Rajyaseva Pre-Exam Question Set 13
Rajyaseva Pre-Exam Question Set 13
10 जून 2012 प्रश्नसंच 2
1. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत?
- कवि ग्रेस
- बाल गंधर्व
- कुमार गंधर्व
- छोटा गंधर्व
उत्तर : कुमार गंधर्व
2. खालीलपैकी कोणते (2002-07) आयात-निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही?
- कृषी निर्यातीवरील निर्बंध उठविणे
- लघुउद्योग व कुटीरउद्योग निर्यातीस प्रोत्साहन
- आयात पर्यायीकरण
- विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास
उत्तर :विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास
3. 1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित होती?
- दारिद्र्य
- आयात निर्यात धोरण
- बँकेची वित्तीय व्यवस्था
- बेरोजगार
उत्तर :बँकेची वित्तीय व्यवस्था
4. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो?
- मौद्रिक धोरणात बदल
- आयात शुल्कात कपात
- सार्वजनिक वितरण व्यवस्था
- वरील सर्व
उत्तर :सार्वजनिक वितरण व्यवस्था
5. प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते?
- 1974-75
- 2001-02
- 2009-10
- 2010-11
उत्तर :1974-75
6. खालीलपैकी कोणते विदेशी व्यापार धोरण 2009-2014 चे उद्दिष्ट नाही?
- निर्यातीचा खालावणारा कल पूर्वपदावर आणणे
- वार्षिक 15 टक्के निर्यात वृद्धी साध्य करणे
- भारताचा जागतिक व्यापरातील हिस्सा 2020 पर्यंत दुप्पट करणे
- चैनीच्या उपभोग्य वस्तूंची आयात वाढवणे
उत्तर :चैनीच्या उपभोग्य वस्तूंची आयात वाढवणे
7. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला?
- सर्व धर्म समभाव
- अलिप्ततावाद
- पंचशील
- निशस्त्रीकरण
उत्तर :पंचशील
8. ‘बहिष्कार हे अस्त्र परकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे’, असे कोणाचे मत होते?
- महादेव गोविंद रानडे
- गोपाळ कृष्ण गोखले
- फिरोझशहा मेहता
- दादाभाई नौरोजी
उत्तर :गोपाळ कृष्ण गोखले
9. हिन्दी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्टयास काय नाव आहे?
- अंतर-उष्णकटिबंधीय केंद्री भवन पट्टा
- पश्चिमी जेटस्ट्रीम
- विषुववृत्तीय कमी दाब पट्टा
- यापैकी नाही
उत्तर :अंतर-उष्णकटिबंधीय केंद्री भवन पट्टा
10. सप्टेंबर 2010 मध्ये पहिला ‘आधार’ क्रमांक (7824 7431 7884) एका आदिवासी गावातील महिलेला प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?
- छत्तीसगढ
- झारखंड
- ओडिशा
- महाराष्ट्र
उत्तर :महाराष्ट्र
11. तगनम, जगनम, धगनम आणि सम्मीश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडीत आहेत?
- भरतनाटयम
- कथ्थक
- कुचीपुडी
- मोहिनी अट्टम
उत्तर :मोहिनी अट्टम
12. राष्ट्रीय संघ (UN) चा 193 वा सदस्य कोणता?
- उत्तर सुदान
- दक्षिण सुदान
- झिंबाम्बे
- झांबिया
उत्तर :दक्षिण सुदान
13. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे, तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
- 154
- 156
- 158
- 152
उत्तर :156
14. फेमा, 1999 चे उद्दिष्ट कोणते?
- विदेशी पर्यटकांना प्रबंध
- आयात नियंत्रण
- अनिवासी भारतीय गुंतवणुकीवर प्रबंध
- बहिर्गत व्यापार व देय यांची सोय
उत्तर :बहिर्गत व्यापार व देय यांची सोय
15. प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्वाची अडचण कोणती?
- वसुलीचा प्रश्न
- खेळत्या भांडवलाचा प्रश्न
- ग्राहकांची अशिक्षितता
- अपुरा कर्मचारी वर्ग
उत्तर :वसुलीचा प्रश्न
16. वाळूमिश्रित ‘लोम’ प्रकाराची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते?
- ज्वारी
- नाचणी
- तांदूळ
- चहा
उत्तर :तांदूळ
17. महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?
- तहसीलदार
- ग्रामसेवक
- तलाठी
- पोलीस पाटील
उत्तर :तलाठी
18. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले?
- रेग्युलेटिंग अॅक्ट 1773
- चार्टर अॅक्ट 1833
- चार्टर अॅक्ट 1853
- इंडियन कौन्सिल अॅक्ट 1861
उत्तर :चार्टर अॅक्ट 1853
19. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मुलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे?
- फ्रांस
- यू.एस.ए.
- यू.एस.एस.आर.
- यू.के.
उत्तर :यू.एस.एस.आर.
20. रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे. तर अक्षयने 1 तास 18 मिनिटांत कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल?
- 13 मिनिटे
- 26 मिनिटे
- 36 मिनिटे
- 2 तास 36 मिनिटे
उत्तर : 26 मिनिटे