प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना (Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana – PMSBY)
प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना (Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana – PMSBY)
*प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना 1 ऑगस्ट 2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे लागू करण्यात आली.
*प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना ही एक फिक्स डिपॉझिट योजना आहे, जाअंतर्गत विमा सुविधा प्राप्त होईल. ही योजना एका गिफ्ट कार्ड प्रमाणे किंवा एक बँक चेक प्रमाणे असेल.
Must Read (नक्की वाचा):
*प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना ही तीन गिफ्ट कार्डमध्ये विभागण्यात आली आहे. ज्यामध्ये 201 रु., 352 रु., 5001 रुपयांची तीन वेगवेगळी गिफ्ट येतात.
हे गिफ्ट बँकांमध्ये वरील रक्कम भरून प्राप्त केले जाऊ शकते. त्यानंतर गिफ्ट कार्ड प्राप्तकर्ता आपल्या बँक खात्यात भरू शकतो.
201 चे पहिले गिफ्ट कार्ड –
या योजनेअंतर्गत जर 201 चे गिफ्ट कार्ड घेतले तर कार्ड घेणार्यास या कार्ड अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या 201 रु. मधून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा हप्ता जो 12 रु. आहे, तो दोन वर्षाचा वजा केला जाऊन शिल्लक पैसे फिक्स डिपॉझिट केले जातील. ज्यावर 8% वार्षिक दराप्रमाणे व्याज देण्यात येईल. हे व्याज संपूर्ण विमा योजनेच्या हप्त्याप्रमाणे काम करेल. अशा प्रकारे ग्राहकास (कार्डधारकास) प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेप्रमाणे काम करेल.
351 रुपयांचे दुसरे गिफ्ट कार्ड –
प्रधानमंत्री स्नेह बंधन योजनेअंतर्गत 351 रुपयांचे दुसरे कार्ड घेतल्यास कार्ड धारकास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळू शकेल. या 351 रूपायांमधून वरील दोन्ही योजनांचा हप्ता क्रमश: 12 रु. व 330 रु. आहे. तो एका वर्षांचा भरून शिल्लक रक्कम फिक्स डिपॉझिट केली जाईल, ज्यावर 8% दराने वार्षिक व्याज दिले जाईल. अशा प्रकारे कार्ड धारकास 352 रुपयांच्या गिफ्ट कार्डवर दोन्ही योजनांचा फायदे घेता येतील.
5001 रुपयांचे तिसरे गिफ्ट कार्ड –
प्रधानमंत्री स्नेह बंधन योजनेअंतर्गत 5001 रुपयांचे तिसरे कार्ड घेतल्यास कार्डधारकास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा (PMSBY) लाभ मिळेल. या 5001 रुपयांचे विभाजन पुढीलप्रमाणे –
-या 5001 रुपयांमधील PMSBY व PMJJY योजनेचा पहिल्या वर्षांचा हप्ता 12 रु. + 330 रु. = 342 रु. व दुसर्या वर्षांचा हप्ता 12 रु. + 330 रु. = 342 रु. वजा केला जाईल.
-वरील हफ्ते वजा केल्यानंतर शिल्लक 4317 रु. रक्कम 5 किंवा 10 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट केली जाईल, ज्यावर 8% प्रमाणे वार्षिक व्याज मिळेल.
-अशा प्रकारे मिळणारे व्याज दोन्ही योजनांसाठी (PMSBY व PMJJY) हप्त्याचे कार्य करेल.
*प्रधानमंत्री स्नेह बंधन योजनेस कोणताही विशिष्ट कालावधी नसल्याने ग्राहक या योजनेत केव्हाही म्हणजे वर्षातील 12 महिन्यात केव्हाही सहभागी होऊ शकतो.