STI Pre Exam Question Set 10

STI Pre Exam Question Set 10 

1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?

 1.  गुजरात
 2.  तामिळनाडू
 3.  मिझोरम
 4.  ओरिसा

उत्तर : मिझोरम


2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

 1.  6555
 2.  8517
 3.  7517
 4.  6000

उत्तर : 7517


3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?

 1.  चेन्नई
 2.  कोलकाता
 3.  नवीन मंगलोर
 4.  कांडला

उत्तर : नवीन मंगलोर


4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.

 1.  कर्नाटक
 2.  केरळ
 3.  आसाम
 4.  तामिळनाडू

उत्तर : आसाम


5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

 1.  पहिल्या
 2.  दुसर्‍या
 3.  तिसर्‍या
 4.  चौथ्या

उत्तर : दुसर्‍या

6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.

 1.  प्रथम
 2.  व्दितीय
 3.  तृतीय
 4.  चतुर्थ

उत्तर : चतुर्थ


7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.

 1.  कांडला
 2.  मार्मागोवा
 3.  हल्दिया
 4.  न्हावा-शेवा

उत्तर : न्हावा-शेवा


8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.

 1.  सोळा
 2.  सतरा
 3.  अठरा
 4.  वीस

उत्तर : सतरा


9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

 1.  दिल्ली ते आग्रा
 2.  मुंबई ते ठाणे
 3.  हावडा ते खडकपूर
 4.  चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर : मुंबई ते ठाणे


10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

 1.  नाशिक
 2.  पुणे
 3.  कोल्हापूर
 4.  सोलापूर

उत्तर : कोल्हापूर


11. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औध्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?

 1.  निवळी
 2.  इंदापूर
 3.  बुटीबोरी
 4.  वाळूंज

उत्तर : बुटीबोरी


12. महाराष्ट्रातील —– हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.

 1.  नागपूर-चंद्रपूर
 2.  रायगड-रत्नागिरी
 3.  मुंबई-पुणे
 4.  नाशिक-जळगाव

उत्तर : नागपूर-चंद्रपूर


13. महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या —– आहे.

 1.  35
 2.  37
 3.  31
 4.  28

उत्तर : 35


14. महाराष्ट्रातील —— या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.

 1.  नागपूर व गोंदिया
 2.  सातारा व सांगली
 3.  धुले व जळगाव
 4.  यवतमाळ व परभणी

उत्तर : नागपूर व गोंदिया


15. हापूस आंब्याची झाडे —– जिल्ह्यात आढळतात.

 1.  सिंधुदुर्ग
 2.  रत्नागिरी
 3.  रायगड
 4.  वरील सर्व जिल्ह्यात

उत्तर : वरील सर्व जिल्ह्यात


16. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय होते?

 1.  धरण बांधणे
 2.  निर्यातील वाढ करणे
 3.  शेतीचा विकास करणे
 4.  औध्योगिककरण

उत्तर : औध्योगिककरण


17. पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी —— या काळात झाली.

 1.  1969-74
 2.  1974-79
 3.  1980-85
 4.  1985-90

उत्तर : 1974-79


18. भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना —— मध्ये करण्यात आली.

 1.  1948
 2.  1950
 3.  1951
 4.  1952

उत्तर : 1950


19. दामोदर खोरे योजना ही —— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

 1.  पहिल्या
 2.  दुसर्‍या
 3.  तिसर्‍या
 4.  पाचव्या

उत्तर : पहिल्या


20. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?

 1.  मुख्यमंत्री
 2.  राज्यपाल
 3.  स्पीकर
 4.  उपमुख्यमंत्री

 उत्तर : स्पीकर

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.