पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती

पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती

 • पृथ्वीवरील प्रमाण –  पाणी 71%, जमीन 29%
 • 71% पैकी फक्त 3% पाणीच पिण्यासाठी उपलब्ध.
 • माणसाच्या शरीर वजनाच्या 60% वजन हे पाण्याचे असते.
 • पेशी जिवंत ठेवणे, शरीरातील द्रवपदार्थांचे वहन, अन्नाचे चयापचय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये होत.
 • सुरक्षित पिण्याचे पाणी – पाण्यात रोगजंतू नसावेत. दिसण्यास स्वच्छ (रंगहीन, पारदर्शक, गढूळ नको) खारट नसावे, दुर्गंधी नको, बेचव नोको, अपायकारक घटक नको, रासायनिक प्रदुषकांपासून दूर असे पाणी असावे.

 पाण्याचे मोजमाप :

 • गोल विहीरीचे सूत्र – व्यासाचा वर्ग हृ पाण्याची खोली हृ 785 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)
 • चौकोनी विहीर/टाकीचे सूत्र – लांबी हृ रुंदी हृ पाण्याची खोली (ऊंची) हृ 1000 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)

  पाण्याचे शुद्धीकरण : 100 लीटर पाण्यासाठी 5 ग्रॅम T.C.L. पावडरचा वापर करणे.

 T.C.L. पावडर :

 • लाँगफाँर्म – Troprical Chloride of lime
 • सूत्र  – CaOCI2
 • सध्या TCL पावडरच सार्वजनिक पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते.
 • टी.सी.एल. पावडरलाच ‘ब्लिचिंग पावडर’ असे म्हणतात.

 TCL पावडरचे प्रकार :

 1. ग्रेड – I – यात 36% क्लोरीनचे प्रमाण असते.
 2. ग्रेड – II – यात 33% क्लोरीनचे प्रमाण असते.
 • नेहमी किमान 33% क्लोरीनयुक्त TCL पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात. कमीतकमी 20% क्लोरीन असलेली पावडरसुद्धा चालते.

 टेस्ट (चाचणी) :

 • लाँगफाँर्म – ऑथोर्टोल्युडीन
 • पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी करतात.
 • पाणी शुद्ध केल्यानंतर अर्ध्या तासाने O.T. घेण्यात यावी. (30 मिनिटे.)‍‍‌‌‌
 • पाण्यामध्ये 0.2 ते 0.5 पी.पी.एम. एवढी O.T. येणे आवश्यक असते.
 • TCL युक्त पाण्याची द्रावण टाकून चाचणी घेतली असता परीक्षा नळीतील पाण्याला ‘पिवळा रंग’ येतो.
 • पाण्यामध्ये TCL पावडर जास्त पडल्यास तपकिरी/लाल रंग येतो.
 • साधारण: पाण्यामध्ये 6 ते 8 तास O.T. टिकते.

 हापशाचे शुद्धीकरण :

 1. 4 इंची व्यासाचा हापसा – 500 ml (1/2 लीटर) पाण्यात 150 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.
 2. 6 इंची व्यासाचा हापसा – 1 लीटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.

 मदर सोल्यूशन (शाळेमर्फत वाटप) :

 • मदर सोल्यूशन (शाळेमार्फत वाटप) 1 लीटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.