9 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी
खासगी लॅबमध्येही मोफत करोनाची चाचणी

9 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 एप्रिल 2020)

खासगी लॅबमध्येही चाचणी होणार मोफत :

  • सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. आता खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी करु शकतात.
  • तर आधी खासगी लॅबमध्ये करोनाच्या टेस्टसाठी 4 हजार 500 रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यास संमती होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे खासगी लॅबमध्येही चाचणी मोफत होईल असं म्हटलं आहे.
  • वकील शशांक देव सुधी यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. करोनाचा प्रादुर्भाव रोखणं ही सरकारची जबाबदारी आहे. लॉकडाउनमध्ये अनेक लोकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशात लोक चाचणी महाग आहे म्हणून ती करणार नाहीत. ज्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं.
  • त्यामुळेच सरकारी रुग्णालयात ज्या प्रमाणे करोनाची चाचणी मोफत होते तशीच खासगी लॅबमध्येही करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 एप्रिल 2020)

यूपी पोलिसांसाठी 50 लाखांचा विमा देण्याची घोषणा :

  • राज्य सरकार करोनाशी लढा देत असताना जीव धोक्यात घालून रस्त्यांवर बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांसाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
  • तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना 50 लाखांचा विमा देण्याची घोषणी केली आहे. लवकरच यासंबंधी आदेश जारी केला जाणार आहे.
  • तसेच अविनाश अवस्थी यांनी माहिती देताना, मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंबंधी लवकरच लिखीत आदेश जारी केला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
  • दुसरीकडे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मंगळवारी आदेश देताना जिल्ह्यात करोनाची चाचणी करण्यासाठी कलेक्शन सेंटर स्थापले जाणार असल्याचं सांगितलं. तसंच सहा ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु कऱणार असल्याची माहिती दिली.
  • याआधी पंजाब पोलिसांनी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखांचं विमा संरक्षण देत असल्याचं जाहीर केलं होतं.

डॉक्टरांसाठी सुरक्षा मास्क तयार केला फक्त 50 रुपयांत :

  • कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टरांना सुरक्षितपणे उपचार करता यावा, यासाठी हैदराबादमधील संशोधन संस्थेने मास्क तयार केला आहे.
  • तर त्याची किंमत अवघी पन्नास रुपये आहे. डॉक्टरांना सुरक्षा मिळण्याबरोबरच उपचारामध्येदेखील सुलभता येणार आहे.
  • हैदराबादमधील एल. व्ही. प्रसाद डोळ््यांच्या संस्थेने ही कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने वैयक्तिक सुरक्षा साधनांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. विशेषत: बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याची नितांत आवश्यकता आहे.

बेन स्टोक्स ‘विस्डेन’चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू :

  • इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने भारताचा कर्णधार विराट कोहली याचे मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असलेले वर्चस्व मोडीत काढून बुधवारी 2019 चा विस्डेनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा (विस्डेन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड) पुरस्कार पटकावला आहे.
  • विस्डेन क्रिकेटर्स 2020 ने 2019 मधील कामगिरीसाठी स्टोक्सला हा सन्मान बहाल केला. याआधी सलग तीन वर्षे (2016 ते 2018) हा पुरस्कार कोहलीने जिंकला होता. हा एक विक्रम आहे.
  • तसेच यंदा मात्र विस्डेनच्या पुरस्कार यादीत एकाही भारतीय पुरुष किंवा महिला खेळाडूचे नाव नाही.
  • 2003 ला हा पुरस्कार सुरू झाल्यापासून इंग्लंडच्या खेळाडूने पुरस्कार पटकाविण्याची केवळ दुसरी वेळ आहे. 2005 ला अ‍ॅन्ड्र्यू फ्लिन्टॉप याची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
  • तर ऑस्ट्रेलियाची अ‍ॅलिस पेरी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली. या यादीत ऑस्ट्रेलियाचे आणखी दोन खेळाडू आहेत.

टाळेबंदीचा कालावधी वाढणार :

  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिले.
  • तर शनिवारी, 11 एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी पुन्हा बैठक बोलावली असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
  • टाळेबंदीचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र विविध राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि तज्ज्ञांकडून टाळेबंदी कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.
  • करोनामुळे देशात ‘सामाजिक आणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाला कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत.

दिनविशेष:

  • समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी झाला.
  • पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म 9 एप्रिल 1887 मध्ये झाला.
  • सन 1967 मध्ये बोइंग-767 या विमानाने पहिले उड्डाण केले होते.
  • सन 1994 सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांना आर.डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • लता मंगेशकर यांना सन 1995 मध्ये अवधरत्न अनई साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.