शासनाच्या मुलींविषयी योजणांची संपूर्ण माहिती

शासनाच्या मुलींविषयी योजणांची संपूर्ण माहिती

धनलक्ष्मी योजना :-

  • 3 मार्च 2008 रोजी केंद्रीय महिला आणि कुटुंब कल्याण मंत्रालायव्दारे ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • यामध्ये बालकांना सशर्त धन दिले जाते. त्याचबरोबर सोबत विमाही दिला जातो. या योजनेची सुरुवात पुढील सात राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
  • आंध्रप्रदेश, बिहार, छ्त्तीसगड, झारखंड, ओडिशा, उ.प्रदेश आणि पंजाब या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 वर्षाच्या आत वय असणे आवश्यक आहे.

बालिका समृद्धि योजना :-

  • या योजनेअंतर्गत मुलींना रोख पैसे जन्माच्यावेळी आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी शाळेत शिक्षण चालू असताना 10 वी च्या वर्गापर्यंत हे पैसे प्रदान केले जातात.
  • या योजनेची सुरुवात 1997 मध्ये करण्यात आली.

 

लाडली योजना :-

  • ही योजना दिल्ली आणि हरियाणा या दोन राज्यांनी सुरू केली असून यामध्ये मुलीच्या जन्माच्या वेळी आणि त्यानंतर विविध पातळीवर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोख पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
  • दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना १ लाख रुपये दिले जाणार आहेत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.