पहिल्या 20 जणांमध्ये आपले स्थान निश्चित केले होते.
- तर मिस पोटरे रिको मॅडिसन अँडरसन ही द्वितीय तर मिस मेक्सिकन अॅश्ली अल्वीड्रेज हिने तृतीय स्थान पटकावले.
- पहिल्या पाच जणींमध्ये कोलंबिया आणि थायलंडच्या स्पर्धकांनी स्थान निश्चित केले.
नागरिकत्व विधेयक लोकसभेत मंजूर :
- नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.
- तर हे विधेयक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्य समाजासंबंधी आहे. पाकिस्तानमध्ये मुस्लिम अल्पसंख्य नाहीत. म्यानमार हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून तेथील रोहिंग्या बांगलादेशातून येतात. त्यांना कधीही निर्वासित म्हणून स्वीकारले जाणार नाही.
- तसेच संविधानातील अनुच्छेद 14 मध्ये समाविष्ट असलेल्या समान हक्कांचे या दुरुस्ती विधेयकामुळे उल्लंघन होत नाही. त्यामुळे हे विधेयक संसदेत मांडणे अवैध ठरत नाही, असे स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिले.
- 1959 मध्ये नेहरू-लियाकत यांच्यातील करारनुसार, त्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण होणे अपेक्षित होते.
- तर या विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीनच शेजारी देशांतील अल्पसंख्याक व्यक्तींना नागरिकत्व दिले जाणार आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव करणे हे संविधानविरोधी असल्याचा युक्तिवाद विरोधी पक्षांतील वक्त्यांनी केला.
सना मरीन यांना जगातील सर्वात कमी वयाचा पंतप्रधान होण्याचा बहुमान :
- सना मरीन या फिनलँड या देशाच्या तसेच जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत.
- जगातील सर्वात कमी वयाचा पंतप्रधान बनण्याचा बहुमान फिनलँडच्या माजी मंत्री सना मरीन यांना मिळाला आहे.
- तर वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्या या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत.
- माजी परिवहन असलेल्या सना मरीन या फिनलँडच्या राजकारणात सक्रीय असून इथल्या सोशल डेम्रोकेट पार्टीने रविवारी पंतप्रधानपदासाठी त्यांची निवड केली. त्यामुळे त्या केवळ या देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वांत तरुण पंतप्रधान बनल्या आहेत.
- तसेच त्यांनी मावळते पंतप्रधान एन्टी रिने यांची जागा घेतली आहे.
- सना मरीन (वय 34) या जगातील सर्वाधिक तरुण राष्ट्रप्रमुख बनल्या आहेत. त्यांच्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होन्चारुक (वय 35) हे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
‘तेजस’ होणार अधिक शक्तीशाली, बनवणार Mk-2 व्हर्जन :
- तेजस (एमके-2) या फायटर विमानाच्या व्यावसायिक उत्पादनाला पुढच्यावर्षी फेब्रुवारी 2020 पासून सुरुवात होणार आहे. एॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश एस देवधरे यांनी ही माहिती दिली. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे.
- तेजसचे एमके 2 व्हर्जन शक्तीशाली रडारसह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज असणार आहे. या फायटर जेटच्या एव्हिऑनिक्स सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली असून ते दृष्टीपलीकडच्या लक्ष्यावर प्रहार करण्यास सक्षम असेल.
- तर Mk-1 आणि Mk-1A पेक्षा तेजस Mk-2 ची इंधन टाकी मोठी असून त्यावरुन जास्त शस्त्रास्त्रे वाहून नेता येतील.
- इंडियन एअर फोर्स तेजस Mk-1 आणि Mk-2 व्हर्जनची 123 विमाने विकत घेणार आहे. जुन्या झालेल्या फायटर विमानांच्या जागी स्वदेशी बनावटीची विमाने विकत घेणार असल्याचे आएएफकडून सरकारला सांगण्यात आले आहे.
- फ्रेंच बनावटीची मिराज-2000 आणि रशियन मेड मिग-29 फायटर विमानांची जागा घेण्यासाठी तेजस Mk-2 ची निर्मिती करण्यात येणार आहे.
- बालाकोट एअर स्ट्राइकसाठी आयएएफने मिराज-2000 विमानांचा वापर केला होता. नियोजित कार्यक्रमानुसार तेजस Mk-2 चे पहिले उड्डाण 2024 मध्ये अपेक्षित आहे.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात पदकांच्या त्रिशतकाकडे भारताची वाटचाल :
- काठमांडू (नेपाळ) येथे सुरू असलेल्या 21व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने निर्विवाद वर्चस्वाची मालिका कायम राखताना पदकांच्या त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
- सोमवारी भारताने 27 सुवर्ण, 12 रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह एकूण 42 पदकांची कमाठी केली.
- तर त्यामुळे भारताच्या खात्यावर 159 सुवर्ण, 91 रौप्य, 44 कांस्य पदकांसह एकूण 294 पदके जमा आहेत.
दिनविशेष:
- 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.
- सन 1901 मध्ये नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
- संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सन 1916 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ ‘प्रा. अमर्त्य सेन‘ यांना प्रदान झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा