मेक इन इंडिया योजना(Make In India-MII)
मेक इन इंडिया योजना(Make In India-MII Yojana)
योजनेची सुरुवात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 25 सप्टेंबर 2014 रोजी नवी दिल्ली येथून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्देश-
Must Read (नक्की वाचा):
*गुंतवणुकीस चालना देणे
*तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणे
*कौशल्य विकासात वाढ करणे
*बौद्धिक संपदेचे संरक्षण आणि आधुनिक सोयी-सुविधांची निर्मिती इत्यादि उद्देशाने MII कार्यक्रम सुरू करण्यात आला.
*मेक इन इंडिया अंतर्गत उद्योग संस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी www.makeinindia.com वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस (FDI) फर्स्ट डेव्हल्पमेंट इंडिया (First Development India-FDI) या नावाने ओळखावे असे म्हटले.
*मेक इन इंडिया अंतर्गत जागतिक व्यापारात हिस्सेदारी वाढवण्यासाठी लूक ईस्टच्या बरोबर ‘लिंक वेस्ट’ची कल्पना सुचविण्यात आली.
*मेक इन इंडिया अभियानांतर्गत खालील 25 उत्पादन क्षेत्रांची निवड करण्यात आली.
1.वाहन उद्योग
2.विमान
3.जैव तंत्रज्ञान
4.निरोगीपणा
5.अवकाश
6.बंदर
7.खाणकाम
8.रेल्वे
9.आयटी आणि बीपीएम
10.रसायने
11.चामडे
12.बांधकाम
13.अन्नप्रक्रिया
14.औषधे
15.औष्णिक ऊर्जा
16.पर्यटन
17.पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा
18.कापड
19.तेल आणि वायु
20.मनोरंजन
21.रस्ते आणि महामार्ग
22.इलेक्ट्रॉनिक यंत्रणा
23.इलेक्ट्रॉनिक मशिनरी
24.संरक्षण उत्पादने
25.वाहनांच्या सुट्या भागांचे उद्योग
महाराष्ट्र मेक इन इंडिया –
*13 ते 18 फेब्रुवारी 2016 दरम्यान महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक भरारीला उभारी देणारा एक राष्ट्रीय सोहळा ‘मेक इन इंडिया’ सप्ताह मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला.
*या सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वबळावरील भारत निर्माणाचे स्वप्न या माध्यमातून जगासमोर मांडण्याची संधी मेक इन इंडिया सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याला मिळाली.
*मेन इन इंडिया सप्ताहाअंतर्गत 2594 सामंजस्य करार करण्यात आले.
*राज्य शासनाच्या उद्योग विभागाने केंद्र शासनाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग व भारतीय औद्योगिक महासंघ (CII) यांच्या सहकार्याने मेक इन इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
*या सप्ताहाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आलेले पुरस्कार
*Young Maker of the Year – अजंता फार्मा कंपनी (योगेश व राजेश अग्रवाल)
*Best in Class Manufacturing – टाटा मोटर्स
*Innovoter of the Year – हिरो मोटर्स
*मेक इन इंडियामध्ये 102 देशांचा सहभाग नोंदविण्यात आला.
*मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत महाराष्ट्रातील विभागनिहाय गुंतवणूक
*मराठवाडा व विदर्भ – 1 लाख 50 हजार कोटी रुपये.
*पुणे – 50 हजार कोटी
*खानदेश – 25 हजार कोटी
*मुंबईसह कोकण विभाग – 3 लाख 25 हजार कोटी
*मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली धोरणे
1.किरकोळ व्यापार धोरण
2.सागरी किनारा विकास धोरण
3.एक खिडकी योजना
4.अनुसूचित जाती-जमातींच्या उद्योजकांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना
5.इलेक्ट्रॉनिक्स धोरण