Rajyaseva Pre-Exam Question Set 11

Rajyaseva Pre-Exam Question Set 11

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 2 (18-5-2013)

प्रश्न क्रमांक 1 ते 5 :

टेकड्यांच्या सभोवार पसरलेल्या सूक्ष्माश्मांच्या मागोव्यावरून असा निष्कर्ष अटळपणे निघतो की ही अवजारे अशा एका धातूपूर्व आणि मातीकामपूर्व काळाची साक्षीदार असावीत की जेव्हा येथील सखल खोर्‍यांत जंगले होती. या संरचनेत जनावरांची कळपे, अन्न जमा करणे, थोडी शेती आणि थोडीफार शिकार. हिला मध्य-अश्म संस्कृती म्हणता येईल.

या माणसांच्या टोळ्यांना सतत भटकावे लागे. लोखंडापासून धातू स्वस्तपणे मिळू लगेपर्यंत स्थिर वसाहती बनणे शक्य नव्हते. मौर्याच्या विजयापूर्वीच्या काळात दख्खन पठाराच्या परदेशात कुठेही लोखंड वापरले जात होते असे मानणे कठीण आहे. या प्रदेशात तांब्याचे साठे सहज मिळत नाहीत आणि कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’ ला सुद्धा दक्षिणेत लोखंड असल्याची वार्ता नव्हती. खोर्‍यांच्या तळाशी असणारी दलदल किंवा जंगल लागवडीखाली येण्यापूर्वी रानटी लोक साहजिकच टेकड्यांच्या कडेकडेने असणारा मार्ग वापरत असावेत.

या वाटांवर ये-जा करणार्‍या टोळ्या संख्येने मोठ्या नसाव्यात. त्यांची जमिनीवर मालकी असण्याचा प्रश्नच उदभवत नाही. कारण जमिनीची मालकी ही कल्पना प्राचीनकाळी नव्हती. नांगराने जमीन कसली जाईपर्यंत स्थिर शेती निरर्थकच होती. त्यासाठी खोर्‍यांच्या तळातील सुपीक जमिनीवरील जंगल साफ करणे भाग होते. आणि आपल्या मोसमी पावसाच्या प्रदेशात ही जंगलतोड मुबलक लोखंडी सुपीक अवजरांशीवाय अशक्य होती रानटी लोकांच्या दृष्टीने जमीन ही मालमत्ता नसून केवळ प्रदेश असतो. माझ्या मते महाराष्ट्रातील ‘गावसई’ ची प्रथा म्हणजे एकाजागी स्थिर वस्ती होण्यापूर्वीच्या काळातील आजही जपलेली स्मृती असावी. ही प्रथा म्हणजे (‘भगत’ ठरवेल तेव्हा) सर्व स्थानिक देवता, भुतेखेते यांची शांति करणे. यातील वैशिष्ट्य से की या काळात गाव पुर्णपणे निर्मनुष्य करून सर्वांना सात किंवा नऊ दिवस गावाबाहेर रहावे लागे. शेतावर किंवा झाडाखाली राहून आवश्यक ती पूजा अनई रक्तबळी झाल्यावर गावकरी आशा विश्वासाने परतत की आता भरघोस पीक आणि सुबत्ता येईल आणि रोगराई टळेल. परत येण्याचा सण म्हणजे पुनश्च केलेली वस्ती मनाली जात असावी. शेतीपूर्व काळातल्या लोकांची स्थिर देवस्थाने अशाच ठिकाणी असणे आवश्यक होते की जिथे त्यांचे नेहमीचे रस्ते एकमेकांस मिळत. जिथे ते वस्तुविनिमय आणि त्यासंबंधातले सण आणि समाजाचे विधी करत, जिथे टोळ्या मिळून आपले नैमिक्तिक सुफलतेचे विधी एकत्र साजरे करत. यासाठीच मातृदेवतांची आदिम ठाणी चौरस्त्यावरच असणे तर्कदृष्टया क्रमप्राप्त ठरते.

1. मातृदेवतांची ठाणी चौरस्त्यावर असत कारण :

a. तेथे भटक्या टोळ्यांचे मार्ग एकमेकांस मिळत

b. तेथे भटक्या टोळ्या वस्तुविनिमय करत

c. जंगलतोड करणे शक्य नव्हते

d. दर्‍यांमध्ये दलदल असे

 1.  a,b,c
 2.  a,b,d
 3.  a,b
 4.  a,b,c,d.

उत्तर : a,b


2. लेखकाच्या मते स्थिर शेती सुरू होण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनावश्यक ठरते?

a. नांगराने जमीन कसणे

b. लोखंड मुबलक उपलब्ध होणे

c. जंगल तोडून साफ करणे

d. वरीलपैकी एकही नाही

 1.  c
 2.  b
 3.  d
 4.  a

उत्तर : d


3. ‘गावसई’ च्या प्रथेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?

a. दैवतांची शांति करणे

b. गाव निर्मनुष्य करणे

c. पुजा आणि रक्तबळी

d. वस्तुविनिमय

 1.  a,c,d
 2.  a,b,c,d
 3.  b,c,d
 4.  a,b,c

उत्तर : a,b,c


4. जोपर्यंत शेती होत नव्हती, तोपर्यंत सामान्यपणे पुढीलपैकी काय दिसत नव्हते?

