हृदय योजना (HRIDAY Yojana)

हृदय योजना (HRIDAY Yojana)

*हृदय योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 21 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली.

*हृदय योजना (HARIDAY – Heritage city Development And Augmentation Yojana)

*हृदय योजनेसाठी 27 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून यासाठी 500 कोटीचे बजट जाहीर करण्यात आले आहे.

*हृदय योजनेच्या विकासासाठी (Arban Development Ministry v Indian Turizam Ministry) एकत्रित कार्यरत आहेत.

हृदय योजनेचा उद्देश –

1. भारत देशातील जुन्या, प्राचीन शहरांचा विकास करणे.

2. देशातील वारसास्थळे, स्मारके यांचा शाश्वत व सर्वसमावेशक विकास घडवून आणणे.

3. शहर विकासामार्फत नवीन शहरीकरण निर्माण करणे.

4. निवडण्यात आलेल्या शहरांचा नियमित वेळेत विकास साध्य करणे, त्याचबरोबर या शहरांमध्ये सुरक्षा, सुंदरता, वीज, स्वच्छता, पाण्याची कमतरता इत्यादी प्रमुख गरजांवर लक्ष्य केंद्रित करण्यात येईल.

हृदय योजनेत 12 शहरांची निवड करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे –

1. वाराणसी – उत्तर प्रदेश

2. व्दारका – गुजरात

3. अजमेर – राजस्थान

4. अमृतसर – पंजाब

5. अमरावती-आंध्रप्रदेश

6. वरंगळ – तेलंगणा

7. पुरी – ओरिसा

8. वेळाकणी – तामिळनाडू

9. मथुरा – उत्तर प्रदेश

10. कांचीपुरी – तामिळनाडू

11. बदामी – कर्नाटक

12. गया – बिहार

*या योजनेत निवडण्यात आलेल्या 12 शहरांमध्ये सर्वाधिक म्हणजे तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश राज्यातील दोन-दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. तर या 12 शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकाही शहराचा समावेश करण्यात आला नाही.

*हृदय योजनेअंतर्गत 12 शहरांवर केंद्र सरकारमार्फत 500 कोटी रु. खर्च करण्यात येणार असून यामधील सर्वाधिक खर्च वाराणसी (89.31 कोटी रु.) शहरावर तर सर्वात कमी खर्च अमरावती, बदामी, व्दारका, वेळाकणीवर प्रत्येकी 22.26 कोटी रु. सदरावर करण्यात येणार आहेत.

*हृदय योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असल्याने या योजनेसाठी येणारा संपूर्ण खर्च (100%) केंद्र सरकारव्दारे करण्यात येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.