नाम : लिंग
Must Read (नक्की वाचा):
तुम्हाला माहीत आहे की, सजीव हे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असतात. आता खालील जोडयांमधील शब्दांची तुलना करा.
Boy |
Girl |
sparrow |
sparrow |
Cock |
Hen |
Hero |
Heroine |
Lion |
Lioness |
- प्रत्येक जोडीतील पहिला शब्द हे नराचे (Male animal) नाव आहे.
- प्रत्येक जोडीतील दूसरा शब्द हे मादीचे (Female animal) नाव आहे.
- जे नाम नर किंवा पुरुषजातीचा उल्लेख करते त्या नामाला (Masculine Gender) पुल्लिंगी असे म्हणतात.
- Gender हा शब्द लॅटिन भाषेतील genus (म्हणजे जाती किंवा प्रकार) या शब्दापासून निर्माण झाला आहे.
- जे नाम मादी किंवा स्त्री-जातीचा उल्लेख करते त्या नामाला स्त्रीलिंगी (Feminine Gender) असे म्हणतात.
- जे नाम पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही एका जातीचा उल्लेख करते त्या नामाला उभयलिंगी (Common Gender) असे म्हणतात.
उदा :
- Parent, child, friend, pupil, servant, thief, relation, enemy, counsin, person, orphan, student, baby, monarch, neighbour, infant.
- जे नाम अशा गोष्टीचा निर्देश करते, जी नर किंवा नारी जातीची नाही. (म्हणजेच निर्जीव वस्तू) त्या नामाला नपुंसकलिंगी (Neuter Gender) असे म्हणतात.
उदा.
- Book, pen, room, tree
- (Neuter म्हणजे दोन्हीही नाही. म्हणजेच नर ही नाही व मादीही नाही) आधुनिक इंग्रजीमध्ये कोणत्याही नामाचे लिंग हे पुर्णपणे लिंगाच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरून ठरते, इतर अनेक भाषांमध्ये नामाच्या रूपावरुन त्याचे लिंग ठरविले जाते.
- परंतु इंग्रजीमध्ये नामाच्या रूपावरुन लिंग ठरविले जात नाही.
- उदाहरणार्थ – उर्दूमध्ये बगीचे हे पुल्लिंगी (Masculine) आहे आणि लकडी हे स्त्रीलिंगी (Feminine) आहे.
- जेव्हा निर्जीव वस्तूंचे मानवीकरण (Personified) केले जाते, म्हणजे सजीव वस्तूप्रमाणे त्याचे वर्णन केले जाते. तेव्हा आपण त्याला पुरुष (Male) किंवा स्त्री (Female) असे मानतो.
- बरेचदा शक्ती (stength) आणि हिंसा (violence) याचे धोतक असणार्या वस्तूंसाठी पुल्लिंगी नामाचा वापर करतात.
उदा.
- The Sun, Summer, Winter, Time, Death,
- The sun sheds his beams o rich and poor alike.
- कधीकधी सौंदर्य (Beauty), कोमलपणा (Gentleness) आणि मोहकता (Gracefulness) यांचे धोतक असणार्या वस्तूंसाठी स्त्रीलिंगी नामाचा (Feminine Gender) वापर करतात.
उदा.
- The Moon, the Earth, Spring, Autumn, Nature, Liberty.
- Justice, Mercy, Peace, Hope, Charity.
- The moon has hidden her face behind a cloud.
- Speing has spread her mantle of green over the earth.
- Peace hath her victories no less renowned than war.
- अशा प्रकारचा (नामाचा) उपयोग बहुतेक करून कवितेत प्रचलित आहे. पण गद्धातही काही नामांचे मानवीकरण केले जाते. ship साठी नेहमी she असे वापरतात.
उदा.
- The ship lost all (her) boats in the storm.
- नामाची स्त्रीलिंगी (Feminine) रुपे बनविण्याचे प्रकार
- नामाची स्त्रीलिंगी रुपे बनविण्याचे तीन प्रकार आहेत. –
1. पूर्णत: वेगळ्या शब्दांचा वापर करून.
उदा.
पुल्लिंगी |
स्त्रीलिंगी |
Bull (or ox) |
cow |
Bullock |
heifer |
Buck |
doe |
Brother |
sister |
Boy |
girl |
Bachelor |
maid, spinster |
Masculine |
Feminine |
Cock |
hen |
Gander |
goose |
Father |
mother |
Earl |
countess |
Drone |
bee |
Drake |
duck |
Dog |
bitch |
Colt |
filly |
2. शब्द+अव्यय जोडून;
उदा :-
पुल्लिंगी |
स्त्रीलिंगी |
Author |
authoress |
Masculine |
Feminine |
Lion |
lioness |
Manager |
manageress |
Jew |
jewess |
Host |
hostess |
Heir |
heiress |
Giant |
giantess |
Count |
countess |
Baron |
baroness |
(लक्षात ठेवा की खालील पुल्लिंगी नामांकित (Masculine Nouns) अंतिम स्वर (Vowel) गाळून -ess असे लावले जाते.)
Actor | actress |
Shepherd | shepherdess |
Prophet | prophetess |
Priest | priestess |
Poet | poetess |
Peer | peeress |
Patron | patroness |
Mayor | mayoress |
Conductor | conductress |
Benefactor | benefactress |
टीप – पुल्लिंगी नामांचे स्त्रीलिंगी रूप बनविण्यासाठी ‘ess’ प्रत्यय (suffix) वापरणे सर्वात जास्त प्रचलित आहे आणि केवळ हाच असा प्रत्यय आहे ज्याचा वापर नवीन स्त्रीलिंगी नाम बनविण्यासाठी आता आपण करतो.
Hero | heroine |
Fox | vixen |
Signor | signora |
Sultan | sultana |
Czar | czarina |
3. पहिल्या किंवा शेवटच्या शब्दात बदल करून –
पुल्लिंगी | स्त्रीलिंगी |
Washerman | washerwoman |
Salesman | saleswoman |
Peacock | peahen |
Milkman | milkwoman |
Landlord | landlady |
Manservant | maidservant |
Greatuncle | greataunt |
Grandfather | gandmother |
Masculine | Feminine |