सहज योजना (Sahaj Yojana)

सहज योजना (Sahaj Yojana)

सहज योजनेची सुरुवात30 ऑगस्ट, 2015 रोजी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली.

Must Read (नक्की वाचा):

ई-नाम योजना (E-NAM Yojana)

सहज योजनेचा उद्देश –

1. LPG सिलिंडर ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करून देणे.

2. सहज योजनेअंतर्गत ऑनलाईन LPG सिलेंडर बूकिंग केल्यानंतर 10 दिवसांनंतर गॅस कनेक्शन ग्राहकास उपलब्ध करण्यात येईल. यामध्ये गॅस शेगडी, रेग्युलेटर, सिलिंडर टाकी इत्यादी साहित्य घरपोच उपलब्ध करण्यात येईल.

3. सहज योजनेअंतर्गत उपलब्ध साहित्याचे पेमेंट ग्राहक ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही मार्गानी करू शकेल.

4. या योजनेअंतर्गत ग्राहक LPG सिलिंडर बूकिंग www.mylpg.in या संकेतस्थळावरून करू शकेल. यासाठी ग्राहकास आपल्या ठिकाणांचा पत्ता व ओळखपत्र स्कॅन करून फॉर्मबरोबर डाउनलोड करणे गरजेचे राहील.

5. सहज योजना प्राथमिक स्वरुपात देशातील 13 शहरांमध्ये (दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, भुवनेश्वर, बंगळुरू, चंदिगड, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना व पुणे) लागू करण्यात आली आहे.

6. सहज योजनेअंतर्गत सध्याच्या 16.5 कोटी LPG कनेक्शन संख्या 2018 डिसेंबरपर्यंत 10 कोटींनी वाढविण्याचे लक्ष्य केंद्र सरकारव्दारे जाहीर करण्यात आले.

7. सहज LPG कनेक्शन योजनेचा लाभ देशभरातील भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल व हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनी ग्राहक घेऊ शकतील.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.