किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Yojana)

किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Yojana)

*किसान विकास पत्र योजना 1988 मध्ये सुरू करण्यात आली होती; परंतु मागील काही वर्षांमध्ये 2011 मध्ये याचा दुरूपयोग करण्यात आल्याने ही योजना सरकारमार्फत बंद करण्यात आली.

*सध्याच्या सरकारमार्फत किसान विकास पत्र योजनेस पुनर्जीवनदान देण्यात आले, जिची घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याव्दारे 18 नोव्हेंबर 2014 रोजी करण्यात आली.

किसान विकास पत्र योजना पात्रता

1. भारतीय प्रौढ व्यक्ती, ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे.

2. 18 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या नावे त्यांचे पालक किसान विकास पत्र खरेदी करू शकतात.

3. एखादी संस्था/ट्रस्टमार्फत किसान विकास पत्र खरेदी केली जाऊ शकते.

4. दोन व्यक्ती एकत्रित योजनेअंतर्गत किसान विकास पत्र खरेदी करू शकतात.

किसान विकास पत्राचे प्रकार

किसान विकास पत्र तीन प्रकरच्या रकमेत विभगण्यात आले आहे.

1. 1000 रु. ते 5000 रु.

2. 5000 रु. ते 10,000 रु.

3. 10,000 रु. ते 50,000 रु.

*किसान विकास पत्र कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून प्राप्त केले जाऊ शकते, ज्यासाठी भूगतान खालील पद्धतीने केले जाऊ शकते.

1. कॅश पेमेंट

2. चेक

3. डिमांड ड्राफ्ट

4. ज्या बँकेत सेव्हिंग अकाऊंट आहे त्याच बँकेतील विड्रोल फॉर्म ग्राहकाच्या हस्ताक्षरामध्ये

*किसान विकास पत्राची कॅश पेमेंटव्दारे खरेदी केल्यास त्याचवेळी ग्राहकाच्या हातात दिले जाते; परंतु चेक किंवा डिमांड ड्राफ्ट व इतर मार्गाने किसान विकास पत्र खरेदी केल्यास काही कालावधीनंतर ग्राहकास दिले जाते.

किसान विकास पत्र योजनेचे लाभ

1. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत 100 महिन्यांत (8 वर्ष 4 महीने) रक्कम दुप्पट होईल. थोडक्यात आपण जेवढी गुंतवणूक केली आहे, ती गुंववणूक दुप्पट होईल.

2. किसान विकास पत्राव्दारे सध्या 8.70% व्याज देण्यात येते.

3. किसान विकास पत्र हस्तांतरित होऊ शकते. थोडक्यात गुंतवणूकदार हे कोणत्याही इतर व्यक्तीस देऊ शकते ज्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस अधिकार्‍याला अॅप्लिकेशन द्यावे लागेल.

किसान विकास पत्र गुंतवणूक मर्यादा

किसान विकास पत्रासाठी ग्राहकास कमीत-कमी 1000 रु. खर्च करणे बंधनकारक आहे, परंतु अधिकाधिक खर्चास मर्यादा घालण्यात आली नाही. ग्राहक हवी तेवढी किसान विकास पत्र खरेदी करू शकतो.

किसान विकास पत्र कर फायदा

किसान विकास पत्रावर कोणताही कर फायदा देण्यात आला नाही, परंतु रक्कम काढतेवेळी प्राप्त रक्कम करमुक्त ठेवण्यात आली आहे.

किसान विकास पत्र विड्रोल स्कीम

1. किसान विकास पत्र 100 महीने अर्थात 8 वर्षे 4 महिन्यांनी पूर्ण होते, ज्यानंतर ग्राहकास गुंतवणूक रक्कम दुप्पट प्राप्त होते.

2. किसान विकास पत्राचा परिपक्वता कालावधी 30 महीने अर्थात 2 वर्षे 6 महिन्यांचा आहे.

3. किसान विकास पत्रामध्ये वेळेअगोदर (प्री मॅच्युअर विड्रोल) संपूर्ण रक्कम काढण्याची कोणतीही नियामावली नाही.

4. वेळेअगोदर संपूर्ण रक्कम काढणे अशा वेळी शक्य आहे, जेव्हा ग्राहकाचा मृत्यू होतो, त्यासाठी योग्य कार्यवाहीसाठी नियमावली आहे. परंतु हे 30 महिन्यांच्या कालावधीनंतर शक्य आहे.

किसान विकास पत्र योजनेस लागणारी महत्वपूर्ण कागदपत्रे

1. किसान विकास पत्रासाठी ग्राहकास खालील कागदपत्रे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतील.

2. दोन पासपोर्ट आकराचे फोटो

3. ओळख पत्र (रेशनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट, ड्राइविंग लाईसन्स इ.)

4. पत्ता माहिती (वीज बिल, टेलिफोन बिल, पासबुक इ.)

5. जर गुंतणूक 50,000 रु. पेक्षा अधिक असेल तेव्हा पॅनकार्ड असणे गरजेचे आहे.

*जर एखाद्या कारणाने ग्राहकांचे किसान विकास पत्र हरवले किंवा चोरी झाले तर ते पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून पुन्हा प्राप्त करता येते.   

*जर ग्राहकास आवश्यकता निर्माण झालीच तर किसान विकास पत्र बँकेतून कर्ज घेण्यास संरक्षणाच्या दृष्टीने ठेवले जाऊ शकते.

*18 नोव्हेंबर 2014 रोजी किसान विकास पत्र योजना सुरू झाल्यानंतर 16,429 कोटी रु. पेक्षा अधिक गुंतणूक आकर्षित करण्याबरोबर 1.84 कोटीपेक्षा अधिक किसान विकास पत्रांची विक्री करण्यात आली आहे. 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World