सर्वनाम व त्याचे प्रकार (Pronoun And Its Types) व्याकरण Marathi Grammar

Sarvanam V Tyache Prakar

सर्वनाम :

वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत.

  • पुरुषवाचक सर्वनाम
  • दर्शक सर्वनाम
  • संबंधी सर्वनाम
  • प्रश्नार्थक सर्वनाम
  • सामान्य / अनिश्चित सर्वनाम
  • आत्मवाचक सर्वनाम
Must Read (नक्की वाचा):

वचन व त्याचे प्रकार

1. पुरुषवाचक सर्वनाम :

याचे तीन उपप्रकार पडतात.

1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :

बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.

उदा – मी, आम्ही, आपण, स्वत: इ

  •  मी गावाला जाणार
  • आपण खेळायला जावू.

2 .व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :

जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.

उदा – तो, तुम्ही, आपण, स्वतः इ

  • आपण कोठून आलात?
  • तुम्ही घरी कधी येणार?

3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :

जेव्हा बोलणारा दुसर्‍या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्‍या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.

उदा –  तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.

  • त्याने मला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
  • त्या सर्वजण इथेच येत होत्या.

2. दर्शक सर्वनाम :

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.

उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.

  •  ही माझी वही आहे
  • हा माझा भाऊ आहे.
  • ते माझे घर आहे.
  • तो आमचा बंगला आहे.

3. संबंधी सर्वनाम :

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.

उदा – जो, जी, जे, ज्या

ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
– ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
– असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
  • जे चकाकते ते सारेच सोने नसते.
  • जो तळे राखील तो पाणी चाखील.

4. प्रश्नार्थक सर्वनाम :

ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

  उदा – कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

  • तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?
  • तुझ्याकडे किती रुपये आहेत?
  • तू कोठे जातोस?

5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :

कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

उदा.

  • त्या पेटीत काय आहे ते सांग.
  • कोणी कोणास हसू नये.
  • कोण ही गर्दी !

6. आत्मवाचक सर्वनाम :

एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

  उदा.

  • 1. मी स्वतःत्याला पहीले.
  • 2. तू स्वतः मोटर चालवशील का?
  • 3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
  • 4. तुम्ही स्वतःला काय समजतात.

मराठीत मूळ 9 सर्वनाम 

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी – 

 लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत – तो, हा, जो.
  • तो– तो, ती, ते
  • हा– हा, ही, हे
  • जो-जो, जी, जे
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. – मी, तू, तो, हा, जो इ
  • मी– आम्ही
  • तू– तुम्ही
  • तो– तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
  • हा– हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
  • जो– जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)
Must Read (नक्की वाचा):

वाक्य व त्याचे प्रकार

You might also like
9 Comments
  1. subhash says

    no.1

  2. Swara Sai Subhedar says

    It really helps..

  3. Varsha.wagh says

    Sir.marthi.question.sets.aplode.kara

  4. Gorakh vhadgal says

    खूपच छान

  5. Ashwini pagi says

    It really helped me in marathi subject

  6. Pankaj gavte says

    It’s realy nice for making notes

  7. Swapni U says

    thanks for sharing great article.

  8. Ishwari Sanjay Barabde says

    very nice….thank you mpsworld.com

  9. Vyankatesh Kamdi says

    I am a 7th grade student and it really helps me out in my exams.

Leave A Reply

Your email address will not be published.