Rajyaseva Pre-Exam Question Set 6

Rajyaseva Pre-Exam Question Set 6

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 1 : 5-04-2015

1. सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे

 1.  लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके
 2.  एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके
 3.  जन्मदर वजा मृत्युदर
 4.  स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके

उत्तर : स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके


 

2. व्यावसायिक शीतगृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते?

 1.  0°से.
 2.  20°से.
 3.  4°से.   
 4.  -4°से.

उत्तर :20°से.


 

3. लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?

 1.  रडार
 2.  सोनार
 3.  लेडार
 4.  लिडार

उत्तर :लिडार


 

4. फळांच्या व भाज्यांचा वितंचकीय तांबूसीकरणास तपकिरीपणास कारणीभूत मुख्य वितंचक कोणते?

 1.  पेरोक्सिडेज
 2.  पॉलिफेनॉल ऑक्सिडेज
 3.  कॅटॅलेज
 4.  कोलेस्टेरोल ऑक्सिडेज

उत्तर :पॉलिफेनॉल ऑक्सिडेज


 

5. सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टीक फिल्म कशाची असते?

 1.  पोलीएथिलीन
 2.  पोलिस्टायरीन
 3.  पोलिप्रोपिलीन
 4.  पोली व्हीनाईल क्लोराइड

उत्तर :पोलीएथिलीन


 

6. दुर्बिणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?

 1.  वस्तुभिंग
 2.  संयुक्त नेत्रभिंग
 3.  विशालक
 4.  वरीलपैकी एकही नाही

उत्तर :संयुक्त नेत्रभिंग


 

7. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला/सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते?

 1.  बुध
 2.  युरेनस
 3.  नेपच्यून
 4.  प्लूटो

उत्तर :प्लूटो


 

8. ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सीजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?

 1.  इलेक्ट्रॉन दाता
 2.  इलेक्ट्रॉन ग्राही
 3.  प्रोटॉन दाता
 4.  प्रोटॉन ग्राही

उत्तर :इलेक्ट्रॉन ग्राही


 

9. अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते?

 1.  लॅक्टिक आम्ल
 2.  इथोनॉल
 3.  फॉरमिक आम्ल
 4.  अॅस्कोरबिक आम्ल

उत्तर :लॅक्टिक आम्ल


 

10. खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ‘अॅग्रीमायसीन’ वापरतात…..

 1.  कवक आजार
 2.  विषाणू आजार
 3.  जिवाणू आजार
 4.  कवकवीद्रव्य आजार

उत्तर :जिवाणू आजार


 

11. खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियंट कोणते आहे?

 1.  मॅग्नेशियम
 2.  मॉलीबडेनियम
 3.  बोरॉन
 4.  झिंक

उत्तर :मॉलीबडेनियम


 

12. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी —– आहे.

 1.  40%
 2.  53%
 3.  45%
 4.  55%

उत्तर :40%


 

13. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल-क्षार (अॅसिड-बेस) संतुलन राखते?

 1.  कॅल्शियम
 2.  सोडीयम
 3.  पोटॅशियम
 4.  लोह

उत्तर :सोडीयम


 

14. रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला

 1.  ऑक्सीडिकारक अभिकर्ता
 2.  निर्जलन अभिकर्ता
 3.  क्षपणकारक अभिकर्ता
 4.  क्लिष्टीकरण अभिकर्ता

उत्तर :निर्जलन अभिकर्ता


 

15. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?

 1.  नर्मदा
 2.  कावेरी
 3.  गोदावरी
 4.  कोणतीही नाही

उत्तर : कोणतीही नाही


 

16. a- कण ह्यांनी शिधून काढले?

 1.  जे.जे. थॉमसन
 2.  ए. आईस्टाईन
 3.  ई-रुदरफोर्ड
 4.  मादाम क्युरी

उत्तर : ई-रुदरफोर्ड


 

17. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष —– हे असते.

 1.  1 एप्रिल ते 31 मार्च
 2.  1 जानेवारी ते 31 डिसेंबर
 3.  1 जुलै ते 30 जून
 4.  1 मे ते 30 एप्रिल

उत्तर :1 एप्रिल ते 31 मार्च


 

18. ‘त्सुनामी’ या जापानी शब्दातील ‘त्सु’ आणि ‘नामी’ म्हणजे काय?

 1.  संपूर्ण विनाश
 2.  राक्षसी लाट
 3.  बंदर लाट
 4.  हिंस्त्र लाट

उत्तर :बंदर लाट


 

19. ‘चांगला खेळला निळा, लाल जिंकलेला आहे!’ हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कुठे ऐकतो?

 1.  फुटबॉल
 2.  बास्केटबॉल
 3.  स्क्वोश
 4.  बॉक्सिंग

उत्तर :बॉक्सिंग


 

20. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

 1.  राज्यपाल
 2.  राष्ट्रपती
 3.  उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
 4.  राष्ट्रीय न्यायिक आयोग

उत्तर :राष्ट्रपती

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.