STI Pre Exam Question Set 19

STI Pre Exam Question Set 19

1. ग्रामसभेच्या वर्षातून किमान किती सभा आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते?

  1.  चार
  2.  पाच
  3.  सहा
  4.  दोन

उत्तर : सहा


2. 33 व्या जी-8 राष्ट्रांची शिखरपरिषद —– येथे संपन्न झाली.

  1.  फ्रान्स
  2.  जर्मनी
  3.  कॅनडा
  4.  इटली

उत्तर : जर्मनी


3. दुहेरी शासनसंस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते?

  1.  संघराज्य
  2.  एकात्म
  3.  घटनात्म्क
  4.  व्दिदल

उत्तर : संघराज्य


4. सिमेंट उद्योगात —— या कच्च्या मालाची गरज असते.

  1.  लोह खनिज
  2.  चुनखडी
  3.  नैसर्गिक वायु
  4.  चांदी

उत्तर : चुनखडी


5. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी —— हे वर्तमान पत्र महाराष्ट्रात सुरू केले.

  1.  शतपत्रे
  2.  दीनबंधु
  3.  सुधारक
  4.  लोकमत

उत्तर : सुधारक

 


6. राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ —— आहे.

  1.  लोकसभेला
  2.  राज्यसभेला
  3.  केंद्रशासनाला
  4.  संसदेला

उत्तर : संसदेला


7. भारतात —— राष्ट्रीय उद्याने आहेत.

  1.  92
  2.  25
  3.  65
  4.  1000

उत्तर : 92


8. महाराष्ट्रात 1904 साली —– येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली.

  1.  पुणे
  2.  नाशिक
  3.  मुंबई
  4.  सातारा

उत्तर : नाशिक

 


9. दाबकलम ही प्रजननाची —— पद्धती आहे.

  1.  शाकिय
  2.  लैंगिक
  3.  नैसर्गिक
  4.  संयुग्मन

उत्तर : शाकिय


10. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही?

  1.  न्यायमूर्ती रानडे
  2.  बिपिन चंद्र पाल
  3.  लाला लजपत राय
  4.  लोकमान्य टिळक

उत्तर : न्यायमूर्ती रानडे


11. भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग —– शहरात बांधण्यात आला.

  1.  मुंबई
  2.  दिल्ली
  3.  चेन्नई
  4.  कोलकत्ता

उत्तर : कोलकत्ता


12. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले?

  1.  5 मार्च 1930
  2.  30 मार्च 1930
  3.  5 एप्रिल 1930
  4.  5 एप्रिल 1931

उत्तर : 5 एप्रिल 1930


13. —— या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.

  1.  पारा
  2.  चांदी
  3.  पानी
  4.  लोखंड

उत्तर : पानी


14. महाराष्ट्रात —– जिल्ह्यात लोणार येथे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे.

  1.  अकोला
  2.  यवतमाळ
  3.  चंद्रपूर
  4.  बुलढाणा

उत्तर : बुलढाणा

 


15. हेपॅटिटीस B (ब) —– मुळे होतो.

  1.  एच.ए.व्ही. (HAV)
  2.  एच.आय.व्ही. (HIV)
  3.  मायक्रोबॅक्टेरिया लेप्री
  4.  एच.बी.व्ही. (HBV)

उत्तर : एच.बी.व्ही. (HBV)

 


16. ‘मुक नायक’ हे पाक्षिक कोणी सुरू केले?

  1.  डॉ. आंबेडकर
  2.  महात्मा फुले
  3.  स्वामी विवेकानंद
  4.  सायाजीराव गायकवाड

उत्तर : डॉ. आंबेडकर


17. खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने नि:शेष भाग जातो?

  1.  32462
  2.  45768
  3.  87542
  4.  75334

उत्तर : 45768


18. फर्न टेरिस व्हीटाटा या जातीची वनस्पती जमिनीतून काय शोषून घेते?

  1.  अर्सेनिक
  2.  सेलेनियम
  3.  तांबे
  4.  लोह

उत्तर : अर्सेनिक


19. क्ष-किरण म्हणजे —— आहेत.

  1.  ऋण प्रभारीत कण
  2.  धन प्रभारीत कण
  3.  प्रभार विरहित कण
  4.  विद्युत चुंबकीय लहरी

उत्तर : विद्युत चुंबकीय लहरी


20. जगाच्या एकूण भूभागापैकी —— % क्षेत्र भारताने व्यापलेले आहे.

  1.  2.4
  2.  3.8
  3.  2.8
  4.  3.0

उत्तर : 2.4

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.