नाम : विभक्ती

नाम : विभक्ती

Must Read (नक्की वाचा):

नाम : लिंग

  • ही वाक्ये अभ्यासा –
  1. John thew a stone.
  2. The horse kicked the boy.
  • पहिल्या वाक्यातील John हे नाम कर्ता आहे. ते ‘कोणी दगड मारला?’ या प्रश्नाचे उत्तर आहे. ‘threw a stone’ शब्दसमूह हे विधेय आहे.
  • विधेयात Threw हे क्रियापद आलेले आहे.
  • John नी काय फेकले? दगड. John ने फेकलेली वस्तू म्हणजे Stone. म्हणून Stone (दगड) हे नाम कर्म (Object) आहे.
  • दुसर्‍या वाक्यात नाम horse (घोडा) हे कर्ता आहे. ते ‘मुलाला कोणी लाथ मारली?’ या प्रश्नाचे उत्तर आहे.
  • Boy हे नाम, कर्म आहे. ते ‘कुणाला घोडयाने लाथ मारली?’ या प्रश्नाचे उत्तर देते.
  • जेव्हा एखादे नाम किंवा सर्वनाम (Noun or Pronoun) हे क्रियापदाचा कर्ता (Subject) म्हणून वापरले जाते. तेव्हा त्याला प्रथमा विभक्ती Nominative case असे म्हणतात.
  • जेव्हा एखादे नाम किंवा सर्वनाम (Noun or Pronoun) क्रियापदाचे कर्म (Object) म्हणून वापरले जाते तेव्हा त्याला व्दितीया विभक्ती (Accusative case) असे म्हणतात.

टीप –

  • प्रथमा विभक्ती (Nominative case) शोधण्यासाठी क्रियापदाला कोण who? किंवा काय? what? असे विचारले जाते.
  • व्दितीया विभक्ती (Objetive case) शोधण्यासाठी क्रियापदाला आणि त्याच्या कर्त्याला कोणाला? whom? किंवा काय? what? असे विचारले जाते.
  • शब्दयोगी अव्यया (Preposition) नंतर येणारे नामदेखील व्दितीया विभक्ती आहे, असे म्हंटले जाते.

उदा :-  

  1. the book is in the desk.
  • desk हे नाम व्दितीया विभक्तीत आहे. कारण ते in या शब्दयोगी अव्ययाने नियंत्रित केले आहे.
  • खालील वाक्ये वाचा.
  1. Hari broke the window. (Object)
  2. The window was broken. (Subject)
  • असे दिसते की, इंग्रजीमध्ये प्रथमा (Nominative) आणि व्दितिया (अक्कूसतिवे) विभक्ती नामांचे रूप सारखेच असते.
  • सामन्यात: प्रथम विभक्ती क्रियापदाच्या आधी येते आणि व्दितिया क्रियापदानंतर म्हणून त्यांचे शब्दांच्या क्रमानुसार किंवा अर्थांनुसार विभाजन करता येते.
  • खालील वाक्यांची तुलना करा. –
  1. Rama gave a ball.
  2. Rama gave Hari a ball.
  • यातील प्रत्येक वाक्यामध्ये नाम ball he gave चे कर्म (object) आहे.
  • दुसर्‍या वाक्यात असे सांगितले आहे की, ज्याला ball दिला ती व्यक्ती हरी आहे.
  • नाम हरी हे क्रियापद gave चे अप्रत्यक्ष कर्म (Indirect object) आहे.
  • नाम ball जे सामान्य कर्म आहे त्याला प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात.
  • असे लक्षात येईल की अप्रत्यक्ष कर्म हे क्रियापदाच्या लगेच नंतर आणि प्रत्यक्ष कर्मांच्या आधी येते.

