प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना (Pradhan Mantri Surakshit Matritva Yojana)

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना (Pradhan Mantri Surakshit Matritva Yojana)

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 9 जून 2016 रोजी गर्भवती महिलांच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आली.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेचा उद्देश –

1. गर्भवती महिलांना निरोगी शिशु व निरोगी जीवन प्रदान करणे.

2. गर्भवस्था कालावधीदरम्यान आरोग्यविषयक येणार्‍या अडचणींविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

3. बाळंतपणावेळी होणारे माता मृत्युदर व शिशु मृत्युदर कमी करणे.

*प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भवती महिलांच्या गर्भवस्थेच्या 3 महिन्यांपासून 6 महिन्यांपर्यंत सर्व सरकारी आरोग्य केंद्र, हॉस्पिटल, तपासणी संस्थेमार्फत मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.

*या योजनेअंतर्गत रक्तदाब, साखर प्रमाण, हिमोग्लोबीन तपासणी, रक्त तपासण्या, सोनोग्राफी व इतर तपासणी मोफत करण्यात येतील.

*या योजनेत गर्भवती महिलेच्या मेडिकल कार्डमध्ये तपासणी करणार्‍यांमर्फत विभिन्न प्रकारच्या स्टिकरचा वापर केला जातो.

1. स्टिकर – आजार

2. लाल स्टिकर – गंभीर अवस्थेतील आजार

3. निळा स्टिकर – उच्च रक्तदाब

4. पिवळा स्टिकर – इतर आरोग्यविषयक समस्या

प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी हॉस्पिटल, खासगी नर्सिंग होम, सरकारी हॉस्पिटल, जिल्हा हॉस्पिटल व इतर आरोग्य केंद्र इत्यादीमार्फत आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करून मदत केली जाते.

योजना लक्ष्य – जागतिक बँक अहवाल 2015 नुसार भारतामध्ये माता मृत्युदर 1,00,000 शिशुमागे 174 आहे, तो माता मृत्युदर कमी करून 1,00,000 शिशुमागे 13 वर आणणे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.