तिसर्‍या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी

sutticha kalawadhi

सुट्टीचा कालावधी म्हणजे नेमके काय?

तिसर्‍या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेले आर्थिक अस्थैर्य, औद्योगिक क्षेत्रात शिथिलता आणि वित्तीय संसाधनांचा अभाव, या कारणांमुळे सरकारला चौथी योजना लगेच सुरू करता आली नाही. त्यामुळे सरकारला नियोजनाची नियमित प्रक्रिया स्थगित करावी लागली. या काळास योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी असे म्हणतात.

– ही सुट्टी 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान राहिली.

– नियोजनाच्या सुट्टीच्या कळवधीदरम्यान मात्र सरकारने 3 वार्षिक योजना राबविल्या.

Must Read (नक्की वाचा):

दुसरी पंचवार्षिक योजना

1. पहिली वार्षिक योजना (1966 – 67):

  • अजून एका दुष्काळाला सामोरे जावे लागले.
  • मात्र 1966 च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला.
  • 6 जून 1966 रोजी रुपयाचे 36.5% अवमूल्यन घडवून आणण्यात आले.

2. दुसरी वार्षिक योजना (1964 – 67):

अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यात सुरुवात झाली. कारण हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनच्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादन वाढू लागले.

1967- 67 मध्ये अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले.

3. तिसरी वार्षिक योजना (1968-69):

  • अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या.

  • व्यवहारतोलाची परिस्थिती सुधारली.

  • चौथी योजना सुरू करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली.

  • हरित क्रांतिचे मूल जनक – नॉरमल बोरलाग.

  • हरित क्रांतिचे भारतीय जनक – एम. एस. स्वामिनाथन, सी. सुब्रमन्यम.
Must Read (नक्की वाचा):

तिसरी पंचवार्षिक योजना

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.