प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (Pradhan Mantri Awas Yojana-PMAY)

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (Pradhan Mantri Awas Yojana-PMAY)

योजनेची सुरुवात25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे करण्यात आली.

*प्रधानमंत्री आवास योजनेची प्रथम सुरुवात “Housing for All” या नावाने करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नामकरण प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले.

*प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य लक्ष्य 7 वर्षांमध्ये देशामध्ये 2 करोड नवीन घरे बनविणे (2022 पर्यंत) आहे.

*प्रधानमंत्री आवास योजना जी प्रामुख्याने शहरी गरिबांसाठी लागू करण्यात आली आहे, ज्याव्दारे ते आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतील.

*प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी गरीब, LIG व EWS अंतर्गत येणार्‍या व्यक्तींना लाभ मिळेल.

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी-

1.अनूसूचित जाती (SC)

2.अनुसूचीत जाती (ST)

3.आर्थिकदृष्टया मागासवर्ग

4.स्त्रिया

*प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4,041 शहरे व वाडयावस्त्या सहभागी केल्या जातील; परंतु सध्या 500 शहरांचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.

पहिला टप्पा –

प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला टप्पा एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान राहील, ज्यामध्ये 100 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

दूसरा टप्पा –

प्रधानमंत्री आवास योजनेचा दूसरा टप्पा एप्रिल 2017 ते मार्च 2019 दरम्यान राहील, ज्यामध्ये 200 पेक्षा अधिक शहरांचा समावेश करण्यात येईल.

तिसरा टप्पा –

प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा एप्रिल 2019 ते मार्च 2022 दरम्यान राहील, ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील राहिलेल्या सर्व शहरांचा समावेश करण्यात येईल.

*प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुख्यत: गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत गृहकर्जाचा व्याजदर 6.5% आकारण्याचा प्रस्ताव आहे. साधारण गृहकर्जाचा व्याजदर 10.5% राहतो. अशाप्रकारे या योजनेत लाभार्थ्यास 2000 रु. प्रतिमहिना EMI भरावा लागेल.

प्रधानमंत्री आवास योजना 2015-2022 प्रमुख घटक –

1.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतमूळ जमिनीचा खासगी सहभागाच्या माध्यमातून संसाधन म्हणून खासगी डेव्हलपर्सबरोबर झोपडपट्टीचे पुर्ननिर्माण करण्यात येईल. ज्यामध्ये आर्थिक दुर्बल गटातील कुटुंब (LIC) अंतर्गत लाभार्थ्यास प्रत्येकी सरासरी 1 लाख रु. केंद्रीय अनुदान वाटप केले जाईल.

2.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (EWS) आर्थिक दुर्बल गटातील कुटुंब व (LIG) अल्प उत्पन्न गटातील कुटुंब लाभार्थ्यास प्रत्येक आवास कर्जावर 6.50% व्याज क्रेडिट लिंक अनुदान केंद्र सरकारमार्फत उपलब्ध केले जाईल.

3.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी गरीब व्यक्तींना स्वत:चे घर बनविणे किंवा घराची डागडुजी करण्यासाठी सरकारमार्फत 1.50 लाख अनुदानाचे नियोजन करण्यात येईल.

प्रधानमंत्री आवास योजना प्रमुख बिंदु –

1.लाभार्थ्यास 15 वर्षांसाठी गृहकर्जावर 6.5% व्याज सरकारमार्फत अनुदान स्वरूपतात देण्यात येईल.

2.या योजनेअंतर्गत घराची नोंदणी महिलांच्या नावावर केली जाईल किंवा महिला व पुरुष (पती-पत्नी) दोन्हीच्या नावे करण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराची मुख्य महिला असेल.

3.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वयस्क व शारीरिक अपंग व्यक्ती ग्राऊंड फ्लोअरसाठी नोंदणी करू शकतात.

4.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे चांगली (पक्की) व आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असतील.

5.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरातील वृद्ध महिलांना प्राधान्य देण्यात येईल किंवा पती-पत्नी दोघांना एकत्रित खात्याअंतर्गत घर दोघांच्या नावे केले जाईल. (जर एखाद्या घरामध्ये कोणतीही वृद्ध महिला नाही अशा वेळी घर पुरुष सदस्याच्या नावे होईल.)

6.या योजनेअंतर्गत साधारण 35% आर्थिकदृष्ट्या मागास वर्गास लाभ देणे निश्चित करण्यात आले आहे.

*प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2015 ते 2017 दरम्यान 100 शहरांवर काम केले जाईल.

*प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराचा आकार सरकारमार्फत 30 स्व्केअर मी. म्हणजेच 322 स्व्केअर फूट निश्चित करण्यात आला आहे. अशा जागेमध्ये कमी किंवा अधिक असा बदल करावयाचा झाल्यास तो निर्णय राज्य सरकार, केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने घेता येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.