महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

Mahatvache Dhatu Ani Adhatu V Tyanche Upyog

महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

1. तांब्याचा उपयोग :

 • भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.
 • विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र –  पितळ

 • धातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)
 • उपयोग – भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – ब्राँझ

 • धातू व प्रमाण – तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)
 • उपयोग – बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता

संमिश्र – जर्मन सिल्व्हर

 • धातू व प्रमाण – तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%)
 • उपयोग – हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो.

संमिश्र – बेल मेटल

 • धातू व प्रमाण – तांबे (78%) व कथील (22%)
 • उपयोग – घंटया, तास तयार करण्याकरिता

संमिश्र – अॅल्युमिनीयम ब्राँझ

 • उपयोग – तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – गनमेटल

 • धातू व प्रमाण – तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%)
 • उपयोग – बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता

2. लोखंडाचा उपयोग :

 • ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात.
 • नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो.
 • पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो.

लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र – स्टेनलेस स्टील

 • धातू – लोखंड, क्रोमीअम, कार्बन
 • उपयोग – तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता

संमिश्र – टंगस्टन स्टील

 • धातू – लोखंड, टंगस्टन व कार्बन
 • उपयोग – जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅगनीज स्टील

 • धातू – लोखंड व मॅगनीज
 • उपयोग – कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – क्रोमीअम स्टील

 • धातू – लोखंड व क्रोमीअम
 • उपयोग – बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.

3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

 • घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता
 • चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता
 • विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.
 • रुपेरी रंग तयार करण्याकरिता.

अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र – ड्युरालयुनिम

 • धातू – अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज
 • उपयोग – हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅग्नेलियम

 • धातू – अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम
 • उपयोग – शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता.

संमिश्र – अॅल्युमिनीअम ब्राँझ

 • धातू – तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.

संमिश्र – अल्किनो

 • धातू – अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल
 • उपयोग – विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.

4. जस्ताचे उपयोग :

 • लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.
 • विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.
 • धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

5. पाराचा उपयोग :

 • हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात.
 • बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात.
 • आरसे तयार करण्याकरिता केला जातो.

6. सोडीयमचे उपयोग :

 • सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.
 • उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.

7. मॅग्नेशियमचे उपयोग :

 • क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात.
 • शोभेच्या दारूमध्ये.
 • धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.
 • धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.

8. चांदीचा उपयोग :

 • दागिने तयार करण्याकरिता
 • चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो.
 • छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता.
 • विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.

9. सोन्याचे उपयोग :

 • नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.

10. शिशाचा उपयोग :

 • मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.
 • दारूगोळा तयार करण्याकरिता.
 • विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता.
 • विद्युत परीपथकात वितळतार करण्यास.
 • अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.
 • डाग देण्याचा धातू व सहज वितळणारी संमिश्रे तयार करणे.
 • पुरातनकाळी किल्याच्या भिंती मजबूत करण्याकरिता दोन दगडाच्या जोडात शिशे भरले जात असे.

11. कथिलचा उपयोग :

 • मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता
 • रंग तयार करण्याकरिता
 • विद्युत परीपथकामध्ये
 • मिश्रधातू तयार करण्याकरिता
 • विद्युत परीपथकात वितळतार तयार करण्याकरिता.

12. गांधकाचे उपयोग :

 • सल्फ्युरिक अॅसिडच्या उत्पादनकरिता.
 • आगकाडी उत्पादनात वापरण्यात येणारे अॅटिमनी सल्फाइड तयार करण्याकरिता.
 • गंधकाची पूड ही कवक नाशक आहे. यामुळे गंधकाची पूड पिकावर धूरळण्याकरिता उपयोगात आणली जाते. तसेच कीटकनाशके आणि कीडनाशके तयार करण्याकरिता गंधकाचा उपयोग केला जातो.
 • सल्फा ड्रग तयार करण्याकरिता
 • बंदुकीची दारू आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्याकरिता
 • रबराचे व्हल्कनायझेन तयार करण्यासाठी.

13. सल्फर डायऑक्साइडचे उपयोग :

 • सल्फ्युरिक आम्लाच्या निर्मितीकरिता.
 • साखर, कृत्रिम धागे इत्यादीच्या विरंजनाकरिता.
 • कागद तयार करण्याकरिता आवश्यक असलेली कॅल्शियम बायसल्फाट सारखी संयुगे तयार करण्याकरिता
 • द्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाकरिता केला जातो.

