सुकन्या समृद्धि योजना
सुकन्या समृद्धि योजना
- देशात वाढत्या स्त्रिभूण हत्येला आळा घालण्याच्या उपयांतर्गत केंद्र सरकारने मुलीसाठी दि. 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील ‘पानीपत’ येथे ‘सुकन्या समृद्धि’ ही स्वतंत्र बचत योजना सुरू केली आहे. या योजनेचा आराखडा नागपुर मध्ये तयार करण्यात आला.
- देशभरातील मुलींचे प्रमाण दर हजारी कमी असलेल्या 100 जिल्हयासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक दहा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
- महाराष्ट्रातील बीड ,जळगाव ,नगर ,बुलढाणा ,औरंगाबाद ,वाशिम , कोल्हापूर , उस्मानाबाद , सांगली आणि जालना या जिल्ह्याचा या योजनेत समावेश आहे.
- मुलींचा घटता जन्मदार लक्षात घेवून समाजातील लिंग गुणोत्तरचे प्रमाण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- ‘सुकन्या समृद्धि खाते’ काय आहे या योजनेअंतर्गत मुलींचे पालक तिच्या जन्मानंतर ती दहा वर्षाची होईपर्यंत कोणत्याही टपाल कार्यालयात किंवा कोणत्याही वाणिज्यिक बँकाच्या अधिकृत बँक शाखेत तिचे जन्म प्रमाणपत्र सादर करून केवळ 1000 रुपयांच्या ठेवीवर खाते उघडू शकतात.
- त्यानंतर 100 रूपयाच्या पटीत या खात्यात गुंतवणूक करता येईल.एका वित्तीय वर्षात जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपायापर्यंतची गुंतवणूक करता येईल.
- मुलगी दहा वर्षाची झाल्यानंतर ती स्वत:च खात्यातील व्यवहार करण्यास पात्र असेल. या खात्याची मुदत 21 वर्षाची राहील. 18 ते 21 या वर्षादरम्यान अर्थात मुलगी विवाहस कायदेशीर दृष्टा पात्र झाल्यानंतर मुलीचा विवाह झाल्यास या खात्यातील रक्कम काढता येईल.
- उच्च शिक्षणासाठी मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला या खात्यातून 50% रक्कम काढता येते. या योजनेत गुंतवणुकीवर 9.1% प्राप्तीकर सवलतीसह उच्चतम व्याजदर प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
- या योगानेचा ब्रॅंड अॅबेसिडर माधुरी दिक्षित आहे तसेच या वेळी अभिनयाच्या टपाल तिकिटाचे उद्घाटन करण्यात आले.