प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana)

प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana)

योजनेची घोषणा – प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 15 ऑगस्ट, 2014 रोजी करण्यात आली.

योजनेची सुरुवात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 28 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जनधन योजनेस प्रारंभ करण्यात आला.

ब्रीदवाक्यमेरा खाता भाग्यविधाता

उद्देश

*देशातील नागरिकांना वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे.
*देशातील आर्थिक दुर्बल घटकांतून साहुकारी प्रमाण कमी करणे.
*देशातील आर्थिक दुर्बल घटकांना बँकांशी जोडणे.
*देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला बँकसेवा व कर्ज पुरवठा सुविधा उपलब्ध करणे इ. वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या  उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली.

लक्ष्य

*एका वर्षामध्ये 7.5 कोटी बँक खाती उघडणे.

*ही योजना National Payment Corporation in India (NPCI) व्दारे राबविण्यात येत आहे.

*प्रधानमंत्री जनधन योजना ही गरीब जनतेस आर्थिक सशक्त बनविण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय व्यक्तीचे एकही बँक खाते नाही अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत बँक खाते नाही अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जर एखादा भारतीय नागरिक पूर्वीचे बँक खाते या योजनेत सहभागी करू इच्छित असतील तर ते करू शकतात. त्यासही सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जातील, ज्या या योजनेत समाविष्ट आहेत.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे या योजनेची सुरुवात करतेवेळी ‘विश्व चक्रातून गरिबांचे स्वातंत्र्य पर्व’ असे उद्गार उच्चारण्यात आले.

*प्रधानमंत्री जन-धन योजनेत एका दिवसामध्ये 1.5 कोटी बँक खाती उघडण्यात आली.

*प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 10 वर्षांवरील मुले/मुली खाते उघडू शकतात, ज्याची पाहणी त्यांचे माता-पिता व्दारे पाहण्यात येईल.

*या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी योग्य कागदपत्रांची आवश्यकता असते; परंतु एखाद्या व्यक्तीजवळ कागदपत्रे नसतील तर अशी व्यक्ती गॅजेटेड ऑफिसरमार्फत प्रामाणिक केलेले प्रमाणपत्र बँकेत जमा करून खाते उघडू शकते. त्यास ‘Low risk account’ किंवा ‘स्मॉल अकाऊ ट’ असेही म्हटले जाते. असे खाते एक वर्षासाठी सुरक्षित ठेवले जाईल. या एका वर्षामध्ये खातेधारकास एखादे योग्य प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागेल.  

*प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातेधारक 6 महिन्यांनंतर 5000 रु. कर्ज स्वरुपात मिळवू शकतात.

*या योजनेअंतर्गत बँकिंग सुविधा सर्वसुलभ बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी कमीत कमी एक बँक खाते खोलणे, वित्तीय सक्षमता, कर्ज आणि विमा सुविधा उपलब्ध करणे या सुविधा पुरविल्या जातात.

*या योजनेत लाभार्थ्यास 1 रुपयात डेबिट कार्ड दिले जाईल, ज्यामध्ये 1 लाख रूपयांचा अपघाती विमा उतरविला जातो. या व्यक्तीरिक्त 15 ऑगस्ट, 2014 ते 26 जानेवारी, 2015 दरम्यान बँक खाते उघडणार्‍यास व योजनेच्या पात्रतेसंदर्भात इतर अटी पूर्ण करणार्‍यास 30,000 रुपयांची जीवन विम्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

*या योजनेअंतर्गत दुर्घटना विमा संरक्षण मिळवण्यासाठी 45 दिवसांतून कमीत कमी एकदा तरी डेबिट कार्डचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

*प्रधानमंत्री जनधन योजनेत सर्वाधिक बँक खाती उघडल्याने या योजनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. (23 ते 29 ऑगस्ट 2014 या सात दिवसांत 1 कोटी 80 लाख 96 हजर बँक खाती उघडण्यात आली.)

*प्रधानमंत्री जनधन योजनेत एका दिवसात 1.5 कोटी बँक खाती उघडण्यात आली व तेवढ्याच व्यक्तींना अपघाती विमा पॉलिसी जाहीर करण्यात आली.

*प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये घरकाम करणार्‍या महिलांना प्राथमिकता देण्यात आली आहे.

*प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स खाते उघडता येते.

*प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सर्व बँक खातेदारांना ‘रुपे (Rupay)’ कार्ड दिले जाणार आहे.

*Rupay म्हणजे Rupees आणि Payment. हे एक डेबिट कार्ड आहे, ज्यामधून रुपयातली देणी दिली जातात.

*प्रधानमंत्री जनधन योजनेची 28 जानेवारी 2015 च्या स्थितीनुसार 12.31 कोटी बँक खाती उघडण्यात आली. यामधील 7.36 कोटी खाती ग्रामीण भागात व 4.95 कोटी खाती शहरी भागात उघडण्यात आली.

*प्रधानमंत्री जनधन योजनेत 28 जानेवारी 2015 पर्यंतच्या 12.31 कोटी बँक खात्यांतील 67.5% खात्यांमध्ये शिल्लक 0 (शून्य) पैसे होती.

*प्रधानमंत्री जनधन योजनेस 2015-16 नंतर सेवा करातून सूट देण्यात आली आहे.

Must Read (नक्की वाचा):

मेक इन इंडिया (Make In India-MII)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.