‘उडान’ योजनेबद्दल संपूर्ण माहिती

‘उडान’ योजनेबद्दल संपूर्ण माहिती

  • अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Central Board of Secondary Education: CBSE) ‘उडान’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
  • आयआयटीसारख्या अभियांत्रिकी महाविध्यालयांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे.
  • या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलींचा सहभाग वाढावा यासाठी ‘उडान’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • योजनेतील ठळक मुद्दे –
  1. गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून आभियांत्रिकी प्रवेश परीक्षा प्रशिक्षणासाठी 1000 मुलींची निवड केली जाईल.
  2. प्रशिक्षणासाठी सध्या 11 वी 12 वी मध्ये असणाऱ्या आणि दहावीला किमान 70% गुण (त्यामध्ये गणित व विज्ञानाला 80% गुण) मिळवलेल्या विद्यार्थिनी पात्र ठरू शकणार आहेत.
  3. तसेच 12 वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलींना अकरावीमध्ये विज्ञान आणि गणित विषयांत 75% गुण असणे अनिवार्य आहे.
  4. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना प्राधान्य दिले जाणार असून आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.