Rajyaseva Pre-Exam Question Set 9

Rajyaseva Pre-Exam Question Set 9

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 1 (18 मे 2013)

1. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता?

 1.  शाळांवरील बहिष्कार
 2.  न्यायालयांवरील बहिष्कार
 3.  परदेशी कापडांवरील बहिष्कार
 4.  कर न भरणे

उत्तर : कर न भरणे


 2. ‘खोती पद्धत’ कोठे होती?

 1.  मराठवाडा
 2.  खानदेश
 3.  विदर्भ
 4.  कोकण

उत्तर :कोकण


 3. गांधार कलाशैली —– कलाशैलीने प्रभावित झालेली होती.

 1.  ग्रीक व चीनी
 2.  युनानी व रोमन
 3.  पर्शियन व ग्रीक
 4.  चीनी व पर्शियन

उत्तर :युनानी व रोमन


 4. गांधी-आयर्विन कारारामुळे काय साध्य झाले?

 1.  पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.
 2.  मीठावरील कर रद्द झाला.
 3.  गांधीजीनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 4.  वरीलपैकी काहीही नाही.

उत्तर :वरीलपैकी काहीही नाही.


 5. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते?

 1.  कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
 2.  सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
 3.  गोलमेज परिषदेत काँगेससाठी स्थान मिळवणे.
 4.  वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.

उत्तर :कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.


 6. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की, 1857 चा उठाव सैनिकी विद्रोह नसून ‘राष्ट्रीय उठाव’ होता :

 1.  लॉर्ड डलहौसी
 2.  लॉर्ड कॅनिंग
 3.  विल्यम ग्लॅडस्टोन
 4.  बेंजामिन डिझरायली

उत्तर :बेंजामिन डिझरायली


 7. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पुर पातळीव्दारा निश्चित होईल?

 1.  नर्मदेचा त्रिभुज प्रदेश
 2.  रोहिलखंड
 3.  माळवा
 4.  रामनाड

उत्तर :रोहिलखंड


 8. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे.

मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते?

 1.  राजस्थान
 2.  मध्य प्रदेश
 3.  महाराष्ट्र
 4.  उत्तर प्रदेश

उत्तर :राजस्थान


 9. नदी आपल्या संपूर्ण प्रवाहात वेगवेगळे भू-आकार निर्माण करत असते. खालीलपैकी कोणता भू-आकार नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करत नाही?

 1.  घळई
 2.  धावर्‍या
 3.  धबधबा
 4.  डोंगरबाहू

उत्तर :डोंगरबाहू


 10. उसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते?

 1.  40%
 2.  30%
 3.  20%
 4.  10%

उत्तर :10%


 11. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुवृत्तीय हवामानात आढळत नाही?

 1.  येथे हिवाळा नसतो
 2.  दुपारी पाऊस पडतो
 3.  वर्षभर सारखेच (Uniform) तापमान असते.
 4.  प्रतिरोध पर्जन्य

उत्तर :प्रतिरोध पर्जन्य


 12. मुंबई हाय मध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या 63% खनिज ते तर 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओ.एन.जी.सी.ला येथे सर्वप्रथम 1974 मध्ये तेल लागले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे?

 1.  इओसीन
 2.  मायोसीन
 3.  प्लायोसीन
 4.  प्लीस्टोसीन

उत्तर :मायोसीन


 13. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दीष्ट म्हणजे :

 1.  स्वास्थविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे
 2.  एकूण जननदर कमी करणे
 3.  लोकसंख्या स्थिर करणे
 4.  वरील सर्व

उत्तर :स्वास्थविषयक पायाभूत सुविधांची गरज भागविणे


 14. 11 व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषि विकास योजनेचे प्रमुख उद्दीष्ट कोणते?

 1.  राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे.
 2.  भारतीय कृषी निर्यातदारांना सवलती देणे.
 3.  सरकरसाठी महसूल निर्माण करणे.
 4.  वरीलपैकी कोणतेही नाही.

उत्तर :राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे.


 15. अनेकअंगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली?

 1.  ग्राहक निर्देशांक
 2.  भारतीय दारिद्र्य निर्देशांक
 3.  दारिद्र्यखालील निर्देशांक
 4.  मानवी दारिद्र्य निर्देशांक

उत्तर :मानवी दारिद्र्य निर्देशांक


16. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिर गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण :

 1.  कौटुंबिक उत्पान्नाचा तपशील उपलब्ध नसतो.
 2.  किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण आहे.
 3.  ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तुट भरून काढावी लागेल हे दाखविते.
 4.  वरीलपैकी कुठलेही नाही.

उत्तर :ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तुट भरून काढावी लागेल हे दाखविते.


 17. आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते?

 1.  अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज
 2.  क्रमवर्धी करपद्धती
 3.  तुटीची वित्तव्यवस्था
 4.  सरकारी कर्जरोखे

उत्तर :तुटीची वित्तव्यवस्था


 18. राष्ट्रीय महिला साक्षमीकरण धोरण 2000 चा प्रयत्न :

 1.  बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे
 2.  महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान करणे.
 3.  वरील दोन्ही.
 4.  वरीलपैकी कुठलेही नाही

उत्तर :वरील दोन्ही.


 19. भारतातील भूअधिकार सुधरणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते?

 1.  कुळवहिवाट सुधरणा
 2.  मध्यस्थांचे निर्मूलन
 3.  शेतीविषयक वित्त
 4.  सहकारी शेती

उत्तर :शेतीविषयक वित्त


 20. सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही?

 1.  अमोनिया
 2.  युरिक अॅसीड
 3.  पाणी
 4.  साखर

उत्तर :साखर

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.