टीप :-

  1. Rama gave Hari a ball = Rama gave a ball to Hari.
  2. Will you do me a favour? = Will you do a favour to me?
  3. I bought Rama ba ball = I bought a ball for Rama.
  4. Fetch the boy a book = Fetch a book for the boy.
  5. She made Ruth a new dress = She made a new dress for Ruth.
  6. Get me a taxi = Get a taxi for me.
  • वरील उदाहरणांवरून असे लक्षात येते की, क्रियापदाचे अप्रत्यक्ष कर्म अशा व्यक्तीचा निर्देश करते जिला काही दिले आहे किंवा जिच्यासाठी काही केले आहे.
  • खालील वाक्य अभ्यासा. –
  1. This is Rama’s umbrella.
  2. Rama’s umbrella = the umbrella belonging to Rama.
  • मालकी हक्क Ownership किंवा स्वामित्व possession दाखविण्यासाठी नाम Rama चे रूप बदलून Rama’s असे झाले आहे. म्हणून नाम Rama’s हे षष्ठी विभक्तीत Genitive case आहे, असे म्हटले जाते.
  • षष्ठी विभक्ती (Possessive) किंवा (Genitive case) ही (कोणाचे?) whose? या प्रश्नाचे उत्तर देते.
  • Whose umbrella?- Rama’s.
  • षष्ठी विभक्ती (Possessive) ही नेहमी स्वामित्व (Possession) दर्शविते, असे नाही. ही लेखनकार्य (authorship), स्त्रोत (origin), प्रकार (kind) इत्यादी दर्शविण्यासाठीदेखील वापरली जाते. जसे –
  1. Shakespeare’s plays     = the plays written by Shakespeare.
  2. A mother’s love           = the love felt by a mother.
  3. The President’s speech = the speech delivered by the President.
  4. Mr. Aggarwal’s house   = the house where Mr. Aggarwal lives.
  5. Ashok’s school            = the school where Ashok goes.
  6. A children’s playground= a playground for children.
  7. A week’s holiday          = a holiday which lasts a week.

षष्ठी विभक्ती (Possessive case) तयार करण्याची पद्धत (FORMATION OF THE POSSESSIVE CASE) :

1. जेव्हा नाम एकवचनी असते तेव्हा नामाला s लावून त्याची षष्ठी विभक्ती केली जाते.

उदा :-

  1. The boy’s book; the king’s crown.
  • सूचना – असे काही शब्द ज्यांच्या उच्चाराने सS S S असा ध्वनी (hissing sound) निर्माण होतो, तेथे ‘S’ लावला जात नाही.

उदा :-

  1. For conscience’ sake; for goodness’ sake;
  2. For justice’ sake; for Jesus’ sake; Moses’ laws.

2. जेव्हा नाम अनेकवचनी असते आणि त्या शेवटी s अक्षर असेल तेव्हा षष्ठी विभक्ती बनविण्यासाठी त्याला फक्त apostrophe लावला जातो.

उदा :-  

  1. Boys’ school; girls’ school; horses’ tails.  

3. जेव्हा नाम अनेकवचनी असते पण त्याच्या शेवटी s नसेल तर s लावतात.

उदा :-

  1. Men’s club; children’s books.
  • जेव्हा नाम किंवा मथळे (titles) अनेक शब्दांनी बनलेले असतात तेव्हा फक्त शेवटच्या शब्दाला s चिन्ह लावले जाते.
  1.  The King of Bhutan’s visit.
  2.  The Prime Minister of Mauritiuss’ speech.
  • जेव्हा दोन नामे एका विभक्तीत असतील तेव्हा षष्ठी विभक्ती निर्देश apostrophe नंतरच्या नामाला लावला जाता.
  1.  That is Tagore the poet’s house.
  • जेव्हा दोन नामांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो तेव्हा फक्त नंतरच्या नामाला षष्ठी विभक्ती निर्देश प्रत्यय (apostrophe) (‘s) लावला जातो.
  1.  Karim and Salim’s bakery.
  2.  Willam and Mary’s reign.
  • प्रत्येकाचे स्वतंत्र स्वामित्व दर्शविणार्‍या दोन किंवा दोनपेक्षा अधिक परस्पर संबंधित नामांना षष्ठी विभक्ती निर्देश प्रत्यय लावतात.
  1. Raja Rao’s and R.K. Narayan’s novels.
  2. Goldsmith’s and Cowper’s poems.

षष्ठी विभक्तीचा (Possessive case) उपयोग (USE OF THE POSSESSIVE CASE) :

  • षष्ठी विभक्तीचा वापर हल्ली मुख्यत्वे सजीवांच्या नावांच्या संदर्भात केला जातो.

उदा :-  

  1. The Governor’s bodyguard; the lion’s माने. तेव्हा आपण असे म्हंटले पाहिजे –
  2. The leg of the table [not, the table’s leg].
  3. The cover of the book.[not, the book’s cover].
  4. The roof of the house [not, the house’s roof].
  • परंतु (Personified) निर्जीव वस्तूंचा मानवी गुणधर्माशी संबंध जोडला जातो तेव्हा त्याला मानवीकरण असे म्हणतात. त्याची षष्ठी विभक्ती होते.
  • India’s heroes; Nature’s laws; Fortune’s favourite; at duty’s call; at death’s door.
  • वेळ(time), स्थान(space) किंवा माप (measure) दाखविणार्‍या नामांसाठी पण षष्ठीविभक्ती वापरतात.

