प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)

Pradhan Mantri Ujjwala Yojana

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली बैठकीत 10 मार्च 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेस मान्यता देण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

नमामि गंगे योजना (Namami Gange Yojana)


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश –

  • दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना (BPL) नि:शुल्क LPG गॅसकनेक्शन उपलब्ध करून देणे.
  • भारतामध्ये स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे.
  • महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व महिला सशक्तीकरण करणे.
  • प्रदूषण प्रमाण कामी करणे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2016 प्रासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (BPL) महिलांना पहिले LPG कनेक्शन नि:शुल्क देण्यात आले.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकारव्दारे पुढील 3 वर्षांमध्ये 5 कोटी कुटुंबांना नि:शुल्क LPG कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यावर 8 हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये दीड कोटी कुटुंबास लाभ देण्यात येणार आहे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ इच्छित ग्राहकास जवळील GPL वितरकाव्दारे किंवा ऑनलाईन डाउनलोड करून अर्ज प्राप्त करता येतो. हा अर्ज भरून LPG वितरक केंद्रामध्ये जमा करावा. या दोन पानी अर्जामधील संपूर्ण माहिती उदा – नाव, पत्ता, आधारकार्ड नंबर, जनधन/बँक खाते इत्यादी भरणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेस आवश्यक कागदपत्रे –

  • BPL रेशनकार्ड
  • पंचायत अधिकारी किंवा नगरपालिका अध्यक्षांव्दारे अधिकृत BPL प्रमाणपत्र
  • एक फोटो व ओळखपत्र उदा – आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र
  • एक पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ड्रायव्हिंग लायसेन्स
  • टेलिफोन, वीज किंवा पानी बिल
  • पासपोर्ट झेरॉक्स
  • रेशनकार्ड
  • घराची अधिकृत कागदपत्रे
  • LIC पॉलिसी
  • बँक स्टेटमेंट

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पात्रता –

  • ग्राहकाव्दारे देण्यात आलेली सर्व महिती SEee-2011 माहितीबरोबर जोडली जाईल व त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल की, ग्राहक योजनेस पात्र आहे की नाही.
  • ग्राहकाचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे राहील.
  • ग्राहक BPL कुटुंबातील महिलाच असली पाहिजे. पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • ग्राहकाच्या घरामध्ये कोणाच्याही नावे पहिले LPG कनेक्शन नसावे.
  • ग्राहकाव्दारे अर्जामध्ये देण्यात येणारी संपूर्ण माहिती सत्य असावी.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र BPL कुटुंबाची यादी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशाच्या मदतीने तयार करण्यात येईल.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेकरिता भारत सरकारव्दारे योजना कार्यवाहीसाठी एकूण 8000 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे, जे 3 वर्षांसाठी राहील.
  • वित्तीय वर्ष 2016-17 साठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याव्दारे अगोदरच 2000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • या योजनेवर खर्च होणारा पैसा LPG अनुदानामार्फत बचत करण्यात आलेल्या पैशातून होईल. भरात सरकारमार्फत जानेवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेले Give-It-Up अभियानांतर्गत आतापर्यंत जवळजवळ 1.13 कोटी ग्राहकांनी LPG अनुदान घेणे बंद केले आहे व हे ग्राहक बाजार किमतीवर LPG Sylinder खरेदी करत आहेत. चालू केलेल्या अभियानातून आतापर्यंत हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे, जी उज्ज्वला योजनेसाठी वापरण्यात येईल.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारव्दारे प्रत्येक पात्र BPL कुटुंबास 1600 रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करेल, जी गैर कनेक्शन खरेदी करण्यासाठी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयामार्फत राहील.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र ग्राहकास एक नवीन LPG Syliender, एक नवीन रेग्युलेटर, नि:शुल्क DGCE पुस्तक, एक सुरक्षा नळी, नि:शुल्क जोडणी इत्यादी सुविधा पुरविण्यात येतील.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.