10 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

बेन स्टोक्स
बेन स्टोक्स

10 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 एप्रिल 2020)

भारताचे संशोधक करोनावर शोधणार लस, ऑस्ट्रेलियाशी केला करार :

  • आजवर जगभरात सुमारे 88000 लोकांचा बळी घेणाऱ्या आणि लाखो लोकांना लागण झालेल्या कोरोना विषाणू (कोविड-19) वर लस शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केल्याची घोषणा इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने केली आहे.
  • भारतात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत कराराच्या माध्यमातून सहयोग साधला आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढण्यासाठी या सहयोगातून प्रचंड प्रमाणावर संशोधन हाती घेतले जाणार आहे.
  • तर या दोन खंडांमधील या लक्षणीय सहकार्यामुळे आयआयएल आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया)मधील वैज्ञानिक कोडोन डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘लाइव्ह अटेन्युएटेड सार्स – सीओव्ही-2 लस’ किंवा कोविड-19 लसीचा शोध लावणार आहेत.
  • तसेच अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह हे रोगप्रतिबंधक, सक्रिय, सिंगल डोस प्रतिकारात्मक औषध मानवी शरीरात कोरोना विषाणूंशी लढण्यासाठीची लस तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान आश्वासक आहे. या लसीमुळे एकाच डोसमधून दीर्घकाळ सुरक्षितता आणि इतर अधिकृत सक्रिय रोगप्रतिकारक लसींप्रमाणे लाभ मिळणे अपेक्षित आहे.
  • संशोधन पूर्ण झाल्यानंतर या लसीचे अंश इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला हस्तांतरित केले जातील आणि लस बनवणाऱ्या कंपन्या देशातील सीडीएससीओ (द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)च्या नियमनानुसार टप्प्याटप्प्याने पुढील क्लिनिकल चाचण्या घेतील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 एप्रिल 2020)

बेन स्टोक्सने केला दमदार विक्रम :

  • इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने भारतीय कर्णधार विराट कोहली याचे संस्थान खालसा केले.
  • 2020 चा आघाडीचा विस्डन क्रिकेटपटू पुरस्कार (Wisden’s leading cricketer in the world) बेन स्टोक्सला जाहीर करण्यात आला.
  • महत्त्वाचे म्हणजे तब्बल 15 वर्षांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूला हा पुरस्कार मिळाला आहे. या आधी 2005 साली अँड्र्यू फ्लिंटॉफ याला हा पुरस्कार मिळाला होता.
  • तर भारतीय कर्णधार विराट कोहलीला गेले 3 वर्षे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, पण यंदा मात्र हा पुरस्कार बेन स्टोक्सच्या नावे झाला आहे.
  • 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील त्याची कामगिरी आणि अॅशेस मालिकेतील त्याच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने मिळवलेला विजय यामुळे त्याला विस्डन आघाडीचा क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • तसेच महिला क्रिकेटपटूंमध्ये विस्डन सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार एलिस पेरी हिला जाहीर करण्यात आला. एलिस पेरीला वर्षातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंच्या यादीतही स्थान मिळाले आहे. 2016 मध्येदेखील तिला हा पुरस्कार मिळाला होता.
  • तर एलिस पेरीसह मार्नस लाबूशेन आणि पॅट कमिन्स या दोघांचाही सर्वोत्तम 5 खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

लॉकडाऊन बबद ‘या’ राज्यानं घेतला महत्वाचा निर्णय :

  • देशातील कोरोनाचे संक्रमण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केले.
  • मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे.
  • परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयाआधीच ओडिशा सरकारने 30 एप्रिलपर्यत राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
  • त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारं ओडिशा पहिलं राज्य आहे. तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 17 जूनपर्यंत बंद राहतील अशी माहिती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली. त्याचप्रमाणे 30 एप्रिलपर्यंत रेल्वे व हवाई सेवा सुरू न करण्याची विनंती देखील नवीन पटनाईक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

शेजारी देशांमध्ये विशेष विमानाने पोहोचवली औषधे :

  • भारताप्रमाणे अन्य शेजारचे देशही करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. भारताने या देशांना मदत पाठवायला सुरुवात केली आहे.
  • तर सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचे ठरणारे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध भारताने या देशांना पाठवले आहे. साऊथ ब्लॉकमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
  • तसेच हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन ही गोळी करोना व्हायरसवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. अमेरिकेने याच औषधाच्या निर्यातीसाठी भारतावर दबाव टाकला होता.
  • भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत.
  • मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून 10 टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे.
  • अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

दिनविशेष:

  • होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी झाला.
  • विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म 10 एप्रिल 1843 मध्ये झाला.
  • बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म 10 एप्रिल 1894 मध्ये झाला होता.
  • अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. धनंजय रामचंद्र तथा द.रा. गाडगीळ यांचा जन्म 10 एप्रिल 1901 रोजी झाला.
  • इंग्लंडमधील साऊथम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने 1912 यावर्षी पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
  • सन 1955 मध्ये योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.