नाम व त्याचे प्रकार

नाम व त्याचे प्रकार

Must Read (नक्की वाचा):

वाक्यांश व उपवाक्य

  • वस्तु, व्यक्ती व स्थान यांच्या नावाला नाम (Noun) असे म्हणतात.
  • टीप – वस्तु हा शब्द ज्याचा आपण विचार करू शकतो अशा कोणत्याही गोष्टीसाठी वापरतात.
  • खलील वाक्य पाहा –
  1. Asoka was wise king.
  • Ashoka हे नाम एका विशिष्ट राजाचा संदर्भ देते. परंतु king हे नाम इतर कोणत्याही राजासाठी आणि Ashoka साठी पण वापरू शकतो.
  • आपण Ashoka या शब्दाला विशेषनाम (Proper Noun) व king या शब्दाला सामान्य नाम (Common Noun) असे म्हणतो. अशाप्रकारे –
  1. Sita is a Proper Noun, while girl is a Common Noun.
  2. Hari is a Proper Noun, while boy is a Common Noun.
  3. Kolkata is a Proper Noun, while city is a Common Noun.
  4. India is a Proper Noun, while country is a Common Noun.
  • Girl शब्द सामान्य नाम (Common Noun) आहे. कारण या शब्दामुळे मुलींच्या संपूर्ण जातीचा बोध होतो, पण Sita हा शब्द विशेषनाम (Proper Noun) आहे कारण हे एका विशिष्ट मुलीचे नाव आहे.
  • व्याख्या – सामान्य नाम म्हणजे एकाच वर्ग किंवा जातीतील प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तु यांना दिलेले सामायिक नाव. (Common म्हणजे सर्वाचा/सर्वांचा मिळून असणारे).
  • व्याख्या – विशेषनाम म्हणजे एखाधा विशिष्ट व्यक्ती किंवा ठिकाणाचे नाव.
  • (Proper म्हणजे एखाद्याचे स्वत:चे म्हणून विशेषनाम म्हणजे एखादया व्यक्तीचे स्वत:चे नाव.
  • टीप – 1. विशेषनामांचे (Proper Nouns) सुरूवातीचे अक्षर पहिल्या लिपीत असते.
  • टीप – 2 विशेषनामे (Proper Nouns) ही कधीकधी सामान्यनाम (Common Noun) प्रमाणे वापरली जातात.

उदा.

  1. He was the (Lukman) (=the wisest man) of his age.
  2. Kalidas is often called the Shakespeare(= the greatest dramatist) of India.
  • सामान्य नामांमध्ये (Common Nouns) समुहवाचक नामे (Collective Nouns) आणि भाववाचक नामे ही (Abstract Nouns) अंतर्भूत असतात.
  • समूहवाचक नाम (Collective Noun) म्हणजे अनेक व्यक्ती किंवा वस्तु यांना एकत्रितपणे विचारात घेऊन त्यांना दिलेले एक संघ नाव.
  • उदा :- Crowd, mob, team, flock, herd, army, fleet, jury, family, nation, parliament, committee.

  1. A fleet= a collection of ships or vessels.
  2. An army = a collection of soliders.
  3. A crowd = a collection of of people.
  4. The police dispersed the crowd.
  5. The French army was defeated at Waterloo.
  6. The jury found the prisoner guilty.
  7. A herd of cattle is passing.
  • भाववाचक नाम (Abstract Noun) हे सर्वसाधारणपणे संलग्न गोष्टींपासून ज्याचा स्वतंत्रपणे विचार केला जातो, असा एखादा गुणधर्म, क्रिया किंवा स्थितीचे नाव असते.
  • उदा :-

    Quality – Goodness, Kindness, whiteness, darkness, hardness, brightness, honesty, wisdom, bravery.

  • Action – Laughter, theft, movement, judgement, hatred.
  • State – Childhood, boyhood, youth, slavery, sleep, sickness, death, proverty.
  • विविध कला (Arts) आण शास्त्रांची (Sciences) नावे. जसे – (व्याकरण, संगीत, रसायन शास्त्र इ.) ही भाववाचक नामे होत.
  • [आपण शूर शिपाई (A brave soldier), बलाढ्य व्यक्ती (A strong man), सुंदर फूल (A beautiful flower) असे म्हणतो.

    परंतु आपण या गुणांचा विशिष्ट व्यक्ती किंवा वास्तु व्यक्तिरिक्तही विचार करू शकतो आणि शोर्य (Bravery), शक्ती (Strength) किंवा सुंदरता (Beauty) हे स्वतंत्रपणे वापरू शकतो.

  • अशा तर्‍हेने आपण व्यक्तींना काय वाटते किंवा त्या काय करतात हे त्या व्यक्तींच्या संदर्भाशिवायही बोलू शकतो व त्या भावनेला नाव देऊ शकतो. (Abstract) या शब्दाचा अर्थ आहे ‘च्यापासुन दूर काढलेला.’]
  • भाववाचक नामे (Abstract Nouns) अशी निर्माण होतात.

1. विशेषनांपासून उदा :- (King पासून Kingdness; Honest पासून Honesty)

2. क्रियापदांपासून उदा :- (Obey पासून Obedience; Grow पासून growth)

3. सामान्य नामापासून उदा :- (Child पासून Childhood, Slave पासून Slavery)

 

  • ‘गणनीय’ (Countable) किंवा ‘अगणनीय’ (uncountable) असे नामाचे आणखी एक वर्गीकरण आहे.
  • गणनीय नामे (Countable Nouns) ही ज्यांची गणना करता येते अशा व्यक्ती किंवा वस्तू यांची नावे असतात.
    उदा. book, pen, apple, boy, doctor, horse.

  • अगणनीय नामे (Uncountable Noun) ही ज्यांची गणना करता येत नाही अशा व्यक्ती किंवा वस्तू यांची नावे असतात.
  • उदा. milk, oil, sugar, gold, honesty. ही मुख्यत: तत्वे आणि अमूर्त वस्तू सूचित करतात.
  • गणनीय नामांचे अनेकवचन होते तर अगणनीय नामांचे अनेकवचन होत नाही.
  • उदा – आपण ‘books’ म्हणतो. परंतु ‘milks’ म्हणू शकत नाही.  
Must Read (नक्की वाचा):

उद्देश व विधेय

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.