14. पिवळा फॉस्फरसचे उपयोग :

 • तांबडा फॉस्फरस तयार करण्याकरिता. तांबडया फॉस्फरसपासून सुरक्षित आगकाडया तयार केल्या जातात.
 • अतिशय टणक, न गंजणारे फॉस्फर ब्राँझ मिश्र धातू तयार करण्याकरिता
 • उंदरासाठी मारण्याकरिता उपयोगी पडणारे झिंक फॉस्फेट विष तयार करण्याकरिता.
 • स्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्याकरिता
 • स्फुरदयुक्त खताची निर्मिती करण्याकरिता

15. क्लोरीनचे उपयोग :

 • कापड, धागे, कागद व कागदाच्या लगदाच, विरंजन करण्याकरिता.
 • क्लोरीन जंतूनाशक असल्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता या उपयोग केला जातो.
 • क्लोरोफार्म, एथीलीन क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादि संयुग तयार करण्याकरिता.
 • कृत्रिम रबर, प्लास्टीक, डी.डी.टी तयार करण्याकरिता.
 • विरंजक चूर्ण तयार करण्याकरिता.

16. ब्रोमीनचे उपयोग :

 • ब्रोमाइड क्षार तयार करण्यासाठी ब्रोमीन वापरतात.
 • रंग व जंतुनाशके तयार करण्यासाठी ब्रोमीनच उपयोग करतात.
 • फोटोफिल्म तयार करण्याकरिता सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग करतात.
 • औषध उद्योगांमध्ये सोडीअम व पोटेशियमचे ब्रोमाईड वापरतात.

17. आयोडिनचे उपयोग :

 • टिंक्चर आयोडीन तयार करण्याकरिता व सिल्व्हर आयोडीन तयार करण्याकरिता.
 • आयोडिनपासून जंतुनाशक मलमे तयार केली जातात.
 • कृत्रिम रबर, प्लास्टिक, डी.डी.टी. तयार करण्याकरिता.

18. हिर्‍याचा उपयोग :

 • दागिण्यातील रत्न म्हणून
 • कठीण पदार्थातला छिद्र पाडण्यासाठी अवजारे तयार करण्याकरिता व काच कापण्याकरिता.

19. ग्रॅफाईट उपयोग :

 • विद्युत भट्टीमध्ये इलेक्ट्रोड म्हणून
 • शिसपेन्सिल तयार करण्याकरिता
 • उच्च तापमानावर कार्य करणार्‍या यंत्रामध्ये वंगण म्हणून
 • युरेनियमभट्टीमध्ये न्युट्रॉन शोषक म्हणून

20. कार्बन मोनॉक्साइडचा उपयोग :

 • कार्बनमोनोऑक्साइड आणि हायड्रोजनचा उपयोग वॉटर गॅस म्हणून करतात.
 • कार्बनमोनोऑक्साइड आणि नायट्रोजनचा उपयोग प्रोड्यूसर गॅस म्हणून करतात
 • रंगाच्या कारखाण्यात उपयुक्त असणार्‍या फॉस्जिन वायूच्या उत्पादनाकरिता
 • फॉस्जिन वायुचा उपयोग युद्धात विषारी वायु तयार करण्याकरिता सुद्धा करतात.

21. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग :

 • सोडीयम कार्बोनेट आणि सोडीयम बायकार्बोनेट तयार करण्याकरिता
 • वायुमिश्रीत जल तयार करण्याकरिता
 • अग्निशामक दलामध्ये आग विझविण्याकरिता
 • अन्नपदार्थ टिकविण्याकरिता किंवा त्याची वाहतूक करण्याकरिता शितकारक म्हणून कोरडा बर्फ वापरतात.

22. मिथेनचा उपयोग :

 • गोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या स्वरुपात घरघुती इंधन म्हणून
 • काजळी आणि कार्बन ब्लॅक तयार करण्याकरिता.
 • ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून
 • हायड्रोजनचे उत्पादन घेण्याकरिता

23. मिथेनॉलचा उपयोग

 • प्रयोग शाळेत स्पिरीट लॅम्प करिता इंधन म्हणून.
 • लाकडावर पॉलिश करण्याकरिता लागणारा द्रावक म्हणून
 • सुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता व कृत्रिम धागे तयार करण्याकरिता.

24. इथिलिनचा उपयोग :

 • कातकाम आणि धातुंच्या जोडकामाकरिता उपयोगात येणारी ऑक्सि-इथेलीन ज्योत तयार करण्याकरिता.
 • कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याकरिता.
 • प्लास्टिकचे सामान व वस्तू त्याचप्रमाणे पॉलिथीन तयार करण्याकरिता.

25. अॅसिटीक अॅसिडचा उपयोग :

 • सेल्यु लोज अॅसिडच्या निर्मिती करिता.
 • कृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता
 • लोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरचा उपयोग करतात.

26. बेंझीनचा उपयोग :

 • चरबी, राळ, रंगलेप आणि रबर इत्यादि द्रावकाकरिता.
 • ड्रायक्लीनिंगसाठी
 • पेट्रोल तुटवड्याच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून
 • निरनिराळी कार्बनी संयुगे तयार करण्याकरिता.
You might also like
1 Comment
 1. priti says

  great information, i like it

Leave A Reply

Your email address will not be published.