राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती

राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती

  • देशातील किशोर लोंकसंख्येबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबच त्यांना कुपोषनापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने 7 जानेवारी 2015 रोजी राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रम (RKSK) सुरू केला आहे.
  • या कार्यक्रमात 10 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत देशाच्या लोकसंख्येपैकी 21 टक्क्या पेक्षा जास्त लोकसंख्या आहे.
  • 24.3 करोड किशोर मुला-मुलींच्या समस्याकडे व्यापक स्वरुपात लक्ष दिले जाईल. त्यांच्यातील अंगभूत कौशल्य क्षमता विकसित करण्यासाठी त्यांचे आरोग्य आणि त्यांचे कल्याण या संबंधी निर्णय घेण्याकरिता मदतीसाठी या कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली आहे.
  1. राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
  2. 10 ते 19 वयोगटातील 24.3 करोड किशोर मुला-मुलींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून या कार्यक्रमांतर्गत त्यांना पोषण, प्रजनन, आरोग्य आणि संकट या पासून त्यांचे संरक्षण करणे.
  3. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश किशोर प्रजनन स्वास्थ उत्तम राखणे.
  4. किशोरांमध्ये मुलगा-मुलगी, विवाहित-अविवाहित, गरीब-श्रीमंत, शाळेतील मुलं-मुली, शाळा सोडलेली मूल-मुली या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.
  5. या कार्यक्रमात प्रजनन, मातृत्व, शिशु बालआरोग्य आणि किशोर यांच्यावर विशेष लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.
  6. कार्यक्रमाची सुरुवात सरकारी दवाखान्यांच्या मदतीने केली जाणार आहे.
  7. या कार्यक्रमात 6 (C)यावर जोर दिला आहे.

1. Coverage 2. Content 3. Communication 4. Counseling 5. Clinics 6. Convergence

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.