 1.  गावसई
 2.  वनांवर प्रेम
 3.  जमिनीबाबत अभिमान
 4.  वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही

उत्तर : जमिनीबाबत अभिमान


5. पुढील दोन विधानांचा विचार करा.

a. गावसईमध्ये लोक चांगल्या व वाईट वृत्तीची आत्म्याची पुजा करत.

b. लोक अशी पुजा करीत कारण त्यांना ते घाबरत होते आणि ते प्रसन्न करू इच्छित होते.

 1.  दोन्ही बरोबर व b ही a ची कारणमीमांसा आहे.
 2.  दोन्ही बरोबर परंतु b ही a ची कारणमीमांसा नाही.
 3.  कोणतेही योग्य नाही
 4.  a बरोबर परंतु b चूक

उत्तर : दोन्ही बरोबर व b ही a ची कारणमीमांसा आहे.


 प्रश्न क्रमांक 6 ते 8 :-

दुष्काळ ही पर्जन्याच्या अभावामुळे निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती असते. पर्जन्याचा अभाव पाऊस अपुरा पडल्यामुळे किंवा दोन पावसाळी टप्प्यांमध्ये अंतर पडल्यामुळे निर्माण होतो. दुष्काळाचे तीन प्रकार असतात. हवामानशास्त्रीय दुष्काळ ही अशी परिस्थिती असते, ज्यावेळेस प्रत्यक्ष पडलेला पाऊस हवामानाच्या प्रकारानुसार अपेक्षित पावसापेक्षा खूप कमी असतो आणि असा प्रकार मोठ्या प्रदेशावर घडतो. म्हणजेच पाउस एकतर वेळेत सुरू होत नाही आणि एकूण कमीही पडतो. से दुष्काळ प्रामुख्याने शुष्क आणि निम-शुष्क प्रदेशांमध्ये केन्द्रित झालेले असतात. देशाच्या अशा भागांमध्ये पर्जन्यातील विचलन देखील अधिक असते.

जलशास्त्राय दुष्काळ पृष्ठभागावरील नदी, तलाव, ओढे आणि जलाशय यांच्यातील पाणी आटण्याशी आणि भूजलपातळी खालावण्याशी संबंधित असतात. जंगलतोड, खानकाम, रस्तेबांधणी, अति-चराई आणि अतिरिक्त भूजल उपसा यामुळे हे दुष्काळ वाढतात. वरील सर्व घडामोडींमुळे जलशास्त्रीय असंतुलन निर्माण होते ज्याचे पुढे दुष्काळ सदृश स्थितीमध्ये रूपांतर होते. शेतीमुलक दुष्काळ किंवा मृदाजन्य दुष्काळ तेव्हा निर्माण होतात जेव्हा माती आपली बाष्प धारण क्षमता घालवून बसते. यामुळे पिकांची सुदृढ वाढ होत नाही. हवामानशास्त्रोय दुष्काळ नसतानाही अशी परिस्थिती निर्माण होते किंवा याच्या विरुद्धही होते. अशा दुष्काळाची तीव्रता अधिक वाढल्यास एकही झाड जगणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. या स्थितीला वाळवंटीकरन असे म्हणतात.

जरी वरील तिन्ही प्रकारचे दुष्काळ स्वतंत्रपणे घडत असले तरी हवामानशास्त्रीय दुष्काळ हे जलशास्त्रीय आणि शेतीमुलक दुष्काळाचे प्रमुख कारण असते. लांबलेल्या हवामानशास्त्रीय दुष्काळाची परिणती जलजन्य दुष्काळात. हे रूपांतर अतिशय मंद गतीने होते.

6. खालील दोन विधाने पहा.

a. कोरड्या क्षेत्रात पाऊस कमी-जास्त पडण्याची शक्यता जास्त नसते.

b. जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोडी व अमर्याद चराईमुळेच चालू होतो.

 1.  दोन्ही चूक
 2.  दोन्ही बरोबर
 3.  a चूक b बरोबर
 4.  a बरोबर b चूक

उत्तर : दोन्ही चूक


7. खालील विधाने वाचा व योग्य तो पर्याय निवडा.

a. हवामानशास्त्रीय दुष्काळ हे प्रत्येक दुष्काळाचे कारण असते.

b. जलशास्त्रीय दुष्काळ नेहमीच मानवनिर्मित घटकांची परिणती असते.

 1.  a व b ही दोन्ही बरोबर आहेत.
 2.  a व b दोन्ही चूक आहेत.
 3.  a बरोबर आहे व b चूक आहे.
 4.  b बरोबर आहे व a चूक आहे.

उत्तर : a व b दोन्ही चूक आहेत.


8. एका विशिष्ट क्षेत्रामध्ये विहीरींची संख्या वाढल्यास कोणत्या प्रकाराच्या दुष्काळ पडण्याची शक्यता आहे?

 1.  जलशास्त्रीय
 2.  शेतीमुलक
 3.  हवामानशास्त्रीय
 4.  पर्जन्यमुलक

उत्तर : जलशास्त्रीय

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.