शब्दाच्या जाती

शब्दाच्या जाती

Must Read (नक्की वाचा):

नाम व त्याचे प्रकार

  • उपयोगानुसार आणि त्यांच्या वाक्यातील कार्यानुसार शब्द विविध प्रकारांत किंवा भागांत विभागले गेले आहेत. त्याला शब्दाच्या जाती (Parts of speech) असे म्हणतात.
  • शब्दाच्या जाती 8 आहेत.

1. नाम (Noun)

2. सर्वनाम (Pronoun)

3. विशेषण (Adjective)

4. क्रियापद (Verb)

5. क्रिया विशेषण (Adverb)

6. शब्दयोगी अव्यय (Preposition)

7. उभयान्वयी अव्यय (Conjunction)

8. केवल प्रयोगी अव्यय (Interjection)

 

  • कोणतीही वस्तु, व्यक्ती किंवा ठिकाणच्या नावाला नाम (Noun) असे म्हणतात.

उदा.

  1. Akbar was a great King.
  2. Kolkata is on the Hooghly.
  3. The rose smells sweet.
  4. The Sun shines bright.
  5. His courage won him honour.
  • टीप – ‘वस्तु’ (Thing) या शब्दात खालील गोष्टी समाविष्ट आहेत.

i. आपण बघू शकतो, ऐकू शकतो, चव घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो किंवा गंध घेऊ शकतो अशा सर्व गोष्टी, तसेच

ii. अशा गोष्टी ज्याविषयी आपण विचार करू शकतो पण ज्याचे आपल्याला ज्ञानेन्द्रियांव्दारे ज्ञान होत नाही.

 

  • नामाच्या (Noun) अर्थामध्ये भर टाकणार्‍या शब्दाला किंवा नामविषयी अधिक माहिती देणार्‍या शब्दाला विशेषण (Adjective) असे म्हणतात.

उदा.

  1. He is a brave boy.
  2. There are twenty boys in this class.
  • नामाऐवजी वापरण्यात येणार्‍या शब्दाला सर्वनाम (Pronoun) असे म्हणतात.

उदा.

  1. John is absent, because he is ill.
  2. The books are where you left them.
  • एखादी व्यक्ती, वस्तु किंवा पदार्थ याविषयी काही सांगण्यासाठी वापरण्यात येणार्‍या शब्दाला क्रियापद (Verb) असे म्हणतात.

उदा.

  1. The girl wrote a letter to her cousin.
  2. Kolkata is a big city.
  3. Iron and copper are useful metals.
  • क्रियापद, विशेषण किंवा दुसरे क्रिया विशेषण यांच्या अर्थामध्ये भर टाकणार्‍या शब्दाला क्रिया विशेषण (Adverb) असे म्हणतात.

उदा.

  1. He worked the sunm quicky.
  2. This flower is very beautiful.
  3. She pronounced the word quite correctly.
  • एखादे नाम किंवा सर्वनाम यांनी उल्लेख केलेल्या व्यक्ती किंवा वस्तु यांचा दुसर्‍या एखदया गोष्टीशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्व नामाबरोबर वापरण्यात येणार्‍या शब्दाला शब्दयोगी अव्यय (Preposition) असे म्हणतात.

उदा.

  1. There is a cow in the garden.
  2. The girl is fond of music.
  3. A fair little girl sat under a tree.
  • शब्द किंवा वाक्यांना जोडणार्‍या शब्दाला उभयान्वयी अव्यय (Conjunction) असे म्हणतात.

उदा.

  1. Rama and Hari are counsins.
  2. Two and two make four.
  3. I ran fast, but missed the train.
  • अचानक उदभवलेल्या उत्कृष्ट भावना व्यक्त करण्यासाठी वापण्यात येणार्‍या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा.

  1. Hurrah ! we have won the game.
  2. Alas ! she is dead.
  • आधुनिक व्याकरणामध्ये निर्णय घेणार्‍या किंवा निश्चित करणार्‍या शब्दांना; शब्दांच्या जाती या विभागात सामावून घेतले आहे.
  • वाक्यात नामांच्या अर्थाच्या संदर्भाला जे शब्द निश्चित स्वरूप देतात/आकार देतात त्यांना निर्धारक असे म्हणतात.
  • A, an, the, this, that, these, those, every, each, some, any, my, his, one, two इत्यादी हे निर्धारक आहेत.
  • बर्‍याच पारंपारिक व्याकरणाप्रमाणे या पुस्तकात a, an, the यापेक्षा वेगळ्या अशा सर्व निर्णय देणार्‍या/निश्चितता दाखवणार्‍या शब्दांना त्यांच्या उपयोगानुसार विशेषणांमध्ये वर्गीकृत केले आहे.
  • शब्दांना वाक्यातील त्यांच्या भूमिकेप्रमाणे विविध जातीत विभाजित केले जाते.
  • वाक्यात एखादा शब्द कसा उपयोजिला आहे, हे पाहिल्याशिवाय तो शब्द कोणत्या जातीत मोडला जातो; हे सांगता येत नाही, हे स्पष्ट आहे.
  1. They arrived soon after. (Adverb)
  2. They arrived after us. (Preposition)
  3. They arrived after we had left. (Conjunction)
  • वरील उदाहरणांवरून असे लक्षात येते की, एकच शब्द शब्दांच्या विविध जातींत वापरता येतो.
Must Read (नक्की वाचा):

वाक्यांश व उपवाक्य

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.