उदा :-

  • A day’s march; a week’s holiday; in a year’s time; a stone’s throw; a foot’s length; a pund’s weight.
  • खालील वाक्यांशसुद्धा सर्वसाधारणपणे वापरले जातात.
  • At his finger’s ends; for mercy’s sake; to his heart’s content; at his wit’s end; a boat’s crew.
  • विशेषनाम अथवा व्यापार, व्यवसाय किंवा संबंधदर्शक नामांची षष्ठी ही वास्तु किंवा कारभाराची जागा (चर्च, घर, शाळा, महाविधालय, दुकान, इस्पितळ, नाट्यगृह इ.) यांचा उल्लेख करण्यासाठी वापरता येत.

उदा.   

  1. She has gone to the baker’s(=baker’s shop).
  2. Tonight I am dining at may uncle’s (= uncle’s house).
  3. Can you tell me the way t St. Paul’s (= St. Paul’s church)?
  4. I attend the Town High School but my cousin attends St. Xavier’s.
  5. He was educated at St. Joseph’s.
  • जेव्हा शंका असेल की नामाचा उपयोग षष्ठी विभक्ती Possessive case मध्ये करावा की of शब्दयोगी अव्यया (Preposition) बरोबर करावा, त्व्ह लक्षात ठेवा की, सामान्य नियमांनुसार षष्ठी विभक्तीचा उपयोग मालकी हक्क (Possession) व स्वामित्व (Ownership) दाखविण्यासाठी होतो. म्हणून ‘the enemy’s defeat’ च्या ऐवजी ‘The defeat of the enemy’ म्हणणे अधिक योग्य आहे.
  • जारी अर्थाबद्दल शंका नसली तरीही कधीकधी षष्ठी विभक्तीत (Possessive case) वापरण्यात आलेल्या नामाचा अर्थ ‘of’ या शब्दयोगी अव्यया (Preposition) बरोबर वापरायत आलेल्या नामाच्या अर्थापेक्षा भिन्न असतो.

उदा.

  1. ‘The prime Minister’s reception in Delhi’ चा अर्थ आहे ‘दिल्लीत प्रधानमंत्र्यांकडून केलेला स्वागत समारंभ’
  2. ‘The reception of the Prime Minister in Delhi’ चा अर्थ आहे ‘प्रधानमंत्र्यानी दिल्लीत प्रवेश केल्यावर लोकांनी केलेल्या त्यांच्या स्वागताची पद्धत’
  3. ‘The Love of a father’ ह्या वाक्यांशाचा अर्थ एक तर ‘वडिलांचे आपल्या मुलावरील प्रेम’ किंवा ‘मुलाचे आपल्या वडिलांवरील प्रेम’ यांपैकी कोणताही होऊ शकतो.
  • जेव्हा निर्जीव वस्तूची गणना एखाधा प्राण्यासारखी केली जातो तेव्हा त्याला Personified म्हटले जाते.

समानाधिकरण (NOUNS IN APPOSITION) :

  • खालील वाक्ये वाचा – Rama, our captain made fifty runs.
  • आपल्या असे लक्षात येते की, Rama आणि our captain दोन्ही एकच व्यक्ती आहेत. Captain हे नाम Rama ह्या नामानंतर कोणत्या Rama संदर्भात आहे हे स्पष्ट करण्यासाठी वापरले आहे.
  • जेव्हा एक नाम दुसर्‍या नामानंतर त्याचे वर्णन करण्यासाठी येते तेव्हा नंतर येणारे नाम हे आधी येणार्‍या नामाचे समानाधिकरण (in apposition) म्हंटले जाते.
  • (Apposition म्हणजे एका शब्दाला दुसर्‍या शब्दाजवळ ठेवणे.)
  • समानाधिकरण (in apposition) हे ज्या नामाचे स्पष्टीकरण करते त्याच विभक्तीत असते.
  • वरील वाक्यात captain हे नाम Rama या नामाचे case in apposition आहे आणि प्रथमा विभक्तीत (Nominative case) आहे. (कारण Rama हे प्रथमा विभक्तीत आहे.)
  • काही उदाहरणे –
  1. Kabir, the great reformer, was a weaver.
  2. Yesterday I met your uncle, the docter.
  3. Have you seen Ganguli, the artist’s drawings?
  • पहिल्या वाक्यात समानाधिकरण असलेले नाम (Nominative case) प्रथमा विभक्तीत आहे.
  • दुसर्‍या वाक्यात समानाधिकरण असलेले नाम (Accusative case) व्दितिया विभातीत आहे.
  • तिसर्‍या वाक्यात समानाधिकरण असलेले नाम (Genitive case) षष्ठी विभक्तीत आहे.
Must Read (नक्की वाचा):

शब्दाच्या जाती

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.