शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

Shabdayogi Avyay V Tyache Prakar

शब्दयोगी अव्यय :

वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्‍या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.

उदा.

 • सायंकाळी मुले घराकडे गेली.
 • शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.
 • आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.
 • गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.

शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये :

शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडून येतात. पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.
शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसर्‍या शब्दाशी संबंध दाखवते.
शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार पडतात.

 • कालवाचक पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.
 • स्थलवाचक आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.
 • करणवाचक मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती
 • हेतुवाचक साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव
 • व्यक्तिरेखा वाचक शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता
 • तुलनावाचक पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
 • योग्यतावाचक योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम
 • कैवल्यवाचक मात्र, ना, पण, फक्त, केवळ
 • संग्रहवाचक सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त
 • संबंधवाचक विषयी, विशी, विषयी
 • साहचर्यवाचक बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत
 • भागवाचक पैकी, पोटी, आतून
 • विनिमयवाचक बद्दल, ऐवजी, जागी, बदली
 • दिकवाचक प्रत, प्रति, कडे, लागी
 • विरोधावाचक विरुद्ध, वीण, उलटे, उलट
 • परिणाम वाचक भर
Must Read (नक्की वाचा):

वर्णमाला व त्याचे प्रकार

You might also like
1 Comment
 1. Ajay says

  mpscworld.com is a best website to achieve the goal